नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत शालेय क्रीडा महोत्सव मराठी निबंध – Annual Sports Day Essay in Marathi
शालेय क्रीडा महोत्सव मराठी निबंध | Annual Sports Day Essay in Marathi | Shaley Krida mahotsav marathi nibandh | वार्षिक क्रीडा महोत्सव मराठी निबंध । राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध । क्रीडा महोत्सव – sports festival या विषयांवर तुम्ही हा निबंध वापरू शकता.
शालेय क्रीडा महोत्सव मराठी निबंध
आमच्या शाळेत दरवर्षी विविध वार्षिक सामने असतात. खेळांच्या स्पर्धा आणि विविध उपक्रम आयोजित केले जातात. जवळजवळ ४ दिवस सर्व प्रकारचे सामने खेळले जातात. या चार दिवसात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैदानावर असतात. आमच्या शाळेच्या मैदानाचे नाव “रवींद्र म्हात्रे क्रीडांगण” आहे. सकाळी सातला सुरु झालेले सामने संध्याकाळी सहाला संपतात.
शाळेतील सर्व विद्यार्थी चार गटामध्ये विभागले जातात. स्पर्धेमध्ये धावणे, थाळी फेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी तसेच कबड्डी, खोखो आणि लंगडी या खेळांचा समावेश असतो. लहान मुलांना लिंबू-चमचा अशा सारखे खेळ असतात. लहान मुलींना लंगडी, सुईदोरा, लिंबू चमचा अशा स्पर्धा असतात.
खेळताना कितीतरी मुले पडतात, आपटतात त्यातून त्यांना खरचटते, ओरखडे पडतात पण सर्वजण त्यांना मदत करतात. कुणी भांडणं करत नाहीत. पंचांनी ज्या खेळाडूला बाद म्हणून शिटी वाजवली किंवा बाद संघाला पराजित म्हणून घोषित केले तरी कुणी रडत किंवा चिडत नाही. सर्वजण खेळांचा आनंद घेत असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. असे मानून पुढच्यावर्षी एकमेकांना जिंकण्याची हमी देतात.
खेलमहोत्सवाचे चार दिवस कुणी ही अभ्यास करत नाही. सर्वजण खेळाचा सराव करत असतात चार दिवसांनंतर पुढच्या वर्षीच्या सामन्यांची वाट पाहतात. सर्वजण खूप हर्षाने खेळाचा अनुभव व आनंद घेतात.
हे नक्की वाचा :
- ५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध
- माझा आवडता खेळ मराठी निबंध
- माझ्या शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध
- माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध
- आमच्या शाळेचे ग्रंथालय मराठी निबंध
तुम्हाला हा शालेय क्रीडा महोत्सव मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
1 thought on “{Essay} शालेय क्रीडा महोत्सव मराठी निबंध | Annual sports day essay in Marathi”