मित्रांनो तुम्ही अनेकदा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे (How to make money online) युट्युब वरून पैसे कसे कमवायचे ,ब्लॉगिंग वरून पैसे कसे कमवायचे ,अमुक करून तमुक करून पैसे कसे कमवायचे हे बऱ्याच वेळा ऐकले असेल करूनही पाहिले असेल. पण तुम्ही अनेकदा अपयशी ठरला असाल. याचे मुख्य कारण म्हणजे कोणीही तुम्हाला ऑनलाईन पैसे कमावण्याबाबत पूर्ण माहिती दिली नसेल.
लॉकडाउनच्या काळात तुमची नोकरी केली असेल, नऊ ते पाच नोकरी करून तुम्ही कंटाळला असाल, तुमच्या बॉस ची बोलणी खाऊन वैतागला असाल किंवा तुम्ही अजूनही विद्यार्थीदशेत असाल व ऑनलाईन पैसे कमावण्याच्या मार्गांबाबत उत्सुक असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा.
मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवणे अजिबात कठीण नाही कारण मी जे आता तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग सांगणार आहे ते मी आणि माझ्या मित्रांनी स्वतः वापरून बघितलेले आहेत. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण वाचा कारण अपूर्ण ज्ञान घातक असते.
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी ना तुम्हाला डिग्री ची गरज आहे ना त्या कामात पूर्णवेळ गुंतून राहण्याची. फक्त तुमच्या अंगी एखादी कला असली पाहिजे. कारण जगामध्ये असा कोणीही नाही जो तुम्हाला फुकट पैसे देईल. पण तुम्ही म्हणाल माझ्याकडे कोणती कला नाही मग मी पैसे कसे कमवावे पण घाबरून जायचे कारण नाही.
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करण्याची गरज आहे एक म्हणजे स्वतःचा प्रॉडक्ट ग्राहकांना विकणे किंवा दुसऱ्याचा प्रॉडक्ट विकण्यास मदत करणे म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग.
तुमच्या आवडीनुसार मी जे तीन गट तयार केले आहेत त्यामधील तुम्ही कोणत्या गटात बसता ते आधी बघा.
एक म्हणजे content creator यामध्ये युट्यूब इंस्टाग्राम रोपोसो यांसारख्या ॲप्लिकेशन्स वर जी लोकं इतरांचे मनोरंजन करतात त्यांना content creator म्हणतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉलोवर्स व व्युज वर जाहिरात कंपन्या पैसे देतात.
दुसरा गट म्हणजे डिजिटल मार्केटर
यामध्ये एखाद्या वेबसाईट द्वारे मार्केटिंग करून एखाद्या कंपनीचा प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवला जातो. व जेवढे प्रोडक्ट्स विकले जातील त्यामधील थोडेफार कमिशन मार्केटरसना जाते.
तिसऱ्या गटामध्ये येतात फ्रीलान्सर म्हणजे एखाद्याचे काम आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेस वर करणे. रायटर्स, एडिटर्स ,आर्टिस्ट यांसारखे लोक फ्रीलान्सिंग द्वारे पैसे कमवू शकतात.
आता हे तीन गट मी विस्तारित पद्धतीने समजावून सांगतो
Table of Contents
१. content creator
रोपोसो
रोपोसो हे नाव तुम्ही क्वचितच कुठेतरी ऐकले असेल. पण कॉन्टेन्ट क्रिकेटरसाठी रोपोसो हे सगळ्यात बेस्ट ॲप्लिकेशन आहे.
रोपोसो वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त ते ॲप खालील लिंकवरून डाऊनलोड करून त्यावर लॉगिन करायचे आहे.
रोपोसो कॅमेरा वरून तुम्ही पहिला व्हिडिओ बनवतात तुम्हाला रोपोसो कडून 15 रुपये मिळतील. व दुसऱ्या व्हिडीओ ला दहा रुपये मिळतील.
हो तुम्ही जर असेच नियमितपणे नवनवीन व्हिडिओ कॅमेराचा वापर करून टाकत असाल तर तुमच्या व्हिडिओ ला आलेल्या प्रत्येक वियूज वरती तुम्हाला पैसे मिळतील दर दहा हजार व्युज मागे तुम्हाला दहा रुपये मिळतील. हे पैसे जरी तुम्हाला आता कमी वाटत असतील तरी काळजी करू नका कारण रोपोसो अल्गोरिदम अनुसार तुमचा व्हिडिओ दरवेळी नवीन नवीन युजर्स पर्यंत रोपोसो पोहोचवते त्यामुळे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ वर 1 लाख च्या वरती व्युज सुद्धा येतात.
व हे पैसे रोपोसो डायरेक्ट तुमच्या पेटीएम द्वारे बँक अकाऊंट मध्ये पाठवते.
युट्युब
युट्युब वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असतील. युट्युब वर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःचे युनिक व्हिडिओ बनवावे लागतील व एका विशिष्ट नीच वर काम करावे लागेल. यूट्यूब अल्गोरिदम समजणे खूप कठीण असते तुम्ही जेव्हा 33 व्हिडिओज अपलोड कराल तेव्हा यूट्यूबला तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवत आहात हे माहित होते त्यामुळे लगेच हार न मानता यूट्यूब व्हिडिओज बनवत राहा एकदा तुमचे एक हजार सबस्क्रिबर्स व 4000 वॉचींग अवर्स पूर्ण झाले की यु ट्यूब तुमचे मोनेटायझेशन इनेबल करते म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओज वरती ॲडव्हर्टायझिंग करून पैसे कमवू शकता या प्रोसेस ला बराच वेळ लागतो पण तुम्ही हार न मानता प्रयत्न करत राहाल तर तुम्हाला नक्कीच यश येईल
महिना 15000 च्या नोकरीसाठी मुले चार वर्षे डिग्रीचे शिक्षण घेतात मग महिना एक लाख कमवण्यासाठी तुम्हाला वर्षभर मेहनत घेण्यास का नको वाटते?
इंस्टाग्राम
इंस्टाग्राम वर तुम्ही डिलिट मार्केटिंग किंवा स्पॉन्सरशिप द्वारे पैसे कमवू शकतात त्यासाठी तुम्हाला स्वतःचा एक ब्रँड बनवावा लागेल व तुमच्यात तुमच्या फॉलोवर्स ना इनफ्लुएन्स करण्याची क्षमता असायला हवी. विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्ट चे एक कोटी रुपये घेतो हे तुम्ही कदाचित ऐकले असेल ते ह्यासाठीच.
पण आपण काही विराट कोहली नाही त्यामुळे एखाद्या नवीन आणि चांगल्या कंपनीची स्पॉन्सरशिप घेऊन तुम्ही त्याचे प्रोडक्ट बायो मधील लिंक देऊन खपू शकता किंवा स्वतःचे प्रॉडक्ट देखील इंस्टाग्राम वर करू शकता.
२. मार्केटिंग
ब्लॉग
ब्लॉग हा वेबसाईटचाच एक प्रकार आहे. पण वेबसाईट एकदा बनवली की त्यामध्ये नंतर बदल घडवण्याची गरज नसते पण ब्लॉग मध्ये आपल्याला नियमितपणे माहिती पोस्ट करावी लागते.
ब्लॉग मध्ये पण यूट्यूब सारखेच अनेक नीच आहेत. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट गुगल वर सर्च करता तेव्हा तिथे अनेक प्रकारच्या वेबसाइट येत असतील त्या म्हणजेच ब्लॉग असतात ब्लॉग मधील ज्या ॲडवटाईज येतात त्याद्वारे ब्लोग क्रियेटर ला पैसे मिळतात
ब्लॉग तुम्ही फ्री मध्ये सुद्धा बनवू शकता फक्त ब्लॉगर डॉट कॉम वरती जाऊन तुम्हाला लॉगिन करायचे आहे व तुमच्या ब्लॉगचे नाव टाकले की तुमची www._____.blogspot.com अशी वेबसाईट सुरु होईल नवीन यूजर साठी वेबसाईट बनवणे फायद्याचे आहे पण जर तुम्हाला ब्लोगिंग अरे पैसे कमवायचे असतील तर माझ्या मते तुम्हाला दोनशे-तीनशे रुपये इनवेस्ट करून चांगले डोमेन नेम घेण्याची गरज आहे. उदाहरणार्थ
.1) www.____.com
2) www _____.in
3) www._____.xyz etc.
असे डोमेन बनवल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉग वर तुमचा ब्लॉग या विषयाशी निगडित आहे किंवा तुम्हाला ज्या विषयात आवड आहे अशा विषयांवर ब्लॉग बनवू शकता.
अॅफीलेट मार्केटिंग सुद्धा अशाच प्रकारचे असते फक्त यामध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग मध्ये एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दल लिहितात व ते प्रोडक्ट विकण्याचे प्रयत्न करता. तेव्हा विकले गेलेले प्रोडक्ट मधील काही कमिशन तुम्हाला मिळते. उदाहरणार्थ ॲमेझॉन अॅफीलेट
ब्लॉगिंग व अफीलेट मार्केटिंगविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://youtu.be/SV5A03nTcF0
freelancing
मित्रांनो फ्रीलान्सिंग हेसुद्धा एक खूप मोठे क्षेत्र आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीत फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग डाटा एन्ट्री रायटिंग वोईस ओवर एक्टिंग डिजिटल आर्ट अशी कामे करत असाल, तर तीच कामे तुम्ही घर बसल्या विदेशातील क्लाइंट साठी करू शकता व डॉलर्समध्ये पैसे कमवू शकता.
upwork.com
fiver.com
freelancer.com
यांसारख्या वेबसाईटवर तुम्ही स्वतःचा गीग तयार करू शकता. गीग म्हणजे पोर्टफोलिओ. तुम्ही तुमची कामे त्या वेबसाईट वर अपलोड करायची असतात किंवा upwork सारख्या वेबसाईटवर क्लाइंट आधीच त्यांची कामे अपलोड केलेली असतात त्यावर तुम्हाला जाऊन कामासाठी रिक्वेस्ट टाकायची असते. व नंतर तुम्हाला काम मिळतील साध्या साध्या कामाचे सुद्धा तुम्हाला बरेच पैसे मिळू शकतात कारण तुम्ही डॉलर्समध्ये कमवाल.
३. Merchandise buisness
मित्रांनो तुम्ही टी शर्ट च्या अनेक डिझाइन्स बघितले असतील ज्यावर कोट्स किंवा मीन्स प्रिंट केलेले असतात अशा टी शर्ट किंवा क्लोजिंग ची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे जर तुम्हाला थोडीशी डिझाईन करता येत असेल तर तुम्ही
teespring
merch by amazon
redbubble
यांसारख्या वेबसाईटवर जाऊन स्वतःची डिझाईन अपलोड करू शकतात जेव्हा तुमच्या डिझाईन ला कोणी ऑर्डर करेल तेव्हा त्या कंपन्या प्रिंट ऑन डिमांड बेसिसवर ते टी-शर्ट प्रिंट करून त्या ऑर्डर पोहोचवतील व तुम्हाला त्यातील कमिशन मिळेल
परदेशातील बरेच लोक अशा प्रकारचा व्यवसाय करतात याचा फायदा असा की तुम्हाला रॉ मेटरियल खरेदी करावी लागत नाही मटेरियल चा स्टॉक करावा लागत नाही तुम्ही फक्त डिझाईन अपलोड करून पैसे कमवू शकतात.
हे नक्की वाचा :
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
- Cibil score information in Marathi | CIBIL Score कसा वाढवावा?
तर मित्रांनो तुम्हाला हे ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दलचे आमचे आर्टिकल कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.