Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

माझी आई मराठी निबंध | Marathi Essay On My Mother

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता. माझी आई हा निबंध आम्ही इयत्ता १ली, २री, ३री, ४थी, ५वी, ६वी, ७वी, ८वी, ९वी, १०वी, ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३००, ४०० व ५०० शब्दांमध्ये पुरवले आहे.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे :

१) हस्ताक्षर सुंदर असावे.

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात, मध्य, शेवट.

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.


माझी आई

३०० शब्दात ४०० शब्दात ५०० शब्दात
            स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हे त्रिकाल सत्य आहे. आई नसताना आणि सर्व राज्य, संपत्ती, सत्ता हातात असली तरी ते वैभव कवडीमोल ठरते. राजाच्या घरात साक्षात लक्ष्मीदेखील पाणी भरत असली तरी आईविना तो राजाही भिकारी ठरेल. आहेच तेवदे आईच्या प्रेमाचे सामर्थ्य ! मूल आजारी असेल तर तोंडात पाण्याचा थेंबही न घेता ती मुलाच्या उशाशी बसून राहील. मूलाला बरे वाटावे म्हणून देवाला साकडे घालील. रात्रभर हाताचा पाळणा अन् डोळ्यांचा दिवा करुन ती आजारी मुलाची देखभाल करीत राहील, व तो बरा होईपर्यंत काळजी घेत राहील.

            आईइतका समर्पण आणि त्याग इतर कोणी करू शकत नाही. आपल्या जन्मापूर्वीच आई आपली काळजी घेऊ लागते, ती जगातील सर्वात मोठ दुखणे सहन करून आपल्याला जग दाखवते, लहानाचं मोठं करते, या कलयुगात कोणाशी कसे वागावे, कोणत्या परिस्थितीला कसे निर्णय घ्यावे हे सर्व आईच बरोबर शिकवू शकते.

"कठीण दिसणाऱ्या वाटाही
सहज पार होतात
आईचे आशीर्वाद
जेव्हा आपल्या सोबत असतात."

            समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी व आकाशाचा कागद करुन आईचे गुणगान लिहावयास बसलो तरी आईची माया लिहून संपणार नाही, म्हणूनच म्हणतात, 'आई ही दोन अक्षरे ह्रदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवा.' बालपणापासून तारुण्यापर्यंत आपल्या मुलाच्या सर्व व्यथा फक्त आईच समजू शकते. मुलाच्या हितासाठी आई रागावते. प्रसंगी मारते व रागावून देखील बोलते, पण त्यामागच्या तिच्या भावना मात्र फार वेगळ्या आणि उदात्त असतात. आपले मूल शिकुन कोणीतरी मोठे बनावे, त्याचे समाजात चांगले नाव असावे, त्याचे भवितव्य उज्वल व्हावे, एवढीच प्रांजळ इच्छा तिच्या मनात असते.

            आईच्या मायेतच इतकी ताकद असते की तिच्या रागापेक्षा तिने केलेले प्रेम अधिक लक्षात राहते. जगातील कशाचीही भरपाई करता येईल पण आईच्या विरहाची भरपाई कधीच भरून येणार नाही. आई-मुलाच्या प्रेमाचे नाते अतूट असते. आईचे मुलावरील प्रेम म्हणजे जीवनाचे भूषण होय.

            ज्याला आईचे प्रेम मिळाले नसेल त्याचे जीवन म्हणजे अस्थिचर्ममय सांगाडा आहे. त्यात मन, आत्मा हे जीव राहतात. आईचे प्रेम गरीबीच्या मीठाला लावून खाल्यास तो राजाचाही राजा बनतो, असे हे निर्मळ, निर्व्याज प्रेम शब्दात मावणार नाही. लिहून सरणार नाही. पैशाने खरीदले किंवा विकले जाणार नाही.

आई म्हणजेच वात्सल्य सिंधू.

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!


तुम्हाला  आई बद्दल कविता पहायच्या असतील तर  marathicharoli.in ला भेट  द्या .

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा