[UPDATED] माझे आवडते झाड – नारळ मराठी निबंध

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

माझे आवडते झाड : नारळ

माझे आवडते झाड - नारळ मराठी निबंध

‘माझ्या कोकणात ताडामाडाची दाटी पिऊन अमृतधारा प्रसाद नारळाची वाटी’

माझ्या घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे आहेत. त्यात आंबा, चिंच, पिपळ फणस,नारळ, केळी यांचा समावेश आहे. काही फुलझाडेही आहेत. मला झाडांच्या सावलीत आराम करायला, खेळायला खूप आवडते. आमचा भरदुपारचा लपंडाव देखील माझ्या घरामागच्या बागेतच अधिक रंगतो. झाडांचे आपल्या जीवनात फारच महत्व आहे. झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते. पाणी, सावली, गारवा तसेच फळे, फुले हे आपल्या जीवनात फार उपयुक्त आहेत, तेही आपल्याला झाडांमुळेच मिळते.

प्रत्येक वृक्ष नानाविध वैशिष्ट्यामुळे आपणास उपयोगी पडतो. सर्व वृक्ष भिन्न आकार आणि प्रकारचे असतात. काही खुरटे, झुपकेदार, काही उंच किंवा फांद्याविरहित असतात. मला गगनाशी स्पर्धा करणारा नारळ खूप आवडतो. नारळाच्या झाडाला फारशा फांद्या नसतात. त्यांच्या पानांच्या फुलोन्याला झावळ्या असे म्हणतात. त्याच्यापासून विशेष सावली मिळत नाही. त्यामुळे थकलेल्या वाटसरुला त्याचा काहीच उपयोग नाही पण त्याचे अंगप्रत्यंग विविध कारणांसाठी वापरले जाते. त्यामुळेच नारळाला ‘कल्पवृक्ष” असे म्हणतात. कोकणात नारळाला ‘माड’ असेही म्हणतात.

माडाचे फळ म्हणजे नारळ. ज्याला आपण श्रीफळ असे म्हणतो. कोणत्याही पूजेला किंवा शुभकार्याला श्रीफळ ठेवून किंवा वाटवून त्याची सुरुवात केली जाते. खोबऱ्याचा नैवेद्य म्हणूनच नव्हे तर सवाष्णीची खणानारळाने ओटी भरण्यासाठी. नवस पूर्ण करण्यासाठी देखील नारळाचा वापर केला. नारळाच्या आतील गराला खोबरे असे म्हणतात. खोबरे भाजीचा स्वाद वाढविण्यासाठी,

चटणी, कोशिंबीर बनवायला किंवा तेल काढण्यासाठी वापरतात. नारळाची करवंटी जाळण्यासाठी किंवा धूर करुन डासांना पळवण्यासाठी वापरतात. नारळापासून बनविलेले तेल स्वयंपाकासाठी किंवा केसांना लावण्यासाठी उपयुक्त असते.

नारळाचे झाड २०-३० मीटर उंच वाढते. त्याच्या झावळ्यांचा उपयोग घरे, गोठे शाकारण्यासाठी, झोपड्यांची कवाडे बनवण्यासाठी होतो. झावळ्यांच्या हीरापासून झाडू, खराटे तसेच केरसूण्या, दोरखंड बनवतात. वाळलेल्या झावळ्या सरपण म्हणूनही वापरतात. नारळापासून मिळणारा काथ्या फर्निचर, सोफा, खुच्र्या मध्ये घालून ते गुबगुबीत बनवले जाते.

नारळ अपरिपक्व असताना शहाळे म्हणून संबोधले जाते. ते पूर्ण पेय म्हणून गणले जाते. ते उर्जावर्धक असल्याने आजारी व्यक्तीला तरतरी येण्यासाठी देतात. गरमीच्या दिवसात किंवा उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीला उष्णता कमी करण्यासाठी शहाळे प्यायला सुचविले जाते. नारळाच्या काथ्यापासून जो दोर बनतो तो शेतीच्या कामाला, विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाटाला बांधायला किंवा बैलगाडीच्या बैलांच्या गळ्यात कासरा म्हणून उपयोगी पडतो. खोडाचा उपयोग इमारतीसाठी तसेच इंधनम्हणून केला जातो. नारळाच्या पान, फळ, बुंधा या सर्वांचा वापर कुठे ना कुठेतरी होतोच.

उष्ण, दमट हवामानात तसेच समुद्र किनाऱ्यावर नारळाची चांगली लागवड होते. भारतात पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर यांची जोपासना होते. कोकणात नारळामुळे अनेक लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment