[UPDATED] प्राणिसंग्रहालयाला भेट मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

प्राणिसंग्रहालयाला भेट

मागच्या रविवारी मी माझ्या आईबाबांसोबत वीरमाता जिजाबाई प्राणीसंग्रहालय पहायला गेले होते. तिथे मी खूप प्राणी पाहिले. वाघ, सिंह, चित्ता हे सर्व प्राणी पिंजऱ्यात होते. त्यांचे क्रूर चेहरे पाहून क्षणभर भीती वाटली जणुकाही ते म्हणतच आहेत की आम्हाला या पिंजऱ्यातून मोकळे करा, मग पहा आमची ताकद.

पुढे हत्तीलाही साखळदंडाने बांधलेले पाहिले. आपले सुपासारखे कान हलवत हत्ती ऊस चघळताना दिसला. हत्तीच्या पाठीवर एक अंबारी होती त्यांतून मुलांना फेरफटका मारण्याची सोय होती. मी देखील एक फेरी मारुन घेतली. माकडांच्या पिंजऱ्याजवळ विशेष मजा आली. काही माकडे झाडांवर टांगून वेडेवाकडे चाळे करत होती. काहीजण खाजवत तर काहीजण भांडत होती. एक शहाणे माकड आम्ही दिलेले केळ निमुटपणे खात होते.

पाणघोडा थंड पाण्यात बसून उन्हाळयाच्या गर्मीपासून स्वतःचे रक्षण करत होता. एकशिंगी गेंडा आपल्याच मस्तीत हुंदडत होता. निरनिराळ्या रंगांचे आणि प्रकारांचे साप काचेच्या पेटीत बंदिस्त होते. पक्षी पाहताना खूप मजा आली. पोपट, मोर आणि सारस, करकोचे यांचे विविध रंग आणि आकार खूप आवडले. आईस्क्रीमचा स्वाद घेत संध्याकाळी घरी परतलो.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment