[ESSAY] माझा आवडता पाळीव प्राणी – मराठी निबंध

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे-

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

प्रत्येकाने जीवनात कधीतरी एखादा प्राणी पाळलेला असतोच. त्या प्राण्याचा आपल्याला आपोआपच लळा लागतो.
प्राण्यांना जरी बोलता येत नसलं तरी त्यांना भावना असतात. त्यांना जेव्हा आपण घरात घेतो तेव्हा ते आपले घरातील एक सदस्यच बनून जातात.
 खाली आम्ही तुमच्यासाठी ‘MAZA AVADATA PALIV PRANI’ या विषयावर दोन निबंध दिले आहेत. ते तुम्ही नक्की वाचा व आवडल्यास आम्हाला नक्की कळवा.

निबंध क्र. १

माझा आवडता प्राणी कुत्रा 

माझा आवडता पाळीव प्राणी - कुत्रा मराठी निबंध

आपल्या जीवसृष्टित नाना प्रकारचे पाळीव आणि वन्य पशू आहेत ते थोड्याफार फरकाने आपणास निरनिराळ्या प्रकारे उपयुक्तही आहेत. माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा आहे. कुत्रा हा फक्त उपयोगीच प्राणी नसून इमानदार देखील आहे. माझी ही आवड पाहून माझ्या आजीने मला एक चॉकलेटी पांढऱ्या ठिपक्यांचा आणि घाऱ्या डोळ्यांचा एक कुत्रा माझ्या वाढदिवशी भेट दिला. ते गुबगुबीत, गोल डोळ्यांचे व मोत्यासारखे पांढरेशुभ्र केस असणारे पिल्लू आहे. म्हणून मी त्याचे नाव ‘मोत्या’ असे ठेवले. त्याला चार पाय, दोन टवकारलेले कान आणि लांब, झुपकेदार शेपूट आहे. त्याला वासावरुन कोणतीही वस्तू किंवा माणूस अचूक ओळखता येतो.

मी रोज सकाळी मोत्याला चौपाटीवर फेरफटका मारण्यास नेतो. फिरुन आल्यावर दोघेही दूध चपातीचा नाश्ता करतो. मोती वरणभातही खातो. पण त्याचा आवडता आहार आहे मांस. मांसाहार दिला की तो विशेष खूष होतो. शेपटी हलवत हाडे चघळत बसतो. कुत्रा मुळातच इमानदार प्राणी आहे. त्याचे आपल्या मालकावर खूप प्रेम असते. मोत्याचेही माझ्यावर खूप प्रेम आहे.

त्याच्या डोक्यावरून जरा प्रेमाने हात फिरवला की तो माझे अंग चाटू लागतो. एखादा मित्र माझ्याशी लुटूपुटूचे जरी भांडण करताना दिसला तर हा भुंकून त्याच्या अंगावर धावून जातो. त्याची समजूत काढताना मला नाकी नऊ येते. मी घरात दिसलो नाही की तो कावरा बावरा होऊन सारे घर, अंगण पालथे घालतो व मी दिसताच लाडाने आपले अंग माझ्या अंगाला घुसळतो. आम्हा दोघांची जोडी किती अतूट आहे ते रोज रात्री आईला अनुभवायला मिळते. रात्री माझ्या पायाशी झोपायची त्याला सवय आहे. जरा माझी जागा बदलली किंवा त्याला हलवायचा प्रयत्न झाला तर भुंकून बंड करतो. त्यामुळे आम्हां दोघांना वेगळे करण्याचे कुणी धाडस करत नाही.

मोत्या दिवसा झोप काढतो पण आम्ही झोपल्यावर आमच्या घराची, बागेची राखण करता. जरासे कुठे खुट्ट झाले की लगेच जागा होतो. कान टवकारुन भुंकु लागतो. अनोळखी माणसाची तरी मोत्यापुढे मुळीच डाळ शिजत नाही. तिथे भुरट्या चोरांची काय कथा!

संध्याकाळी मात्र मी शाळेतून घरी येण्याची तो वाटच पाहत असतो. मी आल्याबरोबर तोंडात चेंडू घेऊन मला खेळायला नेण्यासाठी सूचित करतो. आम्ही दोघे मैदानावर खेळायला गेलो की सतत माझ्या अवतीभवती असतो. माझ्या खेळाच्या साहित्यावर लक्ष ठेवतो. इतस्ततः पसरलेले चेंडू आणून देतो.

मी रात्री अभ्यासाला बसल्यावर मात्र निमूटपणे माझ्या शेजारी बसतो आणि आपले डोळे किलकिले करुन माझ्याकडे बघत राहतो. माझ्याशिवाय त्याला आणि त्याच्याशिवाय मला बिलकूल करमत नाही. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना तो बरोबर ओळखतो. ते माझ्या घरी आले की हळुच भुंकून त्यांचे स्वागत करतो. माझे कपडे खेचून दरवाजापर्यंत घेऊन जातो. जणूकाही माझे मित्र त्याच्याकडेच आले आहेत. आम्ही दरवर्षी मोत्याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करतो. वाढदिवसाचा केक सुद्धा कापतो.

आमच्या शेजारच्या राणे काकांना मात्र आमच्या मोत्याचा खूप राग येतो. ते आले की तो लगेच वर्तमानपत्र तोंडात धरून त्यांना आणून देतो. तरीही ते त्याचा खूप राग-राग करतात. परंतु गेल्याच महिन्यात एका नवीन खरेदीसाठी त्यंनी काही रक्कम बँकेतुन काढून आणून घरात ठेवली नि कसा कोण जाणे चोरांना या गोष्टीचा सुगावा लागला. चोरांनी रात्री गुपचूप घर फोडण्याचा प्रयत्न केला. शेजारधर्म या नात्याने मोत्याला राणे काकांच्या नातेवाईकांचीही ओळख होती. रात्री लुटारु हत्यारे घेऊन आवारात शिरताच मोत्याने भुंकून भुंकून सर्व परिसर दणाणून सोडला. आम्हाला त्याच्या भुंकण्याची व कारणाची थोड़ी चाहूल लागताच आम्ही पोलिसांना फोन केला आणि चोरांची रंगेहाथ उचलबांगडी झाली. तेव्हापासून मोत्या राणे काकांचाच नव्हे तर सगळ्या शेजाऱ्यांचाच मित्र झालाय.

पोलिसांनी त्याचा सत्कार करुन एक विशेष बिल्ला बक्षीस म्हणून त्याच्या गळ्यात घातला. तेव्हापासून आमचा हिरो बिल्ला लटकवून अभिमानाने सगळीकडे मिरवत असतो. असा हा गुणी मोत्या मला मित्राहूनही जवळचा वाटतो.


निबंध क्र. २

माझा आवडता प्राणी घोडा 

माझा आवडता प्राणी - घोडा

  • प्रिय प्राण्याचा उल्लेख
  • विलक्षण पशू
  • मजबूत आणि शूर
  • कल्पक
  • उपयुक्तता
  • उपसंहार

जगात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. पण घोडा हा सगळ्या प्राण्यांमध्ये माझा आवडता प्राणी आहे.

घोडा एक अद्भुत प्राणी आहे. त्याची चपळता फक्त आश्चर्यकारक आहे. जणू त्याचे पाय निर्मात्याने धावण्यासाठी बनवले आहेत. असे म्हटले जाते की जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून उच्चैःश्रवा नावाचा एक सुंदर घोडा निघाला. सूर्य देवाचा रथ सात घोड्यांनी ओढला जातो.

घोडा हा शाकाहारी प्राणी आहे. गवत, हरभरा आणि गूळ हे घोड्याचे आवडते खाद्य आहे. घोडा खूप बलवान आणि शूर आहे. जुन्या काळी योद्धे घोड्यावर बसून युद्धाला जात असत. घोडेही रणांगणात आपले शौर्य दाखवायचे.

घोडा एक स्वामीभक्त प्राणी आहे. तो त्याच्या मालकावर खूप प्रेम करतो. तो आपल्या मालकाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देखील देतो. महाराणा प्रतापचा घोडा चेतक ची निष्ठा कोणाला माहीत नाही असे नाही? नेपोलियन आणि अलेक्झांडरचे घोडेही त्यांच्या निष्ठेसाठी प्रसिद्ध आहेत.

आज सायकली, मोटर्स, स्कूटर, बस, रेल आणि विमाने अशी वाहतुकीची साधने आहेत, परंतु हजारो वर्षांपासून घोडा हे माणसाचे आवडते वाहन आहे. साध्या स्वारीपासून ते रणांगणापर्यंत घोड्याने माणसाला साथ दिली आहे. आजही घोडा घोडागाडी तसेच टांग्यांना जुंपला जातो. पोलो सारखे शाही खेळ घोड्यावर बसून खेळले जातात. सर्कसमधील घोड्याचे विविध पराक्रम पाहून लोक थक्क होतात. आजच्या युगात, घोडदौड हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर एक चांगला व्यवसाय देखील आहे.

असा उपयुक्त, भव्य आणि निष्ठावान घोडा माझा आवडता प्राणी का नसावा?

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment