[2 Essays] वीज बंद पडली तर मराठी निबंध । vij band padli tar marathi nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे म्हणून आम्ही दरवेळी तुमच्या साठी नवीन निबंध घेऊन येत असतो.

तर या वेळी आपण वीज बंद पडली तर(vij band padli tar marathi nibandh) किंवा वीज बंद झाली तर (vij band zali tar nibandh in marathi) या विषयांवरील ०२ निबंध पाहणार आहोत.

तुम्ही हा निबंध खालील विषयांवर वापरू शकता  –

  • vij nasti tar
  • electricity essay
  • वीज नसती तर मराठी निबंध
  • vij band padli tar marathi nibandh
  • वीज बंद पडली तर मराठी निबंध
  • वीज बंद झाली तर मराठी निबंध
  • vij band zali tar nibandh in marathi
निबंध क्र. ०१

वीज बंद पडली तर मराठी निबंध

परवाच एका झोपडपट्टीला मोठी आग लागली. सुमारे अडीच हजार झोपड्या जळून खाक झाल्या. जर वीज बंद झाली असती तर हा अपघात झाला नसता. गोरगरिबांच्या उभ्या संसाराची राख झाली नसती. सुमारे दीडशे माणसे होरपळून मेली नसती. त्यांत चार महिन्यांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतची माणसे होती त्यांनाही काही झाले नसते. या विजेत क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले होते ही वीज नसती ना, तर हा उत्पात घडल नसता! कधी कधी मनात येते, माणसाने ही वीज निर्माण करून संकटाचा केवढा मोठा डोंगर उभ करून ठेवला आहे! खरंच, माणसाने ही वीज निर्माण करायलाच नको होती

खरोखर, ही वीज बंदच झाली तर ? तर… रात्री झगमगीत वाटल्या नसल्या माणसाला निरांजनाची-समईची ज्योत मेणबत्तीचा, कंदिलाचा उजेड यांचाच आश्रय लागला असता. आनंदाच्या प्रसंगी केली जाणारी रंगीबेरंगी रोषणाई केवळ स्वप्नात वा कल्पनेतच राहिली असती

पण जर वीज बंद झाली तर खूप अडचणी आल्या असत्या जसे आज घरातील सर्व प्रकारच्या कामांत वीज ही गृहिणीची सखी झाली आहे. दळणे, कापणे, भाजणे, शिजवणे, केर काढणे, कपडे धुणे, स्वच्छता करणे अशा अनेक कामांत तिला विजेची मोलाची मदत मिळते

आजच्या या यंत्रयुगात बरीचशी यंत्रे फिरतात, ते विजेच्या सामर्थ्यावर वीज गेली तर इतकी यंत्रे फिरली नसती. औद्योगिक क्षेत्रात आज झालेली मानवाची प्रगतो विजेविना निकामी होइल. संगणकामुळे जग खूप मोठे वाटायला लागेल. ज्ञानविज्ञानाची विकिपीडिया सारखी भांडारे बंद होतील. थोडक्यात वीज नाहीशी झाली तर माणसाची प्रगतीच थांबेल.

हे पण वाचा :

५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध

जर सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध


निबंध क्र. २

वीज बंद झाली तर मराठी निबंध

हल्लीचे युग हे विज्ञानाचे आणि वैज्ञानिक संशोधनाचे आहे. वैज्ञानिक सुखसुविधांमुळे आपले जीवन सुखकारक बनले आहे. थॉमस एडिसनने वीजेच्या दिव्याचा शोध लावला त्यामुळे मनुष्याच्या विकासाचा पाया रचला गेला. आज वीज घरोघरी पोहचली, ज्यामुळे बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज शक्य झाल्या आहेत.

घरातील, कार्यालयातील बहुतेक सर्व उपकरणे वीजेवर चालतात. पंखे, शीतकपाट, संगणक, दूरदर्शन, लॅपटॉप अशासारखी उपकरणे वीजेवरच चालतात. पण वीजच बंद झाली तर ! कल्पनाही करवत नाही. पंखे, कुलरमुळे वातावरणातील उष्मा कमी होवून काम करायला सोपे जाते. तसेच संगणक, लॅपटॉपद्वारे आपणास सर्व प्रकारची माहिती, ज्ञान प्राप्त होते. ई-मेल द्वारे दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येतो, तसेच त्यांना संदेश देता येतो. वीज नसेल तर ही विद्युत उपकरणे निरुपयोगी होतील.

रात्री छापली जाणारी वर्तमानपत्रे सकाळी वाचायला मिळणार नाहीत कारण छापखानेही वीजेवरच चालतात. आपणांस बातम्या कळणार नाहीत. रेडिओ, दूरदर्शन नसेल तर काम केल्यानंतर येणारा कंटाळा कसा घालवणार ? मनोरंजन होणारच नाही. चित्रपट, नाट्यगृहे बंद पडतील. उन्हाळ्यात पंख्याशिवाय जीव कासावीस होईल. पणतीच्या किंवा दिव्याच्या अंधुक प्रकाशात काम करावे लागेल. कारखाने, उद्योगधंदे बंद पडतील, बेरोजगारी वाढेल, आर्थिक नुकसान होईल. कारखान्यातून तयार होणाऱ्या वस्तुंचा पुरवठा बंद होईल.सर्व गोष्टीं बनवायला हातावर किंवा पायावर चालणारी यंत्रे वापरावी लागतील.

प्रवासासाठी विमाने, आगगाड्या यांचा वापर न होता, बैल, उंट, हत्ती, घोडे ही प्रवासाची साधने बनतील, सायकलचे महत्त्व वाढेल. अपघातांचे प्रमाण मात्र कमी होईल. गाड्या, स्कुटर खरेदी करण्याऐवजी प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे घोडा, उंट, बैल, हत्ती खरेदी करेल. गॅरेजऐवजी गोठे, तबेले बनवावे लागतील. घोडे बैल घेण्याची ज्यांची क्षमता नसेल ते सायकलने किंवा पायी प्रवास करतील. आता वीज आहे. त्यामुळे जगभराच्या बातम्या, क्रिकेटचे सामने आपण ऐकू, पाहू शकतो. पण वीज नसेल तर या गोष्टींना आपण मुकले जाऊ.

छापखाने नसल्याने नियतकालिके, मासिके तसेच कथा-कादंबऱ्यांचा आस्वाद कसा घेणार छपाई नाही तर वाचन नाही. वाचन नसल्याने शाळा, कॉलेजेस ओस पडतील, प्रगतीची द्वारे बंद होतील. लोकांना कामच नसल्याने खायची-प्यायची गैरसोय होईल. पुस्तकेच नसल्याने विद्यार्थीही नसणार. विद्यार्थीच नसतील तर संशोधक कसे तयार होणार ? संशोधक नसतील तर संशोधनही होणार नाही. यामुळे राष्ट्राची पर्यायाने सर्व जगाची प्रगती ठप्प होईल. जागतिक पातळीवरील चर्चासत्रे, भाषणे, मुलाखती कशा होणार ? नवयुवकांना संगणकीय शोध आणि तंत्रज्ञान कसे प्राप्त होणार ? आता विकसित होऊ घातलेले जगातील सर्व देश विजे अभावी पुन्हा मागास होतील.

या साऱ्यांवर एकच उपाय आणि तो म्हणजे अखंड विद्युतपुरवठा असावा त्यातून मानवाचा. उत्कर्ष उत्तरोत्तर वाढतच जावा.

हे पण वाचा :

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध


तुम्हाला vij band padli tar marathi nibandh हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

2 thoughts on “[2 Essays] वीज बंद पडली तर मराठी निबंध । vij band padli tar marathi nibandh”

Leave a Comment