माझा आवडता सण धुलीवंदन | My favourite festival Dhulivandan marathi essay

Dhulivandan marathi essay –

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

तर आज आपण बघणार आहोत Dhulivandan marathi essay म्हणजेच माझा आवडता सण धुलीवंदन या विषयावरील निबंध.

धुलीवंदन मराठी निबंध –

धुलीवंदन मराठी निबंध

होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुलवड, यालाच धुलिवंदन असे म्हणतात. धुलिवंदन या सणाला धार्मिक महत्त्व आहे. होळी दहनानंतर जी राख शिल्लक राहते ती पूर्वीच्या काळी लोक त्यात दूध व तेल ओतून अंगाला लावत असतात. हे करण्यामागचा उद्देश असा होता की होळी दिवशी जगातील सर्व वाईट विचार व वाईट गोष्टी जाळल्या जात असत व ती राख मातीत मिसळली जात असे यावरून जगातील सर्व गोष्टींचा उगम व शेवट मातीतच आहे असे संबोधित केले जात असे. व धुलिवंदनाच्या दिवशी ज्या मातीतून आपण जन्म घेतला त्या मातीला वंदन करण्यासाठी ती राख अंगाला लावण्याची प्रथा होती.


पृथ्वी ,आप(जल), तेज(अग्नि), वायु(हवा), आकाश (अवकाश) ही पंचमहाभूते मानली जातात जगातील प्रत्येक गोष्ट ह्या पंचमहाभूतांपासून तयार होते व तिचा शेवटही त्यातच होतो या पंचमहाभूतांना धुलीवंदनाच्या दिवशी मानवंदना दिली जाते.
पूर्वीच्या काळी होळीच्या दिवशी जाळलेली लाकडे लोक आपल्या घरी नेतात व त्यावर पाणी तापवून अंघोळ करण्याची प्रथा होती. सध्या भारतात काही मोठ्या शहरांमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी ही रंग खेळले जातात पण खेड्यांमध्ये रंगपंचमी दिवशी रंग खेळले जातात.


सध्या धुलीवंदनाच्या चित्र काही बदलत चालले आहे. प्रामुख्याने धुलीवंदनाच्या दिवशी लोक मटन दारू इत्यादींचे भरपूर सेवन करतात तशी प्रथाच पडत चालली आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सणांना धार्मिक महत्त्व आहे ते आपण जपले पाहिजे धुलीवंदना दिवशी निसर्गाची कोणतीही हानी होणार नाही याच्या पण काळजी घेतली पाहिजे.
होळी दिवशी पूर्वी वाळलेली व उपयोगात नसणारी लाकडे जाळी जायची पण सध्या महागडी लाकडी जाळण्याची प्रथा आहे. ती आपण थांबवली पाहिजे. व धुलीवंदना दिवशी किमान एक तरी झाड आपल्या घरापुढे लावले पाहिजे.
धन्यवाद.

तुम्ही हा निबंध पुढील विषयांवर वापरू शकता

  • माझा आवडता सण धुलीवंदन
  • धुलीवंदनाच्या धार्मिक महत्त्व
  • धुलीवंदन मराठी निबंध
  • होळी सणाचे महत्व मराठी निबंध
  • Dhulivandan marathi essay
  • easy essay on Dhulivandan

 

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

हे पण वाचा :

५८+ सोपे मराठी निबंध

सावित्रीबाई फुले निबंध

माझी आई मराठी निबंध

वीज बंद पडली तर मराठी निबंध । vij band padli tar marathi nibandh

वाचनाचे महत्त्व व वाचनाचे फायदे मराठी निबंध

1 thought on “माझा आवडता सण धुलीवंदन | My favourite festival Dhulivandan marathi essay”

Leave a Comment