{Essay} तुळशीचे महत्व मराठी निबंध | Tulsi Information In Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो. 

तर आज आपण बघणार आहोत तुळशीचे महत्व ‘Tulasi Information In Marathi’ या विषयावरील मराठी निबंध 

तुळशीचे महत्व – मराठी निबंध

तुळशीचे महत्त्व

तुळस हे एक औषधी रोपटे आहे. दिसायला साधारण असलेली तुळस सर्वगुणसंपन्न असते. आजीच्या बटव्यातील काढ्यात तुळशीला अनन्यसाधारण महत्व होते.

आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वारीला जाताना प्रत्येक वारकरी स्त्रीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन दिसतेच, श्रीकृष्णाला तुळस फार प्रिय होती. तुळशी विवाहाच्या वेळी श्रीकृष्णाचे लग्न तुळशीबरोबर लावले जाते. आपल्या पूर्वजांनी तुळशीचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व जाणलेले होते.

म्हणून तिला देवत्व बहाल केले. तुळस बहुगुणी आहे. ती भोवतालची हवा शुद्ध करते. खोकला, सर्दी, ताप या आजारावर तुळस गुणकारी आहे. त्वचा रोग, दंत रोग यावरील रामबाण उपाय आहे. एखाद्या शुभप्रसंगी सर्वत्र तुळशीपत्राने जल शिंपडून पावित्र्य निर्माण केले जाते.

तुळशीच्या मोहोराला मंजिरी म्हणतात. मंजिऱ्या पाण्यात टाकून ते पाणी पिल्यास पोटाचे विकार, उष्णतादाह कमी होतो. आजही निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक घरात एकतरी तुळशीचे रोपटे हवे. त्यामुळे हवेचे प्रदूषण काही अंशी तरी कमी होण्यास मदत होते. निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी तुळशीचे रोप लावणे आवश्यक असते.

दिवाळीनंतर कार्तिक शुध्द एकादशीपासून तुलसीविवाह प्रारंभ होतो. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. जेव्हा जेव्हा घराला रंगरंगोटी केली जाते तेव्हा तेव्हा तुळशी वृंदावनालाही रंग देतात. त्याच्या समोर रांगोळी काढली जाते, दिव्यांची आरास केली जाते. 

आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीचे महत्व फार आहे. तिला पवित्र मानले जाते. पहाटे सडासंमार्जन झाल्यावर तुळशीपुढे रांगोळी काढली जाते. पूर्वीच्या काळी मुलगी सासरी जाताना तिच्या रुखवतात एक छोटं तुळशी वृंदावन असायचं.

तुळस ही सासुरवाशिणीची प्रिय सखी असते. सासरी होणारा जाच, छळ ती तुळशीजवळ बोलून व्यक्त करते. माहेरची आठवण, आईचे प्रेम तुळशीला सांगुन ती तासन्तास तिथेच रमते. तिच्या सहवासात दुःखाचा कढ सोसते व मन हलके करते.

तुळस ही विशिष्ट सुगंधाने पानोपानी भरलेली नि मंजिन्यांनी नटलेली, नाजूक वनस्पती आहे. तिच्या रोपट्यावर भ्रमर झेपावत नाहीत. फुलपाखरे अवतीभवती भिरभिरत नाहीत. पाखरे आपली घरकुले बनवत नाहीत. 

तुळस हे पवित्र आणि मंगल रोपटे मानले जाते. तुळस ही वृक्षध्वज राजाची कन्या. अनुपम सौंदर्यामुळे तिला तुलसी हे नाव प्राप्त झाले. हिंदू धर्मात देवपूजेत तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तर तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तिला हरिप्रिया असेही नाव आहे. तुळशीच्या पानासहीत जलाने स्नान केल्यास ते स्नान गंगास्नाना समान असते.

आरोग्यदृष्टया तुळस मानवाला उपकारक ठरली आहे तसेच आयुर्वेदिक दृष्ट्या देखील तुळशीचे महत्व खूप आहे.. तुळशीमध्ये कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीर निरोगी राहते. घरात तुळशीचे झाड असले की घरात पिसवा व हिवतापाचे जंतू सहसा शिरकाव करीत नाहीत. म्हणून अंगणात तुलसी वृंदावन असते. तुळशीचे आपणाशी आत्मिक आणि भावनिक नाते आहे.

तुम्ही हा निबंध खालील विषयांवर वापरू शकता – 

  • तुळशीचे फायदे
  • तुळशीचे महत्व
  • तुळशीचे आयुर्वेदिक महत्व
  • Tulasi benefits in marathi
  • Tulasi Information in marathi
  • importance of tulasi

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

हे पण वाचा :

५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध

माझे आवडते झाड – नारळ मराठी निबंध

Leave a Comment