Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

[ESSAY] दूरदर्शनाचे फायदे-तोटे मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे
१) हस्ताक्षर सुंदर असावे
२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट
३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.
४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

मित्रानो कोणत्याही वैज्ञानिक शोधाचा फायदा असेल तर त्याचा तोटा हा नक्कीच असतो. दूरदर्शन  ही आपल्याला सर्वांना लहानपणासूनची परिचित वस्तू आहे. याला आपण बहुतेकदा TV म्हणतो. TV म्हणजे TELE-VISION...! आपण आपल्या दिवसातील बराच वेळ त्याला बघण्यात खर्च करतो. आपले त्यातून खूप मनोरंजन होते.
पण यामुळे आपला खूप सारा वेळ पण वाया जातो. ज्या वयात आपण बाहेर मैदानी खेळ खेळले पाहिजेत त्या वयात आपण फक्त घरात बसून TV बघत बसतो. यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. 
चला तर मित्रांनो आज आपण दूरदर्शनचे फायदे-तोटे बघुयात.


दूरदर्शनाचे फायदे-तोटे  मराठी निबंध 

दूरदर्शन मराठी निबंध

निबंध क्रमांक १

दूरदर्शन

दूरदर्शनचा आविष्कार म्हणजे जगातील एक महत्त्वाचा आविष्कार आहे. पूर्वी आपण रेडिओवरुन फक्त ऐकू शकत होतो. दूरदर्शनवरुन प्रत्यक्ष पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. हजारो किलोमीटर वर चालू असलेले हॉकी, क्रिकेटचे सामने आपण घरात बसून प्रत्यक्ष बघतो, सुरुवातीला दूरदर्शन वरील कार्यक्रम काळ्या-पांढऱ्या रंगातच दिसत असत. नंतर रंगीत दूरदर्शनचा शोध लागला. आपणाला हवा तो कार्यक्रम कुठल्याही चॅनेलवरुन आपण पाहू शकतो. यामुळे आपले अंगचे गुण दाखविण्याची संधीही कलाकारांना मिळते. हजारो कलाकरांना तसेच तंत्रज्ञानांना दूरदर्शनमुळे रोजगार प्राप्त झाला आहे. भारतामध्ये दूरदर्शनची सुरुवात १९७५ मध्ये झाली.

दूरदर्शनमुळे लोकांचे मनोरंजन तर होतेच पण कोणत्याही विषयावरील उपयुक्त अशी माहितीही मिळते. रोज दिवसभर चालणा-या मालिकांमुळे रिकाम टेकड्यांना वेळ घालविण्याचे उत्तम साधन मिळाले आहे. खेळाडू, शास्त्रज्ञ, डॉक्टर, निरनिराळया व्यवसायातील उद्योगपती, कलाकार यांच्या मुलाखती दाखविल्या जातात. ते पाहून नव्या पिढीतील तरुणांना मार्गदर्शन मिळते. भौगोलिक, वनस्पती विषयींची, प्राणीजगताची विशेष माहिती मिळते. शेतकरी बांधवांना "कृषीदर्शन" या कार्यक्रमातून आधुनिक शेती, प्रगत बी-बियाणे, खते, जमिनीचा पोत आणि मशागत इत्यादी विषयी खूपच उपयुक्त माहिती मिळते. नुकताच मंगळयानाचा प्रवास दूरदर्शनवरुन दाखवण्यात आला आणि भारताच्या आंतरीक्ष संशोधनाची झलक साऱ्या जगाला दिसली.

योग्य वेळेला त्याचा उपयोग करुन घेतला तर दूरदर्शन आपणा सर्वांसाठी वरदानच आहे. परंतु दूरदर्शन पाहण्याचा अतिरेक झाला तर ते शापही ठरु शकते. मनोरंजन व ज्ञान मिळविण्याकरिता दूरदर्शनपुढे बसले तर फायदाच होतो पण त्याच्या आहारी जाऊन आपला अभ्यास, आपले नियमित काम सोडले तर नुकसानच होते. म्हणूनच दुरदर्शनला कधीकधी मुलांना बिघडवणारा 'इडियट बॉक्स' असे संबोधले जाते.


निबंध क्रमांक २

दूरदर्शनाचे फायदे-तोटे

  • विज्ञानाची अनोखी भेट 
  • फायदा
  • तोटे 
  • उपसंहार
हे विज्ञानाचे युग आहे. या युगात विज्ञानाच्या अद्भुत शोधांनी लोकांचे जीवन 
पूर्णपणे बदलले आहे. दूरदर्शन हा विज्ञानाचा प्रभावी आविष्कार आहे.
दूरदर्शनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे थेट प्रक्षेपण, त्यावर दाखवली जाणारी चलचित्रे.
तो आपल्याला जगात घडणाऱ्या घटना व बातम्यांचा फक्त समाचारच देत नाही तर तो आपल्याला तेथील संपूर्ण दृश्य देखील दाखवतो. प्रत्येक घटनेशी संबंधित व्यक्तीही दाखवतो. त्यामुळे दुर्दर्शनावर आलेले समाचार अधिक विश्वसनीय असतात.

क्रिकेट, फुटबॉल, टेनिस इत्यादी खेळांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने, यांसारखे
दूरदर्शनावरील चांगले कार्यक्रम पाहून खूप आनंद होतो. तसेच दूरदर्शनावर चित्रपट
देखील दाखवले जातात.

दूरदर्शनवर दाखवले जाणारे धार्मिक कार्यक्रम मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनाचे देखील कार्य करतात . दूरदर्शनच्या जाहिरातींमुळे लोक नवीन उत्पादनांसाठी बाजारात आलेल्या वस्तूंशी
परिचित होतात. यामुळे मालाची विक्री वाढते. दूरदर्शनच्या कार्यक्रमांमध्ये देशाचे
प्रतिभावान कलाकार काम करतात. यामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
अनेक फायद्यांसह, दूरदर्शनमुळे काही तोटे देखील आहेत.

दूरदर्शन पाहणे हा वेळेचा अपव्यय आहे. यामुळे मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. 
गृहपाठाकडे दुर्लक्ष करून ते दूरदर्शन बघायला बसतात. खूप उशिरापर्यंत दूरदर्शन बघितल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. दूरदर्शनमुळे सुट्टीच्या दिवसांत
एकमेकांच्या घरी जाणे आणि भेटणे कमी झाले आहे. यामुळे आपल्या सामाजिक संबंधावर परिणाम हॉ. दूरदर्शनच्या काही कार्यक्रमांचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतो
हे सर्व असूनही, दूरदर्शन हा आधुनिक जीवनाचा एक आवश्यक भाग आहे.
त्याचा विवेकपूर्ण वापर केल्यासच फायदा होईल.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा