{2024} माझी आई मराठी निबंध | Essay On My Mother in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत माझी आई मराठी निबंध म्हणजेच Marathi Essay On My Mother

माझी आई मराठी निबंध हा माझ्या व माझ्या मित्रांच्या सर्व मातांना समर्पित आहे. मित्रांनो असे म्हटले जाते की आपल्या जीवनात पहिले गुरू आई असते.  जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई. आपण हे जग पाहिले आणि आपल्या आईमुळेच आपण जन्म घेतला. त्यामुळे आईवर प्रेम करणे खरोखर महत्त्वाचे आहे.

या पोस्ट मध्ये माझी आई मराठी निबंध या विषयावर ३ निबंध दिले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही हा निबंध पुढील विषयांवर वापरू शकता – माझी आई निबंध मराठी । majhi aai nibandh | माझी आई मराठी निबंध । mazi aai essay in marathi । Essay on My Mother in Marathi । marathi essay on mother

माझी आई मराठी निबंध

माझी आई मराठी निबंध

निबंध क्र. १ [३०० शब्दात]

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे त्रिकाल सत्य आहे. आई नसताना आणि सर्व राज्य, संपत्ती, सत्ता हातात असली तरी ते वैभव कवडीमोल ठरते. राजाच्या घरात साक्षात लक्ष्मीदेखील पाणी भरत असली तरी आईविना तो राजाही भिकारी ठरेल. आहेच तेवदे आईच्या प्रेमाचे सामर्थ्य ! मूल आजारी असेल तर तोंडात पाण्याचा थेंबही न घेता ती मुलाच्या उशाशी बसून राहील. मूलाला बरे वाटावे म्हणून देवाला साकडे घालील. रात्रभर हाताचा पाळणा अन् डोळ्यांचा दिवा करुन ती आजारी मुलाची देखभाल करीत राहील, व तो बरा होईपर्यंत काळजी घेत राहील.

आईइतका समर्पण आणि त्याग इतर कोणी करू शकत नाही. आपल्या जन्मापूर्वीच आई आपली काळजी घेऊ लागते, ती जगातील सर्वात मोठ दुखणे सहन करून आपल्याला जग दाखवते, लहानाचं मोठं करते, या कलयुगात कोणाशी कसे वागावे, कोणत्या परिस्थितीला कसे निर्णय घ्यावे हे सर्व आईच बरोबर शिकवू शकते.
“कठीण दिसणाऱ्या वाटाहीसहज पार होतातआईचे आशीर्वादजेव्हा आपल्या सोबत असतात.”

समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी व आकाशाचा कागद करुन आईचे गुणगान लिहावयास बसलो तरी आईची माया लिहून संपणार नाही, म्हणूनच म्हणतात, ‘आई ही दोन अक्षरे ह्रदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवा.’ बालपणापासून तारुण्यापर्यंत आपल्या मुलाच्या सर्व व्यथा फक्त आईच समजू शकते. मुलाच्या हितासाठी आई रागावते. प्रसंगी मारते व रागावून देखील बोलते, पण त्यामागच्या तिच्या भावना मात्र फार वेगळ्या आणि उदात्त असतात. आपले मूल शिकुन कोणीतरी मोठे बनावे, त्याचे समाजात चांगले नाव असावे, त्याचे भवितव्य उज्वल व्हावे, एवढीच प्रांजळ इच्छा तिच्या मनात असते.

आईच्या मायेतच इतकी ताकद असते की तिच्या रागापेक्षा तिने केलेले प्रेम अधिक लक्षात राहते. जगातील कशाचीही भरपाई करता येईल पण आईच्या विरहाची भरपाई कधीच भरून येणार नाही. आई-मुलाच्या प्रेमाचे नाते अतूट असते. आईचे मुलावरील प्रेम म्हणजे जीवनाचे भूषण होय.

ज्याला आईचे प्रेम मिळाले नसेल त्याचे जीवन म्हणजे अस्थिचर्ममय सांगाडा आहे. त्यात मन, आत्मा हे जीव राहतात. आईचे प्रेम गरीबीच्या मीठाला लावून खाल्यास तो राजाचाही राजा बनतो, असे हे निर्मळ, निर्व्याज प्रेम शब्दात मावणार नाही. लिहून सरणार नाही. पैशाने खरीदले किंवा विकले जाणार नाही.
आई म्हणजेच वात्सल्य सिंधू.

तुम्हाला हा माझी आई मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Essay On My Mother in Marathi

निबंध क्र. २ [४०० शब्दांत]

 रामायणात महर्षी वाल्मीकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, ‘जननी जन्मभूमिश्च वर्गादपि गरीयसि।’ खरोखर किती अचूक वर्णन आहे हे आईचे नाही का! आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, “इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे ‘प्रसादपट’ हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.

माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच मला मिळाले आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेल्या मजकुरातील हस्ताक्षर पसंत पडले नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला शालाबाह्य अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, ‘न ऋण जन्मदेचे फिटे.’

माझ्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या ‘करीअर’चा कधीच विचार केला नाही. ती स्वतः एम्. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.

माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मला काय आवडते काय नाही, मी काय वाचावे, कोणकोणत्या स्पर्धात भाग घ्यावा, माझे कोणते मित्र आहेत ते काय करतात, अशा बारीक गोष्टींकडेदेखील तिचे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती कष्ट उपसत असते.

जिजाऊन्नी शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, ‘एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे. आजच्या काळातील दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे समाजविघातक गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई. ‘ खरेच प्रत्येकाने आपल्या मातेच्या शिकवणुकीचा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील.

आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, लहानपणापासून आईचा विरह ज्याच्या वाट्याला आला असेल, त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”

तुम्हाला हा माझी आई मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

माझी आई मराठी निबंध – marathi essay on my mother

निबंध क्र. ३ [५०० शब्दांत]

आई हे देवाचे दुसरे रूप आहे कारण देव सर्वत्र आपल्याला मदत करण्यासाठी असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली आहे, आईचे प्रेम आणि आपुलकी मिळवण्यासाठी, देव देखील पृथ्वीवर जन्म घेतो. आजपर्यंत कोणीही आईपेक्षा अधिक दयाळू आणि परोपकारी नव्हते आणि इथून पुढं देखील कधीही सक्षम होणार नाही.

आई ही ती जमीन आहे जी स्वतः वांझ बनते, परंतु तिच्या मुलांचे योग्य पालनपोषण करून, त्यांना चांगले मार्गदर्शन करून, त्यांना चांगले शिकवनुक देऊन सुपीक जमिनीसारखे बनवते.

आई ही नेहमी सर्वांच्या आनंदात आहे स्वतःचा आनंद मानते. तिला कोणतीही संपत्ती नको आहे, तिला फक्त तिच्या मुलांच्या प्रेमाची गरज आहे. आई नेहमी आमच्या कुटुंबात आणि आमच्या सेवेत रात्रंदिवस गुंतलेली असते पण ती कधीही म्हणत नाही की मी थकले आहे किंवा मी आणखी काही काम करू शकत नाही.

आईइतका समर्पण आणि त्याग इतर कोणी करू शकत नाही. आपल्या जन्मापूर्वीच आई आपली काळजी घेऊ लागते, ती जगातील सर्वात मोठ दुखणे सहन करून आपल्याला जग दाखवते, लहानाचं मोठं करते, या कलयुगात कोणाशी कसे वागावे, कोणत्या परिस्थितीला कसे निर्णय घ्यावे हे सर्व आईच बरोबर शिकवू शकते. आईच्या मायेतच इतकी ताकद असते की तिच्या रागापेक्षा तिने केलेले प्रेम अधिक लक्षात राहते. जगातील कशाचीही भरपाई करता येईल पण आईच्या विरहाची भरपाई कधीच भरून येणार नाही. आई-मुलाच्या प्रेमाचे नाते अतूट असते. आईचे मुलावरील प्रेम म्हणजे जीवनाचे भूषण होय.

“ खरं प्रेम कसं करावं

ते आईकडून शिकावं

मुलांना काहीच न मागतां

त्यांना फक्त देत राहावं. “

            ती बालपणात आमचे पालनपोषण करते, आमच्या प्रत्येक खोडकरपणाकडे दुर्लक्ष करून आम्हाला क्षमा करते. आई सकाळी पहिली उठते, ती आम्हाला वेळेवर अन्न देते, आम्हाला वेळेवर शाळेत जाण्यासाठी तयार करते, वेळ भेटल्यास ती आमचा अभ्यास देखील घेते.

            ती दिवसभर घरकाम करते, त्यानंतर जेव्हा आपण घरी परततो, तेव्हा ती हसून आमच्या तब्येतीबद्दल विचारते आणि आम्हा सर्वांना झोपवून ती झोपते. एवढी मोठी जबाबदारी फक्त आईच करू शकते.

            पुरुषांना जगातील सर्वात शक्तिशाली म्हटले जाते, परंतु सर्वात शक्तिशाली आई असते, ज्यांचे धैर्य, आपुलकी, निर्भयता, शहाणपण, दयाळूपणा आणि प्रेम कोणासमोर उभे राहू शकत नाही. आई ती आहे जी ती करत असताना अश्रू विचारते आणि एका मिनिटात आपल्या चेहऱ्यावर हास्य पसरवते.

            कधी विचार केला आहे की आई आपल्यासाठी हे सर्व का करते कारण ती फक्त आणि फक्त आपल्यावरच निर्मळ, निस्वार्थी प्रेम करते, ती इतर जगांसारखी नाही जी आपल्यावर स्वार्थी कारणांसाठी प्रेम करते.

            आई आमची पहिली गुरू आहे, ती आम्हाला चांगले शिक्षण देते आणि आम्हाला समाजाचे एक चांगले नागरिक बनवते, अपयश आणि यश दोन्हीमध्ये ती आमच्या पाठीशी उभी राहते, ती निराश झाल्यावर आशेचा किरण म्हणून आमच्यासोबत चालते आणि आम्हाला मार्गदर्शन करते.

            आई आयुष्यभर आपल्यासाठी खूप काही करते, त्यामुळे आपले कर्तव्य देखील आहे की आपणही आईसाठी काहीतरी केले पाहिजे, आपण तिची सर्व वेळ काळजी घेतली पाहिजे, तिने आपनाला दिलेले सर्व सुख लक्षात ठेऊन तिला देखील सुखी व आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.

            आपण दररोज आईचे आशीर्वाद घेतला पाहिजे, कारण जेव्हा आपल्याला तिचे आशीर्वाद मिळतील तेव्हा आपल्याला कोणासमोर हात पसरण्याची गरज नाही.

            आज तुम्ही आमच्याबरोबर व्रत घ्या की आईने जशी तुमची काळजी घेतली तशी तुम्ही देखील तिची काळजी घ्याल आणि त्यांना जे सुख मिळू शकले नाही ते त्यांना द्याल.

“स्वतः जागी राहून

आम्हाला झोपवलं,

आम्हाला हसवण्यासाठी

स्वतःला रडवलं,

हे देवा दुःख कधीच नको देऊ तीला

जीला मी आई म्हटलं.”

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा माझी आई मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Reference : aplustopper.com

2 thoughts on “{2024} माझी आई मराठी निबंध | Essay On My Mother in marathi”

Leave a Comment