[UPDATED] जीवन मराठी निबंध Marathi essay on life

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

जीवन

Marathi essay on life

जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे पुढे-पुढे चालावे

जीवन कधी पेटता निखारा, तर कधी सोसाट्याचा वारा, कधी गवताचा भारा, कधी समुद्राचा किनारा, कधी जीवनाचा पिसारा तर कधी मृत्युचा पिंजरा. काय असतं जगणं. जगण्यासाठी धावायचे की धावण्यासाठी जगायचे. हे एक न समजलेले रहस्य आहे. अथक परिश्रमाच्या शिदोरीवरच हे जीवन आधारले असून माणूस त्याचा आस्वाद घेत असतो. प्रत्येक माणूस जीवन जगत असतो पण प्रत्येकाच्या जीवनाबद्दलच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. त्याप्रमाणे तो आपले जीवन फुलवत असतो.

प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या कला, कल्पना वेगवेगळ्या असतात. जीवन जगण्याची कला आत्मसात करणे फार कठीण आहे. कारण जीवनात फार अडचणी, संकटे येत असतात. जीवनात आलेल्या संकटांच्या सागरातील लाटांवर मात करून जो काठावर पोहोचला तो यातून सुटला म्हणायचा. अन्यथा संकटांना घाबरून जो पाठीमागे परतण्याचा प्रयत्न करतो तो गटांगळ्या खाऊन तळाला गेल्याशिवाय रहात नाही. परंतु जो मेहनतीने स्वबळावर सुखी जीवन जगतो, तोच जीवनाचा खराखुरा आनंद लुटत असतो. त्यालाच जीवनाचा खरा अर्थ समजलेला असतो. जीवन सर्वस्वाने जगण्याची कला म्हणजे सुख. प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची पद्धत निरनिराळी असते. कोणी हसतमुख, तर कोणी रडत तर कोणी गंभीर, कोणी छंदी तर कोणी जीवन म्हणजे देवाची देणगी समजून जगत असतो.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment