{Essay} माझा वाढदिवस मराठी निबंध | Essay on my birthday in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत माझा वाढदिवस मराठी निबंध

माझा वाढदिवस मराठी निबंध | Essay on my birthday in marathi | “माझा वाढदिवस” निबंध मराठी | Maza vadhdivas essay in marathi | My birthday essay in mararthi या विषयावर तुम्ही हा निबंध वापरू शकता.

निबंध क्र. १

माझा वाढदिवस मराठी निबंध [Boy]

माझा वाढदिवस मराठी निबंध

माझा वाढदिवस २५ मे रोजी असतो. दरवर्षी माझ्या कुटुंबातील सर्वजण माझा वाढदिवस आनंदाने आणि खेळीमेळीने साजरा करतात. या निमित्ताने माझे दोन्ही आजी-आजोबा, काका काकी, मामा-मामी आमच्या घरी येतात. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील बोलावले जाते.

उन्हाळ्याची सुटी असल्याने सर्वजण अभ्यास व परीक्षेच्या तणावातून मुक्त असतात. जणूकाही आम्ही या दिवसाचीच वाट पाहत असतो. मला सर्वजण शुभेच्छापत्रे आणि छान छान पुस्तके, खेळणी भेट म्हणून देतात. माझी वाचनाची आवड पाहून विज्ञानाची, सामान्यज्ञानपर पुस्तकेही देतात. त्यामुळे पाठ्यपुस्तकांबरोबरच अनेक विषयावरील विविध पुस्तके माझ्या संग्रही जमा झाली आहेत. मला मोठेपणी पायलट बनायचे आहे. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारची आणि आकारांची विमाने, हेलिकॉप्टर्स माझ्या कपाटात आहेत. सर्वजण माझ्या या छंदाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात.

यावर्षी मी १२ वर्षाचा झाल्याने आई-बाबांनी माझा हा वाढदिवस अविस्मरणीय करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्वजण माझ्या वाढदिवसाच्या तयारीला लागले. बाबांनी घराला माझ्या आवडीचा रंग दिला. घरावर विद्युत रोषणाई केली. बैठकीची खोली रंगीबेरंगी कागदांनी आणि फुग्यांनी सजवली. आईने माझ्या आवडीचे पदार्थ तयार केले. मी सकाळीच अनाथाश्रमात आई-बाबांबरोबर जाऊन तेथील मुलांना मिठाई, खेळणी व गोष्टीची पुस्तके भेट म्हणून देवून आलो.

संध्याकाळी मी मला आणलेले नवीन कपडे घातले. आईने मला कुंकुमतिलक लावून ओवाळले. मी मेणबत्या विझवून केक कापला. “हॅपी बर्थ डे” म्हणत टाळ्या वाजवून सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. सर्व मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करुन मी त्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्या मित्रमैत्रीणीनी गाणी म्हटली. आलेल्या सर्वांना ती गाणी खूप आवडली. नंतर आम्ही विविध गेम्स खेळलो. जे जिंकले त्यांना बाबांनी बक्षिसे दिली. खूपच मजा आली.

नंतर आम्ही सर्वांनी आईने दिलेला फराळ, केक नि चॉकलेटस खाल्ले. कैरीचे थंडगार पन्हे पिऊन सर्वजण तृप्त झाले. माझा छायाचित्रणाचा छंद जाणून माझ्या मामांनी मला सुंदर कॅमेरा भेट म्हणून दिला तर पक्षीनिरीक्षणाच्या आवडीबद्दल काकांनी छानशी दुर्बिण दिली. हा असा आनंदाचा सोहळा व्हिडीओने चित्रित केल्याने अविस्मरणीय ठरला.

रात्री जेवणानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. सर्वजण गेल्यावर माझ्या आईने मीठ-मिरचीने माझी दृष्ट काढली. आईच्या कुशीत आरामात झोपी गेलो नि स्वप्नांच्या नगरीत पोहचलो.

 निबंध क्र. २

Essay on my birthday in marathi [Girl]

वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी आपण जन्मतो. हा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष दिवस आहे. वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची एक खास पद्धत असते. जरी प्रत्येक वाढदिवस आपल्याला आपल्या आयुष्यापेक्षा एक वर्ष कमी असल्याची आठवण करून देतो, तरीही आपण तो साजरा करतो आणि तो एक विशेष दिवस बनवण्याचा प्रयत्न करतो.

आपल्या देशात आधीच्या काळात फक्त राजे महाराजे आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करीत असत. परंतु आजच्या काळात वाढदिवस साजरे करण्याचे स्वरूप बदलून गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती वाढदिवस साजरा करताना दिसतो. आपल्या देशात वाढदिवसाला केक कापून पार्टी देण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे. 

माझा वाढदिवस हा एप्रिल महिन्याच्या २० तारखेला येतो. मी सुद्धा या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिनींना पार्टी देण्याचे ठरवले. मी आई बाबांना या पार्टी बद्दल सांगितले. माझ्या आई बाबांना सुद्धा हि कल्पना आवडली.

माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. तिने मला माझ्या मित्र-मैत्रिनींना निमंत्रण द्यायला निमंत्रण पत्रिका बनवायला व त्यात नावं भरायला मदत केली. तिने मला ज्या मित्र-मैत्रिणींना कॉल करायचा आहे त्यांची यादी बनवून दिली. आणि नंतर माझ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीला पाठवण्यासाठी कार्ड बनवले.

माझ्या वाढदिसानिमित्त तिने घराची खूप सुंदर सजावट केली. या वाढदिवसाला माझी खोली इतकी सुंदर सजवलेली पाहून मी थक्क झाले. हे सर्व माझ्या बहिणी आणि मित्रांनी मिळून केले. व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट केक हा माझा आवडता केक होता आणि तो मेणबत्त्यांनी सुंदर सजवला होता. त्यानंतर मी मेणबत्त्या विझवल्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा या गाण्याने केक कापला. यानंतर मी माझ्या पालकांचे आणि माझ्या वडिलांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेतल्या. माझ्या आईने वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित प्रत्येकाला केक आणि नाश्ता दिला.

माझ्या वाढिवसानिमित्त मला खूप साऱ्या भेटवस्तू देखील मिळाल्या. माझ्या प्रत्येक मित्र-मैत्रिनींनी व नातेवाईकांनी माझ्यासाठी खूप सुंदर सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या. माझ्या आईबाबांनी मला एक सुंदर ड्रेस गिफ्ट केला होता. आणि मी तोच ड्रेस माझ्या वाढदिवसादिवशी घातला होता.

माझा वाढदिवस हा माझा वर्षातील खूप आवडता दिवस असतो. व मी तो अनुभव व आनंद वर्षभर तरी विसरत नाही.

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा माझा वाढदिवस मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

1 thought on “{Essay} माझा वाढदिवस मराठी निबंध | Essay on my birthday in marathi”

Leave a Comment