[UPDATED] फळांचा राजा आंबा मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

फळांचा राजा आंबा

फळांचा राजा आंबा मराठी निबंध

फळे खायला कोणाला आवडत नाहीत? गोड रसाळ फळे खावी तितकी कमीच. काही लोकांना आंबट फळेही खूप आवडतात. पण मला आंबा खूप आवडतो. आंब्याचे हापूस, पायरी, केशरी, रायवळ असे अनेक प्रकार आहेत. सर्वच प्रकारचे आंबे मधुर आणि रसाळ असतात. आंबा चोखून खावा किंवा आमरस बनवावा त्याची गोडी काही न्यारीच असते. आंब्याच्या फोडी करुन सुद्धा खातात. महाराष्ट्रात आंब्याचे प्रमुख उत्पादन कोकण विभागात होते. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कच्च्या आंब्याचे लोणचेही रोजच्या जेवणाला चव आणते. कैरीचे गुळ साखर घालून पन्हे करतात. आंब्यापासून पोळी, जॅम, जेली, चॉकलेटस् असे अनेक खाद्यपदार्थ बनतात. म्हणूनच आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात.

आंबा वर्षभर न मिळता फक्त उन्हाळ्यातच मिळतो. त्यामुळे साखरांबा, मुरांबा तसेच रस बनवुन वर्षभर वापरला जातो. त्यामुळे आंब्याचा आस्वाद वर्षभर घेता येतो. कच्चा आंबा हिरवा असतो तसेच चवीला आंबटही असतो. पिकलेला आंबा पिवळाधमक दिसतो. उन्हाळ्यात फळ बाजार निरनिराळ्या प्रकारच्या आंब्यांनी भरलेला दिसतो. सर्व आंबा प्रकारात हापूस आंब्याला जास्त मागणी व भावही असतो. हल्ली परदेशातूनही त्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन प्राप्त होते.

आंबा हे फळ बागायतदार तसेच व्यापारी यांना आर्थिक फायदा मिळवून देणारे असते. हा फळांचा राजा बाजारात येईपर्यंत सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत असतात.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment