{Essay} माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My favourite bird Parrot

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत माझा आवडता पक्षी पोपट या विषयावर मराठी निबंध

माझा आवडता पक्षी पोपट । My favourite bird Parrot । माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध । Maza avadta pakshi popat marathi nibandh या विषयावर तुम्ही हा निबंध वापरू शकता

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध

आपल्या सभोवती अनेक पशुपक्षी असतात. त्यांचे नानाविध रंग, आकार आणि त्यांचे आवाज सुद्धा भिन्न भिन्न असतात. आवाजावरुन पशुपक्षी ओळखता येतात.

पोपट हा पक्षी त्याच्या रंग आणि बोलीबद्दल विशेष नजरेत भरतो. त्याला राघू, रावा, कीर अशा नावांनी ओळखतात तर काहीजण त्याला मिठूमियाँ संबोधतात. पोपटाच्या पोपटी रंगावरुन त्याला पोपट म्हणतात. परदेशात रंगीत पोपट, त्यांच्या डोक्यावर तुरा असलेले आढळतात.

पोपटाचा रंग पोपटी असतो पण बाकदार चोच तसेच मानेचा पट्टा लालभडक असतो. तो गावात किंवा रानावनात आढळतो. झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीच्या खबदाडात तो राहतो. दिवसा मात्र तो फळझाडावर असतो. त्याला हिरवी मिरची, डाळ व पेरु किंवा डाळिंबाचे दाणे आवडतात. पोपट विठू-विठू बोलतो. त्यामुळेच काही लोक त्याला पकडून पिंजऱ्यात ठेवतात. आपण बोललेले बोलणे पोपट जसेच्या तसे बोलतो. काही जण मनोरंजनासाठी पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात.

पोपट थव्यांबरोबरच राहतो. लहान मुलांना तो खूप आवडतो. परंतु तो आकाशात स्वच्छंदी उडतो नि झाडावरच अधिक रमतो.

‘पोपटा पोपटा बोलतोस गोड पण झालास रोड, खा ना पेरुची फोड’ असे म्हणून आपण त्याला पेरु देतो पण पोपट मात्र म्हणत असतो,

“भाऊ, भाऊ दार उघड नि मला सोड”

वनात जाईन डहाळी वर बसुन झोके घेईन.पिंजऱ्यापेक्षा पोपट मोकळ्या वातावरणातच जास्त रमतो. म्हणून पोपटाला आपल्या आनंदासाठी पिंजऱ्यात कोंडून न ठेवता निसर्गातच रमू द्या, मुक्तपणे विहार करु द्या.

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

1 thought on “{Essay} माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My favourite bird Parrot”

Leave a Comment