{Essay} साक्षरतेचे फायदे मराठी निबंध । Benefits of education in marathi essay

शिक्षणाचे फायदे मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो , आपल्या आयुष्यात शिक्षणाचे खूप महत्व आहे हे आपल्याला चांगलेच माहित आहे.

ह्या विज्ञानाच्या जगात एखादा माणूस अशिक्षित असेल तर त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो . अडाणी माणसाचा श्रीमंत आणि शिक्षित लोक नेहमीच फायदा घेत असतात. त्यामुळे अशिक्षित व्यक्तींना गरिबी, गुलामी, मानसिक त्रास अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. इतिहास सुद्धा ह्या गोष्टींची साक्ष नेहमीच देत असतो. ह्या निबंधामध्ये आपण अज्ञानाचे तोटे तसेच साक्षरतेचे फायदे बगणार आहोत

तर आज आपल्या निबंधाचा विषय आहे Benefits of education in marathi म्हणजेच साक्षरतेचे फायदे मराठी निबंध.

साक्षरतेचे फायदे मराठी निबंध

अज्ञानाचे फायदे - तोटे

माणूस अज्ञानी किंवा निरक्षर राहिल्याने त्याचे किती आणि कसे नुकसान होते हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे. कारण पूर्वी बऱ्याचअंशी निरक्षरता होती तरीही रोजचे व्यवहार सुरळीतपणे चालत असत. जमीनदार, सावकार धनवान होत असत. शिक्षणाचे किंवा साक्षरतेचे फायदे तर खुपच आहेत. ज्ञानाची कवाडे खुलतात. जगाशी संपर्क वाढतो. उद्योगधंदे, कारखानदारीस चालना मिळते. वर्तमानपत्रे तर जगातील घडामोडी, वार्ता समजण्याचे स्वस्त नि सुलभ माध्यम आहे. त्यातून अनेक ज्ञानवंतांचे विचार कळतात. या विचारांच्या आदान प्रदानातून माणूस बऱ्याच गोष्टी शिकत असतो. हे सर्व ज्ञानामुळे शक्य आहे.

‘केल्याने देशाटन’, या उक्तीप्रमाणे जगात फिरुन मिळवलेले अनेक प्रकारचे अनुभव आयुष्याला कलाटणी द्यायला उपयोगी ठरतात. जगाच्या पाठीवर आपण कोणत्या टप्प्यावर प्रगत किंवा विकसित आहोत, आपला देश, आपला समाज कोणत्या पातळीवर आहे याचे आकलन होते. प्रगतीला वाटा मिळत जातात. शिक्षणामुळे सारासार विचार करण्याची कुवत निर्माण होते. आपल्या विचारांच्या दिशा विस्तारित होतात.

साक्षरतेमुळे जगाच्या कोणत्याही देशात नोकरी, उद्योगधंदा करण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि वाढतो. व्यवहारातील निर्णयक्षमता सुधारते. दुसऱ्याकडून फसविले किंवा लूटले जाण्याची शक्यता कमी असते. साक्षर असल्याने कुटुंब, मित्रपरिवारही सुशिक्षित असतो. त्यामुळे एकमेकांशी चर्चा झाल्याने नवनवीन कल्पना सुचत जातात. सखोल माहिती मिळते. याच्या उलट अज्ञानाचे तोटे मात्र जास्त असतात. अज्ञानामुळे पैसे देणे-घेणे, मोजणे, हिशोबात चूका होतात तसेच वाचता न आल्यामुळे प्रवास करणे, धंदा सांभाळणे जिकिरीचे होते. अज्ञानामुळे दुसऱ्या माणसाकडून फसविले जाण्याचा धोका असतो, चोराचिलटांपासून भीती असते. हाताखालची माणसेही याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. हल्ली घरात किंवा कार्यालयात बसुन कामे करण्याची संचारमाध्यमे खूप उपलब्ध झाली आहेत. जसे मोबाईल, फॅक्स, संगणक किंवा इंटरनेट परंतु अशिक्षित असेल किंवा आधुनिक सुविधांबद्दल ज्ञान नसेल तर आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागते.

अज्ञानाचे तोटे असे की व्यवहारात होणारी फसगत, हिशोबात होणाऱ्या चूका, वाचता न येण्याने प्रवास करताना किंवा व्यवसाय सांभाळताना तारांबळ उडणे, अज्ञानामुळे प्रगतीत अडथळा निर्माण होतो. हल्लीच्या युगात विज्ञानाने खुपच प्रगती केली आहे. वैज्ञानिक संशोधनामुळे आपले जीवन सुखकारक झाले आहे. त्याचबरोबर घरात बसून लॅपटॉप, मोबाईल, संगणक यांच्याद्वारे जगाची माहिती मिळवणे किंवा संवाद साधणे शक्य झाले आहे पण अज्ञानामुळे आपण या सुविधांपासून वंचित राहतो. प्रत्येक गोष्टीसाठी आपणांस दुसर्यांवर अवलंबून राहवे लागते.

अज्ञानामुळे काहीवेळा न्यूनगंड वाढतो. जागोजागी कमीपणा येण्याचा संभव असतो. त्यामुळे परावलंबत्व येते. दुसऱ्यावर विश्वास ठेवणे जिकिरीचे होऊन बसते.

साक्षरतेमुळे विकासाच्या अनेक संधी प्राप्त होतात. कोणत्याही ठिकाणी वास्तव्य करण्यास अडचण भासत नाही. व्यवहारात निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. आत्मविश्वास वाढतो. व्यापार व्यवसायात लुटले किंवा नागविले जायची भीती नसते. स्वतः साक्षर असल्याने कुटुंबातील सर्वांना साक्षर बनवता येते. प्रत्येक क्षेत्रात एकमेकाला साह्य करता येते. इतर सुशिक्षित लोकांच्या

बरोबर उठबस झाल्याने नवनव्या कल्पना सुचतात. साक्षरतेमुळे माणूस पैशाचा गुलाम बनतो व पैशामागे धावत जातो. त्यामुळे स्वास्थ्य राहत नाही. चिंता, काळजी आणि उद्याची आखणी यामुळे निरनिराळ्या व्याधी प्राप्त होतात. कौटुंबिक सुखाला पोरका होतो. कामाचा ध्यास व अधिक पैसा मिळवण्याची ओढ लागू शकते. यामुळेच साक्षर असावे पण साक्षरतेमुळे आपले जीवन सुखकारक व निरोगी बनण्यासाठी प्रयत्न असावा

तेव्हाच आपले जीवणगाणे आनंदी होईल. आणि समाज, गाव आणि राष्ट्रही प्रगत होईल.

‘शाळेमध्ये जाऊया

अ, आ, इ, ई गिरवूया’

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

आमच्या इतर पोस्ट्स –

हे पण वाचा :

सावित्रीबाई फुले निबंध

वाचनाचे महत्त्व व वाचनाचे फायदे मराठी निबंध

वीज बंद पडली तर मराठी निबंध । vij band padli tar marathi nibandh

पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध

५८+ सोपे मराठी निबंध



1 thought on “{Essay} साक्षरतेचे फायदे मराठी निबंध । Benefits of education in marathi essay”

Leave a Comment