[2024] विमा संपूर्ण माहिती मराठी । Insurance Information in Marathi

Insurance Information in marathi : नमस्कार मित्रांनो ,कसे आहात मजेत ना ! मित्रांनो, असं म्हटलं जातं की, आयुष्य हा पाण्यावरील बुडबडा आहे कधी फुटेल याचा भरवसा नाही म्हणूनच आजकाल अगदी लहान थोरांपासून सर्व स्तरातील लोक पॉलिसी घेण्यासाठी आग्रही असतात.हेच कशाला अगदी आपल्या निर्जीव वस्तूंच्या काळजीपोटीही लोक इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना दिसतात. आज पॉलिसी जणू काही प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटकच बनला आहे.

मात्र पॉलिसी घेताना प्रत्येकाच्या मनात एक संभ्रम नेहमी असतो की कुठली पॉलिसी घ्यावी? कोणती पॉलिसी नक्कीच चांगली आहे? पॉलिसीचे विविध प्रकार काय? हा सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे आणि आपला हाच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्यासाठी आजच्या हा लेख घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसी बद्दल इत्यंभूत माहिती मिळावी हा आमचा उद्देश आहे .तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा व आपल्या ज्ञानात भर पाडा.

विमा म्हणजे काय? । Insurance Information in marathi

विमा हे एक असे साधन आहे जे आपल्याला आर्थिक नुकसान होण्यापासून संरक्षण देत असते. विमा भविष्यासाठी आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, विमा हा एक करार असतो जो विमा कंपनी व विमेदार यांच्यात झालेला असतो. विमा म्हणजे एक अशी सुविधा असते की ज्यामध्ये आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर काही समस्या आल्या म्हणजे आजारपण किंवा अपघात यामुळे अकस्मात मृत्यू झाला तर विमा कंपनी ही त्यांच्या कुटुंबांना विम्याच्या स्वरूपात रक्कम देण्याचे वचन देत असते.

त्या कंपनीला आपण नियमितपणे त्यांनी ठरवून दिलेले हप्ते द्यायचे असतात व त्या बदल्यात आपल्याला मध्येच आजारपण किंवा अपघात यामुळे मृत्यू झाला तर किंवा एखादी गोष्ट हरवली किंवा मोडली तर कंपनीने भरपाई करायची असा करार म्हणजे विमा!

अशाप्रकारचा करार विमा कंपन्या व विमाधारकांमध्ये झालेला असतो. आपण आपल्या जीवनाचा विमाच नाही तर, आपल्या मौल्यवान वस्तूंचा विमा सुद्धा काढू शकतो. संकटकालीन परिस्थितीत पैशाची तरतूद करणे म्हणजे विमा होय.

विमा ही संकल्पना खूप जुनी असून सर्वात प्रथम व्यापाऱ्यांनी ही संकल्पना अमलात आणली. सर्वात प्रथम हमुरबी कोड नावाची पद्धत बॉबीलोनियम संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी 1756 मध्ये सुरू केली. त्याकाळी मालाची आयात व निर्यात जहाजेतून करण्यासाठी व्यापाऱ्याला कर्ज काढावे लागत असे.

परंतु जर जहाज चोरीला गेले किंवा बुडाले तर त्यासाठी काढण्यात आलेले कर्ज त्या व्यापाराला माफ करण्यात येत होते. परंतु जहाज हे व्यापार करून सुरक्षितपणे परत आले तर मात्र त्या व्यापाऱ्याला कर्जा पेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत असे संकल्पना होती.

भारतामध्ये १९१८ मध्ये कलकत्ता येथे “ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी” सुरू करण्यात आली होती .परंतु 1834 मध्ये ती कंपनी बुडीत झाली. ही कंपनी बुडाल्यानंतर 1871 मध्ये मॅच्युअल, 1874 मध्ये ओरिएंटल व 1897 मध्ये एम्पायर ऑफ इंडिया या वेगवेगळ्या कंपन्या सुरू करण्यात आल्या.

या कंपन्यांपैकी सध्या अस्तित्वात असलेली सर्वात जुनी कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी 1906 मध्ये सुरू झाली. विमा हा शब्द पार्शियन भाषेतून आला असून विमा याचा अर्थ जबाबदारी घेणे असा आहे .प्राचीन ग्रंथांमध्ये जसे की,मनुस्मृती, याज्ञव्यल्क्य स्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये विम्याचा उल्लेख आढळून येतो.

‘योगक्षमं वहाम्यहम्’ हे भारतीय जीवन विमा निगमचे घोषवाक्य असून ते मनुस्मृतीमधूनच घेतले आहे.

विम्याचे महत्त्व व फायदे | Importance of Insurance

आपण जर एखादी विमा योजना घेतली तर, आपण केलेल्या बचतीस प्रोत्साहन मिळते. कारण विमा योजनेमध्ये आपण जी बचत करतो ती मुदतीपूर्वी सहज काढता येत नाही. तसेच विम्याचे हप्ते हे तीमाही ,सहामाही व वार्षिक अशा स्वरूपात ठरलेल्या असतात.

त्यामुळे ते हप्ते आपल्याला नियमित भरावेच लागतात. त्यामुळे आपण काटकसर करून तो हप्ता भरतोच म्हणजे एक प्रकारे आपली बचतच होते असते. म्हणजे आपल्याला बचतीची व काटकसरीची सवय लागते.

तसेच विमा हा एक प्रकारचा व्यवसाय असून या व्यवसायातून बऱ्याच लोकांना रोजगार निर्माण होतो. कारण विमा योजनेची समाजामध्ये जनगजागृती करण्यासाठी तसेच लोकांपर्यंत विमा बाबत संपूर्ण माहिती पोहोचण्यासाठी विमा कंपन्या या विमा प्रतिनिधी, अधिकारी वर्ग, प्रशासकीय कर्मचारी यांची नेमणूक करतात.

तसेच प्रत्येक कंपनी ही विमा एजंट निवडत असते .जी लोकांपर्यंत विमा योजना पोहोचवून त्यांना विमा पॉलिसी घेण्याबाबत प्रोत्साहित करत असते अशा प्रकारे भरपूर लोकांना या विमा कंपन्या द्वारे रोजगार उपलब्ध होत असतं. तसेच व्यापार व उद्योगांनाही विमा संरक्षण मिळत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार व मोठे मोठे व्यवसाय सुरू करण्याचे धाडस  व्यावसायिक व उद्योजक करत असल्यामुळे व्यापार व उद्योगांना चालना मिळाली असून त्यामध्ये सर्वांगीण विकास होऊ लागला आहे .

आजच्या आधुनिक युगात व्यापाऱ्यात किंवा उद्योगामध्ये धोक्यांचे व नुकसानीचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु विमा कंपन्या या नुकसान भरपाई देत असल्यामुळे व्यवसायात विकास  होताना आपल्याला दिसत आहे.

भारत हा आपला कृषिप्रधान देश आहे .शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असते .कधी शेतकऱ्याला ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते तर कधी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते .त्यामुळे अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते.

परंतु जर पीक विमा काढला असेल तर ती सर्व नुकसान भरपाई विमा कंपन्या भरून देते. तसेच पशुपालन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग अशा शेतीपूरक उद्योगांना सुद्धा विमा संरक्षण मिळाल्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास होत आहे म्हणून एक प्रकारे विमा हा आपल्या प्रत्येका साठी एक सुरक्षा कवचाचे काम करत आहे .त्यामुळे विम्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

म्हणजेच विम्यामुळे आपल्याला बचतीची सवय लागते. भविष्यासाठी आपण वर्तमानामध्येच आर्थिक नियोजन करू शकतो. त्यामुळे आपली भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एक प्रकारे आर्थिक नियोजन करतो .व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळते.

विम्याचे प्रकार | Types of Insurance

विम्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे “जीवन विमा” ज्याला आपण लाइफ इन्शुरन्स असे म्हणतो.दुसरी म्हणजे “सर्वसाधारण विमा” ज्याला आपण जनरल इन्शुरन्स असे म्हणतो.

 • जीवन विमा पॉलिस

या पॉलिसीमध्ये विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यात एक प्रकारचा करार झालेला असतो. जसे की ,कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास विमा कंपनी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला विमा रक्कम देत असते.ही विमा पॉलिसी त्या कुटुंबासाठी एक आर्थिक संरक्षण ढाल म्हणून काम करत असते.

प्रत्येक कुटुंबात अशी एक व्यक्ती असते ज्यावर सर्व कुटुंब अवलंबून असते. त्या कमवत्या व्यक्तीवर त्याचे आई, वडील, पत्नी ,मुले यांचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे आपल्या नंतर आपल्या कुटुंबासाठी भविष्यात आर्थिक नियोजन करून पैशाची तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आजची परिस्थिती पाहता कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याची हमी राहिलेली नाही .

त्यामुळे आपल्या कुटुंबीयांसाठी आपल्या पश्चात पैशाची तरतूद करण्यासाठी जीवन विमा ही पॉलिसी खूप फायदेशीर व महत्त्वाची आहे. आपण जेवढ्या कमी वयात टर्म इन्शुरन्स घेऊ तेवढा आपल्याला हप्ता हा कमी बसतो म्हणजे कमी हप्त्यांमध्ये जास्त रक्कम आपण आपल्या कुटुंबाला मिळून देत असतो. लाइफ इन्शुरन्स म्हणजे अशी पॉलिसी आहे की, आपल्याला जरी काही झाले म्हणजे अकस्मात मृत्यू झाला तर या विमा पॉलिसी मुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला एक आर्थिक आधार मिळत असतो.

 1. टर्म इन्शुरन्स पॉलिसी
 2. कम्प्लीट लाइफ इन्शुरन्स प्लॅन
 3. एंडॉमेंट इन्शुरन्स प्लॅन
 4. चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी
 5. पेन्शन स्कीम इन्व्हेस्टमेंट प्लॅन
 6. युनिट लिंक इन्शुरन्स स्कीम
 7. मनी बॅक प्लॅन

असे जीवन विमा पॉलिसी चे अनेक प्रकार आहेत.

 • सामान्य विमा

या विम्यामध्ये अपघाती विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, गृह विमा, प्रवास विमा ,पिक विमा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प् विमा पॉलिसी येतात.

 • अपघात विमा पॉलिसी

अपघाती विमा पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा असा असतो की, अपघात झाल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. सर्व खर्च हा विमा पॉलिसी कंपनी देते .जर पॉलिसी धारकाचा अपघात झाल्यास किंवा दुखापत झाल्यास होणारा दवाखान्याचा खर्च हा विमा कंपनी देत असते.

 • आरोग्य विमा

आरोग्य विमा ज्याला आपण मेडिक्लेम असे म्हणतो. या पॉलिसीमध्ये पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित अशी ही पॉलिसी असते. आपण आजारी पडल्यानंतर रुग्णालयातील प्रवेश ,औषधे व ऑपरेशनचा खर्च हा विमा कंपनी करत असते . आजची परिस्थिती पाहता ही पॉलिसी खूप महत्त्वाची झालेली आहे .कारण आज-काल व्यक्तीचे आरोग्य हे अनियमित खाण्यापिण्यामुळे व प्रदूषणामुळे  कसे राहील याची शाश्वती राहिलेली नसल्यामुळे ही आरोग्य विमा पॉलिसी खूप उपयुक्त ठरत असते. दवाखान्याचा खर्च हा सामान्य माणसाला परवडणारा नसतो .अचानक दवाखान्याची समस्या उद्भवली तर पैशाची तरतूद करणे कधी कधी अशक्य होते .त्यामुळे मेडिक्लेम ही योजना सर्वात उपयुक्त असून ही काळाची गरज बनलेली आहे.

 • वाहन विमा

आपल्याकडे चार चाकी व दोन चाकी अशा गाड्या असतात. त्या गाड्यांना कधी कधी अपघातही होऊ शकतो किंवा चोरीसही जाऊ शकतात .ही विमा पॉलिसी काढली तर आपल्याला आपले झालेले नुकसान विमा कंपनी भरून देत असते. जसे की, आपल्या गाडीचा अपघात झाला व त्या गाडीचे नुकसान झाले तर तो खर्च विमा कंपनी देत असते.

कारण वाहन ही सुद्धा आपल्या घरातील एक मौल्यवान वस्तू आहे.

 • गृह विमा

गृह विमा म्हणजेच होम इन्शुरन्स या पॉलिसीमध्ये आपण एक प्रकारे घराचा विमा काढत असतो. म्हणजे जसे की, घर कोसळणे, आग लागणे अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे जे नुकसान होते. त्या नुकसानाची भरपाई सुद्धा विमा कंपनी करून देत असते.

 • प्रवास विमा

प्रवास विमा यालाच आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स असे म्हणतो. या पॉलिसीमध्ये आपण आपल्या कुटुंबासोबत किंवा एकटे प्रवास करत असाल. अशा परिस्थितीत प्रवासात विलंब झाल्यास किंवा प्रवास रद्द झाल्यास किंवा प्रवासादरम्यान अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देत असते.

पिक विमा किंवा शेतकरी विमा आपला भारत हा कृषिप्रधान देश असून शेती ही निसर्गावर अवलंबून असते. कधी शेतकऱ्याला ओव्या दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो .अशा वेळेस पीकविमा पॉलिसी काढली तर होणाऱ्या पिकांचे नुकसान हे विमा कंपनी भरून देत असते.

वर दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी अशा करतो, हि विमा पोलिसी मराठी माहिती (insurance information in marathi) तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद!!!

Also Read : Home Contents Insurance

Leave a Comment