Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

[2021] Essay On Rangpanchami in Marathi - shabdakshar

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखनातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

माझा आवडता सण रंगपंचमी -

माझा आवडता सण रंगपंचमी

होळी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रंगपंचमी. या सणाला रंगांचा सण म्हणजेच Festival of colours असेही म्हटले जाते. मार्च एप्रिल मध्ये येणारा हा सण लहान मोठ्या सर्वांना एकत्रित आणून आनंद देऊन जातो.

भारतामध्ये रंगपंचमी असा मला खूप महत्त्व आहे बऱ्याच कालखंडापासून हा सण साजरा होतो.

"नको मारु काना पीचकारी, साडी भिजली रंगाने माझी सारी"

या ओळी वरून असे दिसून येते की श्रीकृष्णाच्या काळात सुद्धा रंगपंचमी हा सण साजरा केला जात होता.
होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सन फाल्गुन महिन्यातील सलग येणारे सण हेत. होळी दहनानंतर दोन-तीन दिवसांनी रंगपंचमी हा सण येतो. या सणांमध्ये सर्वजण एकमेकांवर रंग फेकतात एकमेकांना रंग लावतात. काही लहान मुले मुली पिचकाऱ्या मधून रंगाचे पाणी घेऊन एकमेकांवर मारत असतात. गावामध्ये सर्वजण एकत्र येऊन गाणी गातात, नाचतात व एकमेकांवर रंग टाकतात. हा सण एकमेकांना एकत्रित आणतो. ह्या सणा दिवशी एकंदरीत उत्साही वातावरण असते.
मोठमोठ्या शहरात सुद्धा हा सण साजरा केला जातो. मोठ्या आवाजात गाणी लावून सर्वजण गाण्यांवर नाचतात व एकमेकांवर रंग टाकतात. शहरातील लहान मुले विविध प्रकारच्या पिचकाऱ्या , रंग फेकणाऱ्या बंदुका , रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर टाकतात.
जरी एखाद्याला रंग लावून घेणे आवडत नसले तरीही 'बुरा ना मानो होली है' असे म्हणून त्याची समजूत काढली जाते.
होळी किंवा रंगपंचमी साजरी करताना ती पर्यावरणपूरक (Eco friendly) असावी. सध्याच्या काही दिवसांमध्ये अनेक विषारी रंग निघाले आहेत ज्यामध्ये केमिकल्सचा भरपूर वापर केला जातो व त्या लावल्यामुळे त्वचेचे रोग होऊ शकतात, असे रंग स्वस्त मिळतात पण आपण त्याचा वापर टाळला पाहिजे व नैसर्गिक रंग वापरले पाहिजे.
भारतामध्ये रंगपंचमीला जास्त करून चीन वरून रंग येतात ते रंग स्वस्त असतात पण तितकेच घातक असतात आपण त्यांचा वापर टाळला पाहिजे व स्वदेशी रंग वापरले पाहिजेत. शहरातील काही मुले रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर फेकतात, शहरातील बस, रेल्वे यांनी प्रवास करणाऱ्या माणसांवर देखील फेकतात त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो व ते फेकलेले फुगे तसेच पडून राहतात त्यांचे विघटन होत नाही शहरातील गाई, कुत्री असे भटके प्राणी ते खातात व अनेकदा त्यांचा मृत्यु देखील होतो त्यामुळे आपण शक्यतो रंगपंचमीला कोरडे रंग वापरले पाहिजेत त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही माणसांना देखील त्रास होणार नाही, त्वचेचे आजार होणार नाहीत. कोरडे रंग नैसर्गिक रित्या उगवल्या जाणाऱ्या बीट, हळद यांसारख्या शेती उत्पादनातून तयार होतात त्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांचाही फायदा होईल.
म्हणून आज पासून आपण निश्चय करूया की स्वदेशी रंग वापरूनच होळी खेळूया.
जय हिंद..

तुम्ही हा मराठी निबंध खालील विषयांवर वापरू शकता

रंगपंचमी मराठी निबंध
माझा आवडता सण रंगपंचमी
पर्यावरण पूरक रंगपंचमी मराठी निबंध
सोपा मराठी निबंध रंगपंचमी
Holi essay in marathi
My favourite festival Holi in marathi
easy essay on holi


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा