Gudi Padwa Essay In Marathi । गुढीपाडवा वर निबंध मराठी । Gudi Padwa Essay
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात.
तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा वर निबंध मराठी.
निबंध क्र. १
Table of Contents
Gudi Padwa Essay In Marathi
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शालिवाहन शक या कालगणनेचा प्रारंभ होतो. प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी वालीचा वध केला. गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा वर्षातील पहिला सण होय. गुढीपाडवा हा दिवस साडे-तीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ करतात. प्रभू रामचंद्र याच दिवशी वनवासातून अयोध्येला परतले. लोकांनी घरोघरी गुढ्या- तोरणे उभारुन त्यांचे स्वागत केले.
चैत्र महिन्यात झाडांची पानगळ थांबून नवी पालवी फुटते, आणि वसंत ऋतुला सुरुवात होते. संत चोखोबांनी म्हटले आहे.
‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी’, ‘वाट ती चालावी पंढरीची’
पुराणात एक कथा सांगितली जाते. एकदा एका महापुरात सर्व सृष्टिचा विनाश झाला. तेव्हा ब्रह्मा पुन्हा दुसऱ्या सृष्टिची निर्मिती केली. तो दिवस म्हणजे पाडवा होय. गुढीला ‘ब्रह्म ध्वज’ असेही म्हणतात. ब्रह्मध्वज विजयाचे, प्रेमाचे, उत्साहाचे प्रतीक आहे. झाडाची जीर्ण पाने गळून जाऊन नवीन पालवी येते तसेच जुने त्याज्य विचार जाऊन नवीन चांगले विचार करण्याचा हा काळ होय.संत ज्ञानेश्वर म्हणतात,
“अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनाकरवी गुढी सुखाची उभवी”
शालिवाहन राजाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे सैनिक तयार केले त्या मातीच्या पुतळ्यांत प्राण ओतून युद्धात फौज सिद्ध केली. या सैन्याने अलौकिक पराक्रम केला.शालिवाहनाचा विजय झाला. या दिव्यशाली पराक्रमाची स्मृती म्हणून शालिवाहनाने या दिवशी आपला शक सुरू केला. गुढी हे स्वातंत्र्याचे तसेच विजयाचेही प्रतीक आहे. उंच उंच गुढी उभारून आपण ही समाजात नव-चैतन्याचा, ज्ञानाचा प्रसार करूया. जेणेकरून सर्व क्षेत्रांमध्ये आपला देश प्रगत होईल कारण गुढीचा अर्थच असा आहे की आनंदाच्या वेळी, यश प्राप्त झाल्यावर तो साजरा करण्यासाठी, आनंदाचे यशाचे प्रतीक म्हणून गुढी उभारायची आणि आपल्या आनंदात सर्वांना सामील करून घ्यायचे.
निबंध क्र. २
गुढीपाडवा वर निबंध मराठी
आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो.
हा सण कित्येक ठिकाणी वसंत ऋतूच्या आगमनात साजरा केला जातो. या वेळी झाडे झुडपे हिरवीगार होतात, त्यांना नवी पालवी फुटते, रंगीबेरंगी फुले लागतात. वातावरण शांत आणि आल्हादायक असते. अशा वातावरण गुडी पाडवा हा सण लोकांच्या आनंदात आणि उत्साहात आणखीनच भर पाडतो.
प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून वनवास संपून आयोध्या नगरी मध्ये प्रवेश केला . त्या दिवशी श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी आयोध्येतील प्रजेने गुढ्या, तोरणे उभारली होती आणि आनंद साजरा केला होता . तीच प्रथा पुढे वर्षानुवर्षे चालत आली म्हणून आजही घरोघरी गुढी उभारली जाते . दारासमोर सुबक रांगोळी काढली जाते . या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरच्या दारासमोर गुढी उभारली जाते
तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून गुढी उभारण्यासाठी एका स्वच्छ काठीच्या टोकावर नवे व शुभ्र वस्त्र लावले जातात. या नव वस्त्रांवर झेंडूची फुले, कडूलिंबाचे पाने आणि तांब्याचा लोटा लावला जातो. या नंतर या गुढीची पूजा करून तिला घराबाहेर उभे केले जाते. गुढीच्या अवतीभवती पाट ठेवून रांगोळी व इतर सजावट केली जाते. यानंतर दुपारी सूर्यास्तापूर्वी हळद-कुंकू ने पूजा करून अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.
गुढीपाडवा या दिवशी घरामध्ये नवीन वस्तू आणि शुभकार्याला सुरुवात करणे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण नवीन वस्त्र धारण करतात लहान मुलांना साखराचा घातला जातो. अशाप्रकारे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहा मध्ये साजरा केला जातो
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात . महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोषाखात मिरवणुकीत सहभागी होतात . मागील वर्षातील सर्व काही विसरून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने उत्साहाने करावी आणि येणारे नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी . हाच संदेश गुढीपाडव्याचा सण आपल्याला देतो.
मित्रांनो तुम्हाला हा Gudi Padwa Essay In Marathi निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
हे नक्की वाचा :