Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

माझी शाळा मराठी निबंध । Mazi Shala Marathi Nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता. "माझी शाळा" हा निबंध आम्ही इयत्ता १ली, २री, ३री, ४थी, ५वी, ६वी, ७वी, ८वी, ९वी, १०वी, ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३००, ४००, ५०० शब्दांमध्ये व १० ओळींमध्ये देखील पुरवले आहे.

निबंधलेखनातील महत्वाचे मुद्दे -

१) हस्ताक्षर सुंदर असावे.

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट.

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

माझी शाळा

३०० शब्दात ४०० शब्दात ५०० शब्दात
'मज आवडते ही मनापासूनि शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा'

            माझे गाव म्हटले तर छोटे शहर आहे. आधुनिक पद्धतीने सजलेले. त्यात माझी शाळा, तिचे नाव 'छत्रपती संभाजी विद्यालय'. विद्यालयाजवळून एक खळाळणारा ओढा जातो. आमच्या शाळेची इमारत अर्धगोलाकार आहे.

            शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शुरवीर संभाजीसारखे तडफदार आणि स्वाभिमानी बनावे म्हणून शाळेला कदाचित संभाजीराजांचे नाव दिले असावे. ही इमारत चार मजली असून तळमजला, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि विद्यार्थी वस्तुभांडाराने व्यापला आहे. पहिल्या मजल्यावर शिक्षक आणि मुख्याध्यापिकांसाठी वेगवेगळ्या भव्य खोल्या आहेत. तसेच अतिशय मोठे सभागृह प्रार्थनेसाठी आहे. शाळेचे निरनिराळे कार्यक्रम इथेच भरवले जातात. गणपती उत्सव आणि नवरात्रीत याच सभागृहात आयोजन केले जाते. याच सभागृहात योगासनांचा वर्ग देखील भरवला जातो.

            तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. प्रत्येक वर्गाच्या चार तुकड्या आहेत. दोन हजाराच्यावर विद्यार्थी या शाळेत शिकतात. शाळेतील सर्व वर्ग स्वच्छ सूर्य प्रकाशित आणि हवेशीर आहेत. माझ्या शाळेतील शिक्षक आपापल्या विषयात तज्ज्ञ आहे. आमचे सर्व सर आणि बाई खूपच छान शिकवतात आणि समजावून सांगतात तसेच शिस्तीत ही कडक आहेत. आमचे पी.टी. चे शिक्षक आम्हाला निरनिराळ्या कवायतींबरोबर, वेगवेगळ्या खेळांतही मार्गदर्शन करतात. त्यामुळेच राज्यस्तर पातळीवरील निरनिराळ्या स्पर्धेत आमची शाळा सुवर्णपदके आणि विविध पदके पटकावते. गेल्याच वर्षी माझ्या शाळेतील एका विद्यार्थिनीने आंतरराज्यीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.

            आमचे शिपाईकाकाही आमचा वर्ग आणि परिसर स्वच्छ ठेवतात. आमच्या शाळेच्या बागेची काळजी घेणारे चोपडे काका एखाद्या खोडकर मुलाला फूल न तोडण्यासाठी धमकावतात तर फुलवेड्या मुलींना एखाद्या वेळेस गुलाबाचे फूल घेऊ देतात. ते दररोज सरस्वतीच्या फोटोला हार घालतात.

            आमच्या शाळेत अभ्यासाबरोबरच नाट्यवाचनाची तयारी, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेची तयारी करुन घेतात. यावर्षी आमच्या जगताप सरांना "आदर्श शिक्षकाचा" पुरस्कार मिळाला. "स्वच्छ शाळेच्या स्पर्धेत" आमची शाळा नेहमीच पहिल्या पाच शाळेत असते.

            आम्ही सर्वजण अभ्यासाबरोबरच इतर स्पर्धेतही भाग घेऊन शाळेसाठी बक्षिसे मिळवून आणतो. आमची शाळा ज्ञान आणि चांगल्या संस्कारांचे केंद्र आहे. शाळेच्या नावाला कमीपणा येईल असे आम्ही कधी वागत नाही. कारण आमची शाळा आणि आमचे शिक्षक हे आम्हाला आवडतात. आमचे त्यांच्यावर प्रेम आहे कारण ते आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात.

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा