टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? Term insurance information in Marathi

Term insurance information in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा आमच्या या ज्ञानमय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवत आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होत आहे ना !!

मागच्या लेखामध्ये मी तुम्हाला विमा याबद्दल सविस्तर माहिती सांगितलीच आहे. कारण आजच्या काळात प्रत्येकाला विमा काढण्याची गरज भासू लागली आहे. कारण आजचा काळ असा आहे की, कोणत्याच गोष्टीची शाश्वती ही राहिलेली नाही.

आजच्या या धावपळीच्या जगात कोणाला कधी काय होईल सांगता यरत नाही.सध्या जगात महामारीमुळे, अपघातामुळे व आजारांमुळे भरपूर जण आपला जीव गमावत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम करणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय परिवार आणि आरोग्य सर्वेक्षणानुसार ही आकडेवारी समोर आली आहे की ,भारतातील एकूण लोकसंख्येच्या फक्त 27 % लोकांकडे वैद्यकीय संबंधित विमा संरक्षण आहे.

संबंधित 27% पैकी 50 % लोकांना विमाकंपनी मुळे विमा कवच मिळाले आहे. मागील दहा वर्षांमध्ये देशात सरासरी वैद्यकीय खर्चात 8.5% वाढ झालेली आहे. ग्रामीण भागात फक्त 10 % लोकांकडेच वैद्यकीय विमा आहे .

आत्ताच आपण सर्वजण कोरोना या महामारीतून बाहेर पडलेलो आहेत. कोरोना हे असे संकट होते की, प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याबरोबरच आपल्या कुटुंबाची देखील काळजी लागलेली होती. कधी काय होईल?

कोणते संकट येईल ? हे सांगता येत नव्हते. या कोरोनाच्या महामारी मध्ये भरपूर कुटुंबे ही आपल्याला उध्वस्त होताना दिसलीच असतील.कुटुंबातील कर्ता व्यक्ती म्हणजे ज्याच्यावर त्याचे सर्व कुटुंब अवलंबून असते.

अशा व्यक्ती जेव्हा कोरोनाच्या महामरीमध्ये मरण पावल्या त्यावेळेस त्या कुटुंबांना किती आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला हे आपण पाहिलेच असेल.

तेव्हा आपले कुटुंब जर आपल्यावर अवलंबून असेल, आपण एकटेच कमवत असाल,  तुमच्यावर काही कर्ज असेल किंवा तुमचे उत्पन्न कमी असेल. अशा सर्व गोष्टी तुम्हाला जर लागू होत असतील तर तुम्हाला “टर्म इन्शुरन्स” चा विचार करणे गरजेचे आहे.

कारण आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम करणे हे आपले कर्तव्य आहे.की जेणेकरून आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाची कोणत्याही प्रकारचे हाल होणार नाहित.

म्हणून आजच्या या लेखांमध्ये आपण “टर्म इन्शुरन्स “बद्दल सर्व माहिती सांगणार आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स महत्त्वाचा आहे की नाही? टर्म इन्शुरन्स कधी काढला पाहिजे? टर्म इन्शुरन्स कुठून काढला पाहिजे? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. चला ,तर मग या ज्ञानमय प्रवासाला आपण सुरुवात करूयात!!!

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? Term insurance information in Marathi

आयुर्विम्यातील एक प्रमुख विमा प्रकार म्हणून टर्म इन्शुरन्स कडे पाहिले जाते.

आयुर्विमा याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा म्हणजे कायमस्वरूपी विमा. टर्म इन्शुरन्स हा एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे .टर्म इन्शुरन्स हा एक प्रकारचा विमाच आहे.

टर्म इन्शुरन्सविमा आपल्या कुटुंबाचं ठरलेल्या वेळे करता आर्थिक संरक्षण करत असतो.टर्म हा शब्द येथे खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ठराविक वेळे करता. टर्म इन्शुरन्स काळात जर दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला तर या पॉलिसीच्या नियमानुसार एक मोठी रक्कम ही त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला देण्यात येते.

या विम्यातून दुसऱ्या विम्या सारखा आर्थिक परतावा मिळत  नसल्याने या विम्याकडे अनेक जण पाठ फिरवताना आपल्याला दिसत आहे. आपण या टर्म इन्शुरन्स कडे एक गुंतवणूक म्हणून न बघता आपल्या कुटुंबाचे एक संरक्षणाचे साधन म्हणून बघितले पाहिजे.

विमा कालावधीत जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला भरघोस रक्कम ही प्राप्त होत असते. परंतु विमा कालावधीत जर विमा  धारक हा हयात असल्यास विमा कंपनीकडून कोणत्याही स्वरूपात परतावा मिळत नाही. यामुळे बरेच लोक या विम्याला प्राधान्य देत नाहीत.

टर्म इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आर्थिक परतावा मिळत नसला तरीही अन्य पॉलिसीच्या तुलनेत याचे विमा कवच खूप मोठे असते.

उदाहरणार्थ एका व्यक्तीने आपल्या वयाच्या 30 व्या वर्षी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतला. त्या टर्म इन्शुरन्स चा कालावधी हा 60 वर्षाचा असून. तो व्यक्ती जर दुर्दैवाने आपल्या वयाच्या 40 व्या वर्षी मरण पावला तर विमा कंपनी त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला त्याच्या विम्याची 1 कोटी रक्कम अदा करते. म्हणजे विचार करा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला केवढी मोठी रक्कम प्राप्त होते. त्या रकमे मधून त्याच्या मुलांचे शिक्षण, लग्न अशा अनेक गोष्टींसाठी आर्थिक मदत मिळते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची कोणतीही आर्थिक आबाळ होत नाही. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता टर्म इन्शुरन्स ही एक काळाची गरज बनली आहे.

टर्म इन्शुरन्स मध्ये कोणताही मॅच्युरिटी बेनिफिट मिळत नाही. मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजे तुमची पॉलिसी संपल्यावर मिळणारी रक्कम

टम इन्शुरन्स पॉलिसी चा कालावधी किती असावा?

जेवढे जास्त कालावधीसाठी आपण टर्म पॉलिसी घेतो तेवढया कालावधी करिता आपण आपले कुटुंब हे सुरक्षित करत असतो. आपण जेवढया जास्त कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स घेतो. तेवढी आपली वार्षिक प्रीमियम रक्कम वाढत जात असते.

टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम आपण वेगवेगळ्या पद्धतीने भरू शकतो. जसे की प्रत्येक वर्षाला,प्रत्येक सहा महिन्याला,प्रत्येक तीन महिन्याला किंवा प्रत्येक महिन्यालाही आपण आपला टर्म इन्शुरन्स प्रीमियम भरू शकतो.

टर्म इन्शुरन्स चे फायदे

टर्म इन्शुरन्स हे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला मिळणारे एक सुरक्षा कवच असते. टर्म इन्शुरन्स ही एक स्वस्त अशी पॉलिसी आहे.

दुसऱ्या विमा पॉलिसीच्या तुलनेत टर्म इन्शुरन्स योजना ही सहज परवडणारा असा विमा आहे.

आपण आपल्या वयाच्या जेवढ्या लवकर हा विमा घेऊ तेवढा आपल्याला बसणारा प्रीमियम हा कमी रकमेचा असेल. म्हणजेच कमी प्रीमियम मध्ये आपल्याला मोठ्या रकमेचा फायदा होतो. टर्म इन्शुरन्स प्लॅनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती समजण्यास अगदी सोपी आहे.

टर्म इन्शुरन्स मध्ये आपल्या मृत्यूनंतर बरेच फायदे आपल्या कुटुंबाला होत असतात.जसे की, आपण एखादे घर,गाडी किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते भरत असाल व तुमच्या मृत्यूनंतर तुमचे हे हप्ते तुमच्या कुटुंबाला भरावे लागतात.

त्यावेळेस टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही महत्त्वाची भूमिका बजावत असते .आपल्या दुर्दैवी निधनानंतर ही टर्म पॉलिसी आपल्या कुटुंबाला एक रकमी रक्कम मिळून देत असते.

काही टर्म पॉलिसी या आपल्याला एक रकमी रकमेसह मृत्यू लाभ म्हणून मासिक उत्पन्न मिळवण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ जर आपला प्लॅन हा 1कोटीचा असेल तर आपल्याला 0.5% मासिक उत्पन्न असे 10 वर्षांसाठी मिळेल.

म्हणजेच महिन्याला 50000 रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये सतत वाढणाऱ्या उत्पन्नाचा पर्याय देखील आहे. दरवर्षी मासिक उत्पन्न वाढते म्हणजे पुढच्या वर्षी ते 50000 वरून 55000 तर तिसऱ्या वर्षी ते 60500 वगैरे होईल.

त्यामुळे मासिक उत्पन्नासह आपल्या कुटुंबाला नियमित खर्च व्यवस्थापन करणे सोपे होते.

टर्म पॉलिसीमध्ये संयुक्त पॉलिसी घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. यामध्ये तुम्ही पती आणि पत्नी असी दोघेही एकाच टर्म प्लॅनचा भाग असू शकतात.

टर्म पॉलिसीमध्ये आपण एकापेक्षा जास्त लोकांना नॉमिनी बनवू शकतो. उदाहरणार्थ पती आपल्या पत्नीला व त्याच्या मुलांना नॉमिनी बनवू शकतो व त्या अनुषंगाने ती विम्याची रक्कम विभागली जाते.

टर्म इन्शुरन्स मध्ये अपघात व दुर्गम आजार जोखीमही समाविष्ट आहे.

टर्म पॉलिसीमध्ये अपघाती संरक्षण देखील समाविष्ट करण्यात आले आहे. जर विमा घेतलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या विमाधारकांना निश्चित अशी रक्कम दिली जाते. जर विमाधारकाला अपघातात तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व आले तरी देखील संरक्षण उपलब्ध होत असते.

टर्म इन्शुरन्स घेतलेली व्यक्ती जर एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याला निश्चित निधी मिळू शकतो .परंतु त्यासाठी विमाधारकाने पॉलिसी घेण्याच्या आधी आपल्या आजाराविषयी व आपल्याला असणाऱ्या व्यसनाविषयी माहिती देणे गरजेचे आहे.

विमाधारक हा गंभीर आजारामुळे जर शेवटच्या टप्प्यात असेल तर विमा कंपनी त्याच्या मृत्यूपूर्वी विमा संरक्षणाचा काही भाग किंवा पूर्ण देत असते.

विमाधारक हा गंभीर आजारामुळे किंवा अपंगत्वामुळे आपला प्रीमियम भरू शकत नसेल तर विमा कंपनी स्वतः आपला प्रीमियमचा भार उचलते. अशा परिस्थितीत पॉलिसी पेड अप पॉलिसी म्हणून चालू राहते.

टर्म इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आपल्याला जर आपले भरलेले प्रीमियम परत मिळवायचे असेल तर,आपल्याला प्रीमियम रिटर्न प्लॅन घ्यावा लागेल.

आपण जर आपली निश्चित मुदत पूर्ण होईपर्यंत जिवंत राहिलात तर कंपनी तुम्हाला प्रीमियम परत करते .तथापि या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणारी खात्रीशीर रक्कम ही नियमित मुदतीच्या योजनेपेक्षा कमी असेल.

टर्म इन्शुरन्स कधी काढला पाहिजे.

आपण आपल्या वयाच्या जेवढ्या लवकर टर्म इन्शुरन्स काढू तेवढे चांगले असते.

आपण आपल्या वयाच्या जेवढ्या लवकर टर्म इन्शुरन्स काढू तेवढा आपल्याला प्रीमियम कमी पडतो. म्हणजे आपण आपल्या वयाच्या 25 ते 30 वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे.जर आपले वय जास्त असेल तर आपल्याला बसणारा प्रीमियम हा जास्त असेल.

आपल्याला जर एखादा आजार किंवा व्यसन असेल तर आपल्याला निरोगी किंवा निर्व्यसनी व्यक्ती पेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागतो.

टर्म इन्शुरन्स किती काढावा?

टर्म इन्शुरन्स हा आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी 20 पट जास्त असावा.

आपले वार्षिक उत्पन्न जर एक लाख असेल तर आपण टर्म इन्शुरन्स कव्हर हा कमीत कमी दोन लाख असावा. जर आपले वार्षिक उत्पन्न दहा लाख असेल तर आपला टर्म इन्शुरन्स कव्हर हा दोन करोडचा असावा. टर्म इन्शुरन्स कव्हर म्हणजे तुमच्या नंतर मिळत असलेली रक्कम ही तुमच्या परिवाराला मिळत राहील.

टर्म इन्शुरन्स कोठून काढला पाहिजे?

टर्म इन्शुरन्स हा आपण ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने काढू शकतो. ऑफलाइन टर्म इन्शुरन्स काढला तर आपल्याला तो जास्त महागात जातो.कारण तो इन्शुरन्स आपल्याला एजंट मार्फत काढला जातो.तेव्हा त्या मध्ये एजंटचे कमिशन आपल्याला द्यावे लागते.

ऑनलाइन टर्म इन्शुरन्स काढण्यासाठी सुरक्षित असा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तो म्हणजे “पॉलिसी बाजार”. या पॉलिसी बाजार वर आपल्याला ऑनलाइन  वेगवेगळ्या पॉलिसीज काढून मिळतात. येथे आपण स्वतःच आपला फॉर्म भरू शकतो. येथे कोणताही एजंट मध्ये नसतो.

आपल्या पश्चात जर आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण द्यायचे असेल तर,आपल्याला टर्म पॉलिसी करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला वरील माहितीवरून कळेलच असेल.

त्यामुळे प्रत्येकाने आपली टर्म पॉलिसी काढून घेणे काळाची गरज बनलेली आहे.आपल्याला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र परिवाराला नक्कीच शेअर करा.

धन्यवाद!!!!

Also read :

Leave a Comment