[UPDATED] आमच्या शाळेचे ग्रंथालय मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

आमच्या शाळेचे ग्रंथालय

आमच्या शाळेचे ग्रंथालय मराठी निबंध

माझ्या शाळेचे ग्रंथालय खूप मोठे आहे. ते शाळेच्या पहिल्या मजल्यावर आहे. त्यात विविध विषयांवर पाच हजारांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक तसेच राजेरजवाडे. पेशवे आणि छोट्या छोट्या परिकथा असणारी देखील खूप पुस्तके आहेत. पुस्तकांबरोबरच शास्त्राच्या प्रयोगांची कृती दाखवणार्या प्रयोगांच्या सीडीज सुद्धा आहेत. मला वाचनाचा खूप छंद आहे. त्यामुळे मी रोज एकतरी पुस्तक वाचतेच त्यामुळे एखाद्या दिवशी शाळा लवकर सुटली किंवा तासावर शिक्षक आले नाहीत तर मी ग्रंथालयात जाऊन बसते.

आमच्या ग्रंथालयाच्या देशमुखबाई खूपच प्रेमळ आणि हसतमुख आहेत. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीची पुस्तके वाचण्याची पूर्ण मुभा देतात. त्यामुळे आम्हाला शांतपणे तिथे बसुनही पुस्तके वाचता येतात. मला ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा छंद आहे त्यामुळे त्या माझ्या आवडीचे ऐतिहासिक पुस्तक मला लगेच काढून देतात.

आमच्या ग्रंथालयातील कपाटात सर्व पुस्तके विषयाप्रमाणे लावलेली असल्याने सहज सापडतात. देशमुखबाई पुस्तके हाताळण्याच्या बाबतीत फार काटेकोर आहेत. त्यामुळे पुस्तक खराब झालेले किंवा फाटलेले त्यांना अजिबात चालत नाही. आमच्या शाळेच्या ग्रंथालयात मासिके, वर्तमानपत्रे तसेच सामान्यज्ञानाचीही पुस्तके आहेत. विविध शब्दकोश आणि वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानकोश म्हणजे आमच्या शाळेच्या ग्रंथालयाचे भूषण आहे. एखाद्याला महत्त्वाचे पुस्तक हवे असेल तर बाई ते लगेच मागवतात व इच्छुकाला मिळवून देतात. त्यामुळे बऱ्याच जणांचा ज्ञानाचा संचय खूप वाढला आहे. आमच्या शाळेचे ग्रंथालय म्हणजे माझ्यासारख्या वाचकाला मोठी देणगीच आहे.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment