Home Loan Information in Marathi | होम लोन मराठी माहिती

Home Loan Information in Marathi: नमस्कार मंडळी, कसे आहात मजेत ना! मंडळी आपण दिवसभर कितीही हिंडलो फिरलो तरी संध्याकाळ झाली की ,पावले आपोआप जिकडे वळतात ती जागा म्हणजे घर ! अहो घर म्हणजे काय फक्त दगड, विटा, चुना यांच्या पासून बनवलेल्या चार भिंती आणि छत असते होय?

अहो घर म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आपलेपणाची जाणीव, मायेची उब. आपल्या हक्काचं छप्पर आईचं अस्तित्व आणि वडिलांचा खंबीर पाठिंबा…

मंडळी स्वतःचं घर असणं हे प्रत्येक जीवाचे स्वप्न असतं. घराबद्दलच्या आशा ,अपेक्षा, स्वप्न ही व्यक्ती परत्वे बदलत जातात. मात्र आपल्या हक्काचे एक घर असावं अशी अपेक्षा मात्र प्रत्येक जणच ठेवून असतो.

मात्र आजच्या या महागाईच्या काळात घर खर्च चालवून घरासाठी पैसे जमवणे म्हणजे एक दिव्यच झाले आहे.

मित्रांनो ,आपल्या हक्काच्या घरासाठी प्रत्येकच व्यक्ती पै पै जोडत असतो. काही लोक यासाठी कर्जाचा मार्ग अवलंबतात. मात्र समाजातील बहुतांश लोक गृह कर्ज काढण्यासाठी धजावत नाहीत आणि याचे मुख्य कारण म्हणजे गृहकर्जा विषयी असणारी अपुरी माहिती आणि जन माणसातील गैरसमज होय. पण मित्रांनो, आता चिंता करू नका आम्ही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव आपल्या पाठी आहोत.

अहो गृह कर्ज म्हणजे तरी काय? घर घेण्यासाठी अथवा घेण्यात येणारे कर्ज होय. यासाठी गृह कर्जाचे व्याजदर, मुदत परतफेडीची पद्धत, ठरवून दिलेल्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याबाबतीत व्यवस्थित माहिती मिळवली की गृह कर्ज घेणे अतिशय सोपे होऊन जाते.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही आपल्याला गृह कर्जाविषयी अगदी ए टू झेड संपूर्ण माहिती पुरविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आशा आहे हा लेख संपूर्ण वाचल्यानंतर आपल्याला गृह कर्जाविषयी कुठलीही शंका-कुशंका राहणार नाही चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात गृह कर्ज याविषयी…

होम लोन म्हणजे काय ? Home Loan Information in Marathi

एखादी बँक किंवा संस्था आपल्याला घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी जे कर्ज देते त्याला आपण “गृह कर्ज” म्हणजेच “होम लोन” असे म्हणतो.

बँकेकडे आपण एखादी मालमत्ता तारण ठेवून घर खरेदीसाठी सुरक्षित असे कर्ज घेत असतो.

होम लोन हे फक्त नवीन घर घेण्यासाठी दिले जात नाही तर, अनेक कारणांसाठी होम लोन हे दिले जाते. जसे की ,घराची दुरुस्ती करणे, घराचे नूतनीकरण करणे, जमीन खरेदी करणे अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला होम लोन दिले जाते.

घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी बँक आपल्याला  रकमेच्या स्वरूपात एक  प्रकारची आर्थिक मदत करत असते व त्या रकमेवर बँक आपल्याकडून एक ठराविक रक्कम व्याज म्हणून घेत असते.

होम लोन मध्ये जोपर्यंत आपण कर्जाचे हप्ते फेडत नाही म्हणजेच जोपर्यंत आपले कर्ज फिटत नाही. तोपर्यंत आपली मालमत्ता ही बँकेकडे गहाण राहते. जर आपण वेळेवर आपले व्याज व कर्ज भरले नाही तर बँक आपली  मालमत्ता जप्त करते.

  • होम लोन घेण्यासाठी पात्रता
  • होम लोन घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय असावा.
  • कर्जदाराचा  क्रेडिट स्कोर हा 750 किंवा त्यापेक्षा जास्त असावा.
  • वयोमर्यादा ही 18 ते 70 वर्ष असावी.
  • अर्जदार हा नोकरी करत असेल तर त्याचा कामाचा अनुभव किमान 2 वर्षाचा असावा. अर्जदार स्वयंरोजगार म्हणजेच व्यवसायिक असेल तर त्याचा व्यवसाय हा किमान तीन वर्ष जुना असावा.
  • अर्जदाराचे किमान वेतन हे दरमहा 25000 रुपये असावे.

होम लोन घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड ,मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट ,नोकरी करत असलेल्या ठिकाणाचे ओळखपत्र.
  • पत्ता संदर्भात पुरावे, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, विज बिल, दूरध्वनी बिल इत्यादी.
  • नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींसाठी
  • मागील तीन महिन्यांची पगार स्लिपची मूळ प्रत.
  • दोन वर्षाचा आयकर परताव्याची प्रत किंवा फॉर्म नंबर 16 ची प्रत. ज्या बँकेमध्ये अर्जदाराची खाती आहेत. त्या खात्यांचे सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
  • व्यवसाय करत असणाऱ्या व्यक्तींसाठी जे व्यवसाय करतात त्यांचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ऑडिट रिपोर्ट ,उत्पन्न इत्यादी बाबी समाविष्ट असलेल्या मागील तीन वर्षाचा आयकर परतावा.
  • शॉप एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट.
  • कर नोंदणीची प्रत.
  • कंपनी नोंदणी परतावा.
  • मागील एक वर्षाचे बँक स्टेटमेंट.
  • मालमत्तेच्या संबंधित कागदपत्रे
  • बिल्डर कडून एनओसी.
  • बांधकाम खर्चाचा तपशील. नोंदणी कृत विक्री करार.
  • इमारत योजना मंजूर प्रत.

गृह कर्ज घेताना कर्जदाराला जामीनदार लागत असतात. ते जमीनदार जर नोकरी करत असतील तर, जामीनदारांची सुद्धा तीन महिन्यांची पगार स्लिप, केवायसी पूर्तता व आयकर परताव्याची प्रत व 16 नंबरचा फॉर्म ची प्रत.

होम लोन चे फायदे

गृह कर्जाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण हे कर्ज घेऊन आपले स्वप्नातले घर साकार करू शकतो.

होम लोन कर्जाचा व्याजदर हा सामान्य माणसाला परवडणारा असा असतो.

होम लोन घेतल्यानंतर आपल्याला कर्ज परतफेडीसाठी मिळणारा कालावधी हा जास्त वर्षांचा म्हणजे तो जवळपास 25 ते 30 वर्षाचा असतो .

आगाऊ भरलेल्या रकमेवरती आपल्याला दंड बसत नाही .

होम लोन मुळे आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये ही काही प्रमाणात सवलत मिळू शकते.

आपण जर एखाद्या बँकेत होम लोन घेतले असेल व त्या बँकेचे व्याजदर दुसऱ्या बँकेच्या व्याजदरापेक्षा खूप जास्त असेल. तर आपण आपली होम लोन ची राहिलेली रक्कम कमी व्याजदर असलेल्या बँकेकडे स्थलांतरीत करू शकतो.

काही बँका या मागास महिला, बँक कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांना होम लोन या व्याजदरात 0.05% अशी सवलत देत असतात..

होम लोन घेण्यासाठी कर्जदाराला काही शुल्क आकारावे लागते ते पुढील प्रमाणे

होम लोन घेताना कर्जदारासाठी व्याज किती आहे हे पाहणे महत्वाचे आहे तसेच होम लोन घेताना आपल्याला कोणते कोणते शुल्क आकारले जाईल याचीही माहिती असणे गरजेचे आहे.

  • फॉर्म फी

होम लोन घेण्यासाठी आपण होम लोन चा अर्ज भरतो. त्या अर्जाचे शुल्क बँकेकडून आकारले जाते.

  • प्रक्रिया शुल्क

यालाच आपण प्रोसेसिंग फी असे म्हणतो. प्रोसेसिंग फी ही क्रेडिट मूल्यांकनावर झालेल्या खर्चासाठी असते .ही प्रोसेसिंग फी ही कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइल, उत्पन्न व गृह कर्ज योजनेवर अवलंबून असते.

  • प्रशासकीय शुल्क

हे प्रशासकीय शुल्क कर्जाच्या मंजुरीनंतर आकारलेले जाते.

  • फोरक्लोजर फी

आपण जर आपले होम लोन हे आपल्या मुदतीच्या अगोदर भरले तर बँका या प्री पेमेंट पेनल्टी किंवा फोरक्लोजर फी आकारत असत. परंतु आरबीआय ने फ्लोटिंग रेट होम लोन वर प्री पेमेंट पेनल्टी लावण्यापासून बँकांना निर्बंध घालून दिले आहेत. जोपर्यंत फिक्स रेट होम लोन चा प्रश्न आहे. तेथे काही बँका हे शुल्क आकरतात.

  • पेमेंट मोड मध्ये बदल

कर्ज कालावधी मध्ये जर कर्जदाराने त्याच्या पेमेंट मोडमध्ये बदल करण्याची विनंती केली तर, हे शुल्क आकारले जाते. हे शुल्क साधारणपणे 500 रुपये असते. प्रत्येक बँकेनुसार हे शुल्क बदलत असते

  • ईएमआय वर अतिरिक्त शुल्क

जर कर्जदार ईएमआय भरण्यास असमर्थ असेल किंवा तो आपला ईएमआय उशिरा भरतो. तेव्हा या थकबाकी केलेल्या ईएमआय वर अतिरिक्त शुल्क आकारले जाते. त्यामुळे आपला ईएमआय वेळेवर भरणे गरजेचे आहे.

  • ईएमआय बाउन्स फी

ज्यावेळेस आपला कर्जाचा हप्ता वसूल होणार असतो. तेव्हा आपल्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम शिल्लक शिल्लक असणे गरजेचे असते. जर आपल्या बँक खात्यामध्ये उर्वरित रक्कम अपुरी असेल तर आपण कर्जाचा हप्ता वेळेवर भरू शकत नाही म्हणजेच आपल्या चेक हा बाउन्स होतो तेव्हा ही बाउन्स फी आकारली जाते.

त्यामुळे ज्या तारखेला आपला हप्ता वसूल होनार आहे. त्याच्या आधी आपल्या बँकेत आपल्या खात्यावर रक्कम असणे गरजेचे आहे.

  • कायदेशीर शुल्क

बँकेला होम लोन देताना काही सल्लागारांची मदत घ्यावी लागते. तेव्हा हे कायदेशीर शुल्क भरावे लागते. म्हणजेच यामध्ये वकिलांच्या फीचा समावेश असतो.

होम लोनचे प्रकार

आपल्याला तर माहीतच आहे की, होम लोन हे फक्त घर बांधण्यासाठी नव्हे तर इतर कारणांसाठी ही दिले जाते. उदाहरणार्थ घर बांधणे, जमीन घेणे ,घराचे नूतनीकरण करणे, अशा अनेक गोष्टींसाठी घर होम लोन हे दिले जाते.

1. जमीन खरेदीसाठी कर्ज

अनेक बँका या जमीन खरेदीसाठीही कर्ज देत असतात. हे कर्ज बँक जमिनीच्या किमतीच्या 85% कर्ज देते.

2. घर खरेदी करिता कर्ज

आपल्याला जर एखादे नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करायचे असेल तर बँकेचे कर्मचारी आपण ठरवलेल्या घरी किंवा फ्लॅटमध्ये जातात. ते अधिकारी आपल्या घराचे अथवा फ्लॅटचे मूल्यांकन करून आपल्याला किती लोन द्यायचे आहे हे ठरवतात. बँक आपल्याला 80 ते 90 % रक्कम देते.

कर्जाची रक्कम ही बिल्डर किंवा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अकाउंटला जमा होत असते. जोपर्यंत कर्जाचे हप्ते पूर्ण होत नाही. तोपर्यंत आपल्या घरावर बँकेचा ताबा असतो. बँकेकडे आपले घर हे गहाण राहते. कर्ज पूर्ण फिटल्यानंतर बँकेकडून आपल्याला एनओसी दिली जाते.

जर आपल्याला सेकंड हॅन्ड घर किंवा प्लॅट घ्यायचा असेल तर बँक ही आपल्याला मूळ किमतीच्या 90% पर्यंत लोन देते.

3. घराच्या बांधकामासाठी दिले जाणारे कर्ज

आपल्याकडे जर जमीन असेल व त्या जमिनीवर आपल्याला घर बांधायचे असेल तर आपल्याला त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी बँक कर्ज देत असते. पण जोपर्यंत आपण आपले कर्ज फेडत नाही तोपर्यंत ती जागा व त्यावर बांधलेले घर हे बँकेकडे गहाण राहते.

4. घराचे नूतनीकरण करण्यासाठी देण्यात येणारे कर्ज.

आपले जर जुने घर असेल व त्या घराचे आपल्याला नूतनीकरण करायचे असेल किंवा वाढ करायची असेल तर त्यासाठी सुद्धा बँकेकडून आपल्याला कर्ज दिले जाते.

5. बॅलन्स ट्रान्सफर होम लोन

जर एखाद्या व्यक्तीला कमी व्याजदर किंवा इतर बँकेत देत असलेल्या चांगल्या सेवा इत्यादी कारणामुळे त्याचे असलेले  होम लोन हे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करायचे असेल तेव्हा या पर्यायाचा लाभ घेता येतो. या पर्यायांमध्ये उर्वरित कर्जाची परतफेड करून कमी व्याजदर असलेल्या बँकेकडे होम लोन हस्तांतरित  होते.

6. NRI होम लोन

अनिवासीय भारतीयांना जर भारतामध्ये निवासी मालमत्ता खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हे कर्ज असते. या कर्जाची औपचारिकता व प्रक्रिया इतरांपेक्षा वेगळी असते.

7. स्टॅम्प ड्युटी कर्ज

आपण जेव्हा एखादी मालमत्ता खरेदी करतो. तेव्हा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी स्टॅम्प ड्युटी कर्ज हे दिले जाते.

होम लोन घेण्यासाठी काही गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे होम लोन घेण्यासाठी प्रत्येक बँकेचा व्याजदर तपासणे गरजेचे आहे. ज्या बँकेचा व्याजदर कमी आहे अशा बँकेत तुम्ही होम लोन करू शकता.

तसेच होम लोन घेताना आपला क्रेडिट स्कोर हा चांगला असावा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेणेकरून आपला जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर कोणतीही बँक आपल्याला हसत हसत होम लोन देते. होम लोन घेताना प्रत्येक गोष्टीची खातरजमा करणे गरजेचे आहे. शक्यतो होम लोन करताना विश्वसनीय बँकेतच होम लोन करावे.

  • SBI BANK.
  • ICICI BANK.
  • BANK OF MAHARASHTRA.
  • KOTAK MAHINDRA.
  • HDFC BANK.

वरील बँका या आपल्याला होम लोन देत असतात. तसेच जिल्हा बँका व पतसंस्था ही आपल्याला होम लोन देतात.

आमच्या या लेखात आम्ही दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल ही आशा आहे. आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्ही आपले घराचे स्वप्न साकार करू शकता. जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करा.

धन्यवाद!!!!

Leave a Comment