नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही मराठी (देवनागरी) अंकांन्ना लक्षात ठेऊन विस्तारपणे विविध विषयांवर लिहले आहे ज्याने करून संख्या व अक्षरी संख्या समजण्यास व वाचण्यास सोयीस्कर व्हावे.
Table of Contents
(अंकचिन्ह) संख्यांचा इतिहास:
सध्या जगभरात प्रचलित असलेले संख्या चिन्ह 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पूर्वी जगभरात वापरात न्हवते, समान्यपणे त्यांच्या जागेवर विविध चिन्हांचा वापर केला जायचा जे वापरण्यात बऱ्याच अडचणी यायच्या.
१४ व्या शतकानंतर हिंदू–अरबी अंक प्रणाली पूर्ण जगभरात पसरली आणि ती आजही संपूर्ण जगात वापरात आहे.
ही प्रणाली उत्कृष्ट ठरली याचे सर्वात मोठे श्रेय जाते शुन्याला (०) जे की भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त ज्यांनी सर्वप्रथम शुन्याला जगापुढ आणले होते.
या संख्या १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ० अशा होत्या ज्यांच्या एकत्रित वापरने मोठ्या आकडेवारी देखील मांडने सोपे झाले.
अंकचिन्ह:
देवनागरी अंकचिन्हे-
हिंदू–अरबी अंकचिन्हे-
संख्या प्रणाली
संख्या प्रणाली व अंक चिन्ह
संख्या प्रणाली | अंक चिन्ह |
---|---|
द्विमान | 0 आणि 1 |
त्रिमान | 0, 1 आणि 2 |
चर्तुमान | 0, 1, 2, आणि 3 |
पंचमान | 0, 1, 2, 3, आणि 4 |
अष्टचिन्ह पद्धत | 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 |
दशमान पद्धत | 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 |
षोडश चिन्ह पद्धत | 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,A, B, C, D, E आणि F |
मराठी (देवनागरी) दशमान पद्धतिनुसार १० च्या पटीतील आकडे व संबंधित शाब्दिक आकडे.
आकडे | शाब्दिक आकडे |
---|---|
१ | एक |
१० | दहा |
१००० | एक हजार |
१०,००० | दहा हजार |
१०,००,०० | एक लाख |
१०,००,००० | दहा लाख |
१०,०००,००० | एक कोटी |
१००,०००,००० | दहा कोटी |
१,०००,०००,००० | एक अब्ज |
१०,०००,०००,००० | खर्व किंवा दश अब्ज |
१००,०००,०००,००० | निखर्व |
१,०००,०००,०००,००० | पद्म |
१०,०००,०००,०००,००० | शंकु किंवा नील |
१००,०००,०००,०००,००० | जलधी किंवा दशनील |
१,०००,०००,०००,०००,००० | अंत्य |
१०,०००,०००,०००,०००,००० | मध्य |
इंग्लिश प्रणालीत १० च्या पटीतील संख्यांना थाऊजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत, तसेच मराठी मध्ये देखील या प्रणाली आहेत:
एकक,
दशक,
शतक,
हजार,
दशहजार,
लक्ष,
दशलक्ष,
कोटी,
दशकोटी,
अब्ज,
दश अब्ज.
संख्या वाचन
दशमान संख्या पद्धती मध्ये संख्या वाचनाला अंकांच्या स्थानाला किम्मत असते.
कोणत्याही एका संख्येला दोन प्रकारच्या कीमती असतात दर्शनी किम्मत व स्थानिक किम्मत.
संख्या वाचनासाठी जे उपसर्ग उपयोगात आणले जातात. त्यांना दशगुणोत्तरी संज्ञा असे म्हणतात.
संदर्भ :
मराठी विश्वकोश खंड क्र. १, पृष्ठ क्र. १ ते ९.
विकिपीडिया
Marathivishwakosh
ganitsambodh.blogspot.com
S. Patwardhan; S. A. Naimpally; S. Singh, Līlāvatī of Bhāskarācārya: A Treatise of Mathematics of Vedic Tradition …, Motilal Banarsidass Publishers, Delhi 2001.