मराठी शायरी
Dear loved one reader…
Welcome to our blog. this blog is about Marathi Shayari. you can read it in three segments – Marathi Shayari for friends, Marathi Shayari for love & funny Marathi Shayari.
आजच्या डिजिटल जगात मराठी भाषा कुठेतरी हरवत चालली आहे. लोक मराठी वाचायचा, लिहायचा कंटाळा करत असतात. पण जर तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसाला आपुलकीच्या शब्दात भावना व्यक्त करायच्या असतील तर मराठीला पर्याय नाही’. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मराठी मध्ये शुभेच्छा संदेश व शायरी घेऊन आलो आहोत . वाचा व शेयर करा.
table of content –
१) Marathi Shayari for Friends –
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
🌺🌺🌺
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”
🌺🌺🌺
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
🌺🌺🌺
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.
🌺🌺🌺
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
🌺🌺🌺