[UPDATED] आपला राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

मोर

आपला राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध

मोर म्हणजेच मयूर. मयूर म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो सुंदर डौलदार पिसारा फुलवून वन विभागात थुईथुई नाचणारा पक्षी. मोर सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. शेतात आणि वन विभागात त्याचे वास्तव्य जास्त प्रमाणात असते. तो खूप उंच उडू शकत नाही. त्याच्या पाठीवर असणारा हिरव्या निळ्या पिसांचा फुलोरा विशेष खुलून दिसतो. तसाच झुपकेदार तुरा त्याच्या डोक्यावर शोभून दिसतो. मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. लांडोर मात्र मोरापेक्षा लहान असते. तिला रंगीबेरंगी पिसांचा फुलोरा नसल्याने ती मोराप्रमाणे सुंदर दिसत नाही. मोर जमिनीवरील धान्य, अळ्या किंवा शेतातील धान्य खातो. तो म्याओऽऽS असा टाहो फोडतो. मोर पावसाळ्यात विशेष आनंदी असतात. आकाशात काळ्या मेघांनी दाटी केली आणि ढगांचा गडगडाट सुरु झाला की मयूर नृत्य करु लागतो तीच पावसाची चाहूल असते. पाऊस पडू लागताच मयूर आनंदाने आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो तेव्हा त्याचे सौंदर्य मनमोहक असते.

साप मोराचा शत्रू आहे. साप दिसताच तो त्याला पकडण्यासाठी धावू लागतो. मोराचे पाय त्याच्या सौंदर्याला साजेसे नसतात. मोराची अंडीदेखील आकाराने मोठी असतात.

मोर जास्त उंच उडू शकत नसल्याने थोड्या उंचीपर्यंत उडतो व झाडावर जाऊन बसू शकतो. मोर माणसाच्या अवतीभवती देखील फिरतो. त्यामुळे तो लगेच माणसाळतो. मोराची पिसे काही मुले छंद म्हणून आपल्या वहीत जपून ठेवतात. एकमेकांशी मैत्रीचे प्रतिक म्हणूनही मोराच्या पिसाचे आदानप्रदान होते. मोरपिसांचा पंखा बनवून पूर्वीच्या काळी राण्यांना विजन वारा घालण्यासाठी दासी वापरत असत. आजही मोराच्या पिसांच्या कितीतरी वस्तू बनवून घराची शोभा वाढवितात.

मोराला पाहताच सर्वांनाच आनंद होतो. मला मोर हा पक्षी खूपच आवडतो. आपल्या विद्यादेवी शारदेचे वाहन म्हणूनही मोराचा उल्लेख होतो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment