Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

[2021] Holi essay in marathi easy - shabdakshar

टिप्पणी पोस्ट करा

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.


निबंधलेखनातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.


होळी मराठी निबंध -

होळी मराठी निबंध  Holi essay

 'होळी रे होळी पुरणाची पोळी दणाणून सोडूया आपली आळी'

   "होळी म्हणजे पुरणाची पोळी', होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या रात्री मुले आपल्या अंगणात खड्डा खणतात. त्यात लाकडे, गोवऱ्या रचल्या जातात. त्याला फुलांनी सजवले जाते. संध्याकाळी सर्व स्त्री-पुरुष, मुले मुली एकत्र येऊन नारळ फोडतात आणि होळी पेटवतात. माणसांच्या कुकर्माची, पापांची, अन्यायाची होळी केली जाते.

   होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे फाल्गुन मासात येणारे सण आहेत. फाल्गुन मास हा मराठी दिनदर्शिकेतील शेवटचा महिना असतो. त्यामुळे या सणांना खूप महत्त्व आहे. होळी दिवशी लाकडे गोवऱ्या पेटवतात व धुलीवंदनाच्या दिवशी पूर्वी लोक ती राख एकमेकांना लावत असत. नंतर लोक राखेच्या ऐवजी गुलाल वापरू लागले व नंतर रंग वापरण्याची प्रथा सुरू झाली त्यामुळे होळी, धुलवड व रंगपंचमी हे तीन सण लागोपाठ येतात.

   पूर्वीच्या काळी हिरण्यकश्यप राक्षसाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यप विष्णुचा शत्रू होता. परंतु प्रल्हाद मात्र विष्णुचा निःस्सीम भक्त होता. दिवसाचा सर्व काळ तो 'नारायण'" 'नारायण' असे म्हणण्यात व्यतीत करित असे. आपल्या मुलाच्या या भक्तीने त्रासलेला हिरण्यकश्यप आपली बहिण होलीकाला पर्याय विचारतो. होलीकाला आगीतदेखील नजळण्याचे वरदान मिळालेले असते. म्हणून ती प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीत बसते. पण विष्णुभक्त प्रल्हाद काहीही इजा न होता सुरक्षित राहतो. होलीका मात्र अग्नित होरपळून भस्म होते. म्हणूनच भेदभाव, आपसांतील वाद तंटे किंवा वाईट गोष्टी जाळून टाकणे याचे प्रतिक म्हणून होळी पेटवली जाते. ज्याच्याशी वैर मिटवून टाकायचे त्याच्या नावाने ओरडून होळीभोवती फेरी मारली जाते.

   'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका' या कवी केशवसुतांच्या काव्यपंक्ती प्रमाणे युवकांनी व विद्यार्थ्यांनी हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जुन्या अन्याय चालीरीति, अपप्रवृत्ती, कालबाह्य विचार, समाजातील अंधश्रद्धा मूळापासून उखडून टाकून द्यायला हव्यात. समाजातील गरीब-श्रीमंत, उच्च-नीच ही विषमता नष्ट व्हावी म्हणून नवविचार, नव्या कल्पनांनी प्रगतीशील, आदर्श समाज घडविण्यासाठी झटले पाहिजे. 'समाजातील दुष्ट प्रवृत्तींचे दहन करणे' हाच या सणाचा खरा हेतू आहे, संदेश आहे.

   होळीचा दुसरा दिवस म्हणजे धूळवड. या दिवशी सर्वजण आपसातले भांडण विसरुन एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करतात आणि एकमेकांच्या तोंडालाही रंग लावतात. हा सण मैत्रीचे, एकोप्याचे तसेच आनंदी जीवनाचे प्रतीक आहे. जीवनात अनेक प्रकारचे चढ उतार येत असतात. पण आपण हसतमुखाने सर्व दुःखांना सामोरे जायला हवे. आपले जीवन नानाविध रंगांनी उजळून जावे हेच यातुन सूचित होते.

तुम्ही हा मराठी निबंध खालील विषयांवर वापरू शकता -

होळी मराठी निबंध
माझा आवडता सण होळी
पर्यावरण पूरक होळी मराठी निबंध
सोपा मराठी निबंध होळी
Holi essay in marathi
My favourite festival Holi in marathi
easy essay on holi


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा