मित्रांनो तुम्ही अनेकदा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे (How to make money online) युट्युब वरून पैसे कसे कमवायचे ,ब्लॉगिंग वरून पैसे कसे कमवायचे ,अमुक करून तमुक करून पैसे कसे कमवायचे हे बऱ्याच वेळा ऐकले असेल करूनही पाहिले असेल. पण तुम्ही अनेकदा अपयशी ठरला असाल. याचे मुख्य कारण म्हणजे कोणीही तुम्हाला ऑनलाईन पैसे कमावण्याबाबत पूर्ण माहिती दिली नसेल.
लॉकडाउनच्या काळात तुमची नोकरी केली असेल, नऊ ते पाच नोकरी करून तुम्ही कंटाळला असाल, तुमच्या बॉस ची बोलणी खाऊन वैतागला असाल किंवा तुम्ही अजूनही विद्यार्थीदशेत असाल व ऑनलाईन पैसे कमावण्याच्या मार्गांबाबत उत्सुक असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा.
मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवणे अजिबात कठीण नाही कारण मी जे आता तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग सांगणार आहे ते मी आणि माझ्या मित्रांनी स्वतः वापरून बघितलेले आहेत. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण वाचा कारण अपूर्ण ज्ञान घातक असते.
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी ना तुम्हाला डिग्री ची गरज आहे ना त्या कामात पूर्णवेळ गुंतून राहण्याची. फक्त तुमच्या अंगी एखादी कला असली पाहिजे. कारण जगामध्ये असा कोणीही नाही जो तुम्हाला फुकट पैसे देईल. पण तुम्ही म्हणाल माझ्याकडे कोणती कला नाही मग मी पैसे कसे कमवावे पण घाबरून जायचे कारण नाही.
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करण्याची गरज आहे एक म्हणजे स्वतःचा प्रॉडक्ट ग्राहकांना विकणे किंवा दुसऱ्याचा प्रॉडक्ट विकण्यास मदत करणे म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग.
तुमच्या आवडीनुसार मी जे तीन गट तयार केले आहेत त्यामधील तुम्ही कोणत्या गटात बसता ते आधी बघा.
एक म्हणजे content creator यामध्ये युट्यूब इंस्टाग्राम रोपोसो यांसारख्या ॲप्लिकेशन्स वर जी लोकं इतरांचे मनोरंजन करतात त्यांना content creator म्हणतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉलोवर्स व व्युज वर जाहिरात कंपन्या पैसे देतात.
दुसरा गट म्हणजे डिजिटल मार्केटर
यामध्ये एखाद्या वेबसाईट द्वारे मार्केटिंग करून एखाद्या कंपनीचा प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवला जातो. व जेवढे प्रोडक्ट्स विकले जातील त्यामधील थोडेफार कमिशन मार्केटरसना जाते.
तिसऱ्या गटामध्ये येतात फ्रीलान्सर म्हणजे एखाद्याचे काम आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेस वर करणे. रायटर्स, एडिटर्स ,आर्टिस्ट यांसारखे लोक फ्रीलान्सिंग द्वारे पैसे कमवू शकतात.
आता हे तीन गट मी विस्तारित पद्धतीने समजावून सांगतो
१. content creator
रोपोसो
रोपोसो हे नाव तुम्ही क्वचितच कुठेतरी ऐकले असेल. पण कॉन्टेन्ट क्रिकेटरसाठी रोपोसो हे सगळ्यात बेस्ट ॲप्लिकेशन आहे.
रोपोसो वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त ते ॲप खालील लिंकवरून डाऊनलोड करून त्यावर लॉगिन करायचे आहे.
रोपोसो कॅमेरा वरून तुम्ही पहिला व्हिडिओ बनवतात तुम्हाला रोपोसो कडून 15 रुपये मिळतील. व दुसऱ्या व्हिडीओ ला दहा रुपये मिळतील.
हो तुम्ही जर असेच नियमितपणे नवनवीन व्हिडिओ कॅमेराचा वापर करून टाकत असाल तर तुमच्या व्हिडिओ ला आलेल्या प्रत्येक वियूज वरती तुम्हाला पैसे मिळतील दर दहा हजार व्युज मागे तुम्हाला दहा रुपये मिळतील. हे पैसे जरी तुम्हाला आता कमी वाटत असतील तरी काळजी करू नका कारण रोपोसो अल्गोरिदम अनुसार तुमचा व्हिडिओ दरवेळी नवीन नवीन युजर्स पर्यंत रोपोसो पोहोचवते त्यामुळे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ वर 1 लाख च्या वरती व्युज सुद्धा येतात.
व हे पैसे रोपोसो डायरेक्ट तुमच्या पेटीएम द्वारे बँक अकाऊंट मध्ये पाठवते.
युट्युब
युट्युब वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असतील. युट्युब वर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःचे युनिक व्हिडिओ बनवावे लागतील व एका विशिष्ट नीच वर काम करावे लागेल. यूट्यूब अल्गोरिदम समजणे खूप कठीण असते तुम्ही जेव्हा 33 व्हिडिओज अपलोड कराल तेव्हा यूट्यूबला तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवत आहात हे माहित होते त्यामुळे लगेच हार न मानता यूट्यूब व्हिडिओज बनवत राहा एकदा तुमचे एक हजार सबस्क्रिबर्स व 4000 वॉचींग अवर्स पूर्ण झाले की यु ट्यूब तुमचे मोनेटायझेशन इनेबल करते म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओज वरती ॲडव्हर्टायझिंग करून पैसे कमवू शकता या प्रोसेस ला बराच वेळ लागतो पण तुम्ही हार न मानता प्रयत्न करत राहाल तर तुम्हाला नक्कीच यश येईल
महिना 15000 च्या नोकरीसाठी मुले चार वर्षे डिग्रीचे शिक्षण घेतात मग महिना एक लाख कमवण्यासाठी तुम्हाला वर्षभर मेहनत घेण्यास का नको वाटते?
इंस्टाग्राम
इंस्टाग्राम वर तुम्ही डिलिट मार्केटिंग किंवा स्पॉन्सरशिप द्वारे पैसे कमवू शकतात त्यासाठी तुम्हाला स्वतःचा एक ब्रँड बनवावा लागेल व तुमच्यात तुमच्या फॉलोवर्स ना इनफ्लुएन्स करण्याची क्षमता असायला हवी. विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्ट चे एक कोटी रुपये घेतो हे तुम्ही कदाचित ऐकले असेल ते ह्यासाठीच.
पण आपण काही विराट कोहली नाही त्यामुळे एखाद्या नवीन आणि चांगल्या कंपनीची स्पॉन्सरशिप घेऊन तुम्ही त्याचे प्रोडक्ट बायो मधील लिंक देऊन खपू शकता किंवा स्वतःचे प्रॉडक्ट देखील इंस्टाग्राम वर करू शकता.