[2 Essay] गणेशोत्सव मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi

Ganesh Chaturthi Essay in Marathi । गणेशोत्सव मराठी निबंध । Ganpati Utsav Nibandh Marathi । गणेश चतुर्थी मराठी निबंध या विषयावर तुम्ही हा निबंध वापरू शकता.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंध क्र १.

गणेशोत्सव -Ganesh Chaturthi Essay in Marathi

गणेशोत्सव मराठी निबंध

‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’

भाद्रपद शुद्ध चतुर्थीस श्रीगणरायाचे आगमन होते या चतुर्थीस गणेश चतुर्थी असेही म्हणतात सत्याने व न्यायाने वागणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्या अडचणी येतात, विघ्ने येतात त्यांचा नायनाट करण्यासाठी या कालावधीत गणेशाची आराधना केली जाते.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव ११ दिवस धामधूमीने साजरा करतात. घरगुती गणपती दीड, पाच, सात दिवसांचा तर काहींचा दहा दिवसांचा असतो. प्रत्येक जण आपापल्या आवडीपमाणे गणपतीची सजावट आणि आरास करतात. विद्युत रोषणाई किंवा फुलांची सजावट करतात. सार्वजनिक गणेशोत्सवात विद्युत रोषणाई बरोबरच विविध सामाजिक देखावे सादर करण्यात येतात. अकरा दिवस विविध उपक्रम साजरे केले जातात. निरनिराळे कार्यक्रम, खेळ आणि स्पर्धा घेऊन उत्सवाची रंगत वाढवली जाते. गौरी पूजनही याच काळात होते. घरोधरी गौरी बसवल्यावर सुवासिनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. घरोघरी तसेच गणपतीच्या देवळात पुजा-अर्चा करुन आरत्या म्हणून गणेशाला आळवले जाते. सर्व देव-देवतां मध्ये गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना संघटित करण्यासाठी १८९२ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यातून लोकांच्यात एकजूट निर्माण होऊन राष्ट्र पडविण्याचा टिळकांचा हेतू होता. पण आज याच सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले आहे. सामाजिक उपक्रमाऐवजी समाज विघातक गोष्टी घडत आहेत. वर्गणी जमवण्यासाठी चढाओढ लागत आहे. सामाजिक देखाव्यांची जागा कर्णकर्कश आवाज आणि विद्युत रोषणाईने घेतलेली आहे. आपण सर्वांनी विशेषतः आपल्या सारख्या तरुण मुला-मुलींनी विचार करुन हे बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गणेशोत्सवातील संघटितपणाचा उपयोग दारुबंदी, स्त्रियांवरील अन्याय निवारण, साक्षरता प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन अशा यासारख्या सामाजिक प्रश्नांवर जागृती घडवून आणण्यासाठी केला पाहिजे. यातच खरे राष्ट्रहित आहे. सार्वजनिक गणपती उत्सवाच्या रुपाने तेच खरे गणपती पूजन ठरेल.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी ललकारी देत गणरायाचे विसर्जन करणारे आपण पुढच्या वर्षी गणपती बाप्पाने लवकर येण्याची वाट पहात बसतो.

निबंध क्र २

गणेशोत्सव मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा सण आहे. हा हिंदू धर्माचा अत्यंत आवडता सण आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या सणाच्या आगमनाच्या अनेक दिवस आधी त्याचे सौंदर्य बाजारात दिसू लागते. हा सण हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय प्रसिद्ध सण आहे. हा दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा गणपतीचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो जो माता पार्वती आणि भगवान शिव यांचा मुलगा आहे. तो बुद्धी आणि समृद्धीचा देव आहे, म्हणून लोक समृद्धी मिळवण्यासाठी त्याची पूजा करतात.

पूर्वी हा उत्सव घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा. १८९३ साली लोकांमध्ये एकी यावी म्हणून लोकमान्य टिळकांनी हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत चालू केली.दहा दिवस हा सण आनंदाने साजरा केला जातो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असं म्हणत सारे जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात.

मध्यंतरीच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या अगडबंब मुर्ती बनवण्याची प्रथा पडली होती. परंतु असे गणपती विसर्जन करताना मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होऊ लागले. म्हणून हल्ली काही लोक शाडूचा गणपती बनवतात. किंवा काहीजण घरातच धातूची वेगळी मूर्ती आणून ठेवतात आणि दर वर्षी तिची प्रतिष्ठापना करतात. त्याशिवाय हल्ली ध्वनिक्षेपक लावून मोठा आवाज करण्याची प्रथा पडली होती. त्या प्रथेला न्यायालयानेच आळा घातला आहे.

तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा गणपती उत्सवामध्ये खूप धमाल करत असाल ना ? संगीत खुर्ची गायनाचे कार्यक्रम, आर्केस्टा, विविध देखावे, इत्यादी गोष्टी तुम्ही बघत असाल गणपती उत्सव बाबत तुमचा काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगा.

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा गणेशोत्सव मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a Comment