प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती | Mudra Loan Information in Marathi

Mudra Loan Information in Marathi: नमस्कार मित्रांनो, कस काय, मजेत ना! मित्रांनो, आज कालच्या युगात पैसा हा जगण्या मारण्याचा महत्त्वाचा पैलू झालेला आहे. कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक ठिकाणी पैसा हाच गरजेचा  ठरलेला आहे. पैसा कमवण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न होताना दिसतात. त्यासाठी लोक विविध मार्ग अवलंबतात. ज्यामध्ये नोकरी, शिक्षक ,शेती व्यवसाय, कंपन्या इत्यादींपासून अगदी सेवा क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रात लोक काम करून पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

स्वभाव गुणाानुसार मानव मूलतः जन्मतःच महत्वकांक्षी आहे. अधिक पैसा मिळवून सुखी आयुष्य जगावे हा प्रत्येकाचाच हेतू असतो. यासाठी नोकरी करणारा कर्मचारी वर्ग आर्थिक दृष्ट्या अक्षम ठरतो. मग आदर्श ठेवले जातात व्यवसाय क्षेत्रात यशस्वी झालेल्या उद्योजकांचे आणि ते चूकही नाहीये. प्रत्येकाला श्रीमंत होण्याची महत्त्वकांक्षा असतेच. त्यासाठी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे खूप मोठे आशेने पाहिले जाते.

मात्र यासाठी शिक्षण ,अनुभव, कौशल्य, ज्ञान यांबरोबरच महत्त्वाची गोष्ट हवी असते ती म्हणजे भांडवल !! होय मित्रांनो, भांडवला अभावी उद्योग सुरू केल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.मात्र आता सूक्ष्म लघु उद्योगांसाठी सरकारने 2015 सालापासून “प्रधानमंत्री  मुद्रा “योजना सुरू केली आहे. यामध्ये लघु उद्योजक आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी, यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी,  कच्चामाल यांच्या खरेदीसाठी तब्बल दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवले जाऊ शकते.

आज आपण “प्रधानमंत्री मुद्रा योजना 2015” या योजनेबद्दल इत्यंभूत माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला मुद्रा योजनेचे फायदे, महिलांसाठी असणारे विविध डिस्काउंट मुद्रा लोन मिळवण्याची पद्धत, मुद्रा लोनचे दर ,कर्ज मर्यादा, लोन मिळवण्यासाठीची पात्रता इत्यादी विविध विषयांवर इत्यंभूत माहिती देणार आहोत.

मुद्रा लोन म्हणजे काय?

भारतातील लहान व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी व या लहान उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 करोड रुपये भांडवल असलेली “मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी” म्हणजेच मुद्रा बँकेचे उद्घाटन 8 एप्रिल 2015 रोजी केले.

लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी व उद्योगांना आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी सुरू केलेली ही एक वित्तीय संस्था आहे.

या योजनेद्वारे लघु उद्योगांना दहा लाखांपर्यंत कर्ज सहज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी सरकारने 20000 कोटींची तरतूद केलेली आहे. बँकेच्या माध्यमातून लघु उद्योगांना कर्ज दिले जाते.

 या योजनेद्वारे छोट्या कारखानदारांना ,दुकानदारांना त्यांचा नवा उद्योग व काम सुरू करायचे असेल तर कर्ज दिले जाते. तसेच भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, घरगुती खानावळ ,महिला उद्योग छोट्या उद्योगांना सुद्धा लोन दिले जाते.

 मुद्रा बँक ही रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली काम करत असते. 23 मार्च 2018 पर्यंत मुद्रा योजनेच्या माध्यमातून सुमारे 22, 8144 कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.तसेच या योजनेअंतर्गत यावर्षी 23 मार्चपर्यंत 22,0596 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

मुद्रा लोन योजनेचा उद्देश

लघु उद्योजकांना सहज व सुलभ कर्ज मिळवून देणे.

ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चाललेली आहे. या योजनेद्वारे बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय उभारणीसाठी मदत मिळवून देणे.

मध्यमवर्गीय लोकांना कमी व्याजदरात व सुलभ असे कर्ज उपलब्ध करून देणे.

लघु उद्योगांच्या माध्यमातून लोकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरित करणे व रोजगार निर्मिती करणे.

अर्थव्यवस्थेतील असंघटित अशा घटकांना संघटित करणे.

या योजनेचा मुख्य उद्देश हा लघु उद्योगांचा विकास करणे.तसेच उद्योगांचा विस्तार व क्षमता वाढवण्यासाठी कर्ज देने.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे

मुद्रा कर्ज हे विविध कारणांसाठी दिले जाते. त्यामुळे उत्पन्न वाढते व रोजगाराची निर्मिती देखील होते.

असे काही व्यवसाय आहेत. जे व्यवसाय करण्यासाठी वाहनांची सुद्धा गरज भासते. हेच लक्षात घेऊन मुद्रा संस्था वाहतूक कर्ज देखील प्रदान करत असते. जे केवळ व्यावसायिक वापरासाठी असते.

 तसेच मुद्रा ही वित्तीय संस्था लघु उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या मशीनरी घेण्यासाठी ही कर्ज प्रदान करत असते.

 कृषी संबंधित असे बिगर शेती उत्पन्न निर्मिती करणारे उपक्रम जसे की ,कुक्कुटपालन व मच्छी पालन यासाठी ही संस्था कर्ज देत असते.

मुद्रा लोन घेण्यासाठी आपल्याला काहीही तारण ठेवण्याची गरज नसते. कोणत्याही प्रकारचा जामीन लागत नाही. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केली की, आपल्याला मुद्रा लोन मिळत असते.

मुद्रा लोन मध्ये इतर कर्जाप्रमाणे कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

मुद्रा लोन वितरित केल्यानंतर आपल्याला मुद्रा कार्ड म्हणजे एक प्रकारे डेबिट कार्ड दिले जाते. ज्यानुसार आपण आपल्याला लागेल तसे पैसे काढू शकतो.

 या मुद्रा लोनचे व्याजदरही इतर लोन पेक्षा कमी असते. मुद्रा लोन चा कालावधी हा 3 ते 5 वर्ष मर्यादित असतो. त्यामुळे आपल्याला कर्जफेडीसाठी मोठा कालावधी उपलब्ध होतो.

विशेष करून छोटे दुकानदार, फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते अशा छोट्या व्यवसायिकांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा होतो .कारण दुसरे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी भरपूर कागदपत्रे व जामीनदार लागतात. अशा अनेक गोष्टींमुळे त्यांना कर्ज मिळणे अवघड होते. अशा छोट्या उद्योगांसाठी कर्जाची हमी आवश्यक असते. तसेच बँकेतून कर्ज घेण्यासाठी बऱ्याच औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात .त्यामुळे बऱ्याच लोकांना बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होते .पण या योजनेमुळे त्यांना सहजपणे कर्ज मिळू शकते. कारण सरकारनेच त्यांची जबाबदारी घेतलेली असते.

महिला वर्गाला मुद्रा योजनेमध्ये  व्याजदरामध्ये सवलत मिळते.

मुद्रा लोन घेण्यासाठी आवश्यक अशी कागदपत्रे

1.ओळखीचा पुरावा

आधार कार्ड, पॅन कार्ड ,मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट इत्यादी .

2.रहिवासी पुरावा

टेलिफोन बिल, विज बिल ,आधार कार्ड.

3.अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो.

4.जो व्यवसाय किंवा उद्योग आपण करणार आहे त्या संबंधित संपूर्ण तपशील.

5.यंत्रसामुग्री किंवा इतर वस्तू खरेदी करायचे कोटेशन व बिले.

6.जिथून आपण यंत्रसमग्री घेणार आहे त्या पुरवठादाराचे नाव तपशील व इतर माहिती.

7.व्यवसायाचा पत्ता, नोंदणी प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट लायसन.

8.जातीचे प्रमाणपत्र

SC/ST/OBC/ अल्पसंख्यांक इत्यादी सारख्या विशेष श्रेणीशी संबंधित असल्याचा पुरावा.

9.बँक खात्याचे तपशील

10.मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.

11.बँकेची आधार नंबर संलग्न असावा म्हणजेच लिंक असावा.

मुद्रा लोन घेण्यासाठी पात्रता

 मुद्रा कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 65 वर्ष आहे.

 मुद्रा लोन घेण्यासाठी कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो. जसे की, दुकानदार ,छोटे उद्योगपती, व्यवसाय मालक, फेरीवाले,गृहिणी. कोणताही व्यक्ती हा मुद्रा लोन साठी अर्ज करू शकतो.

मुद्रा लोन चा कालावधी

मुद्रा लोन चा कालावधी हा साधारणपणे 3  ते 5 वर्षाचा असतो. हा कालावधी बँकेच्या धोरणानुसार ठरतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार

मुद्रा योजनेत तीन कर्जाचे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे:-

  • मुद्रा योजना कर्ज शिशु वर्ग

 या शिशु कर्ज योजनेमध्ये 50000 रुपयांचे कर्ज मिळू शकते. या कर्जावर प्रत्येक महिन्यासाठी 9% तर वार्षिक 12% असे व्याज आकारले जाते. या कर्जाचा कालावधी 3 ते 5 वर्षापर्यंत असतो.

  • मुद्रा योजना कर्ज किशोर वर्ग

किशोर कर्ज योजनेमध्ये 50000 रुपयांपासून ते 500000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जाच्या व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित होते. या कर्जाचा कालावधी हा बँकेच्या धोरणावर अवलंबून असतो.

  • मुद्रा योजना तरुण वर्ग

या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते या कर्जाचा कर्जाच्या व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वानुसार निश्चित करते कर्जाचा कालावधी बँकेच्या धोरणावर आधारित असतो.

मुद्रा कार्ड

मुद्रा कर्जाच्या मंजुरीनंतर कर्जदाराचे मुद्रा कर्ज खाते उघडले जाते. तेव्हा आपल्याला एक मुद्रा कार्ड मिळते. हे मुद्रा कार्ड एक प्रकारचे डेबिट कार्ड असते. हे मुद्रा कार्ड आपल्याला दैनंदिन व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी देण्यात येते. कर्जाची रक्कम ही बँक खात्यात वितरित केल्यानंतर कर्जदार हा त्याच्या व्यवसायाच्या गरजेनुसार एकूण मंजूर रकमेतून जसे लागेल तसे पैसे काढतो.

मुद्रा या योजनेअंतर्गत पुढील व्यवसायातील उपक्रमांसाठी कर्ज दिले जाते.

 मुद्रा या कर्जाचा वापर ट्रॅक्टर, ऑटोरिक्षा, टॅक्सी ,ट्रॉली ,टीलर, मालवाहतूक करणारी वाहने खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

1. व्यवसाय

सलून ,जिम ,शिवणकाम, वैद्यकीय दुकाने, ड्रायक्लिनिंग,कापड दुकाने इत्यादी सारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी हे मुद्रा लोन दिले जाते.

2. उपक्रम

पापड ,लोणचे, आईस्क्रीम, बिस्किटे, जॅम ,जेली तसेच मिठाई बनवणे यांसारख्या गृह उद्योगांना सुद्धा हे कर्ज दिले जाते.

3. संलग्न उपक्रम

 कृषी व्यवसायादी संबंधित कुक्कुटपालन, मत्स्य पालन, मधमाशी पालन, पशुधन पालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय,मेंढी पालन इत्यादी मधील व्यवसायाशी संबंधित व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन दिले जाते.

महिला उद्योजकांसाठी मुद्रा कर्ज योजना

या योजनेमध्ये नरेंद्र मोदी सरकारने महिला समीक्षीकरणावर जास्त भर दिलेला आहे.जेव्हा महिला रोजगार व स्वयंरोजगारात जास्त सहभाग घेतील तेव्हाच महिला सक्षमीकरन शक्य होईल. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारमार्फत अनेक महिला रोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. तसेच अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्येच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ही प्रमुख आहे. या योजनेचे वैशिष्ट्ये हे आहे की, या योजनेअंतर्गत जर 4 लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिले तर, त्या 4 लोकांपैकी 3 महिला असतात.

ही योजना सुरू झाल्यापासून महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणे यावर जास्त भर दिला जात आहे.

मुद्रा लोन घेण्याची प्रक्रिया

 मुद्रा लोन घेण्यासाठी आपण ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो.

  • ऑफलाइन पद्धत

ऑफलाइन पद्धतीमध्ये आपण आपल्याला ज्या बँकेत मुद्रा लोन घ्यायचे आहे. त्या बँकेत जाऊन रीतसर अर्ज करावा लागतो. आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून ती सर्व कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात त्यानंतर आपल्या कागदपत्राची शहानिशा झाल्यानंतर कर्जाची रक्कम एक महिन्याच्या आत आपल्या बँक खात्यात पाठवली जाते.

  • ऑनलाइन पद्धत

या ऑनलाइन पद्धती मध्ये आपल्याला ज्या बँकेत कर्ज घ्यायचे आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे व सर्व कागदपत्रे सबमिट करायची आहेत. आपण जर कर्ज घेण्यास पात्र असेल तर बँक आपल्याला कर्ज वितरण करते.

लोन मुद्रा वितरित करणाऱ्या बँका.

  • ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स. कोटक महिंद्रा बँक .
  • इंडियन बँक.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया.
  • बँक ऑफ इंडिया.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आयडीबीआय बँक.
  • सिटी बँक.
  • एचडीएफसी बँक.
  • कॅनरा बँक.
  • देना बँक .
  • युको बँक.
  • बँक ऑफ बडोदा.
  • युनियन बँक ऑफ इंडिया.
  • बँक ऑफ महाराष्ट्र.

आम्ही आमच्या या लेखांमध्ये तुम्हाला “प्रधानमंत्री मुद्रा लोन” याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला आशा आहे की ,तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा. “पंतप्रधान मुद्रा लोन” या योजनेचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्यावा. धन्यवाद!!!

Leave a Comment