Table of Contents
पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती मराठी मध्ये (Pandit Jawaharlal Nehru information in Marathi)
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये तुमचं स्वागत आहे. आशा या लेखामध्ये आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामध्ये आपण त्यांच्या बालपणाबद्दल शिक्षणाबद्दल त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तसेच पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती बघणार आहोत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी थोडक्यात ओळख ( Introduction of Pandit Jawaharlal Nehru):
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 1989 झाली भारतातील अलाहाबाद येथे झाला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या चळवळीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पंडित जवाहरलाल नेहरू हे महात्मा गांधींचे निकटचे सहकारी होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून 1947 साली त्यांचे पद स्वीकारले. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी 1964 पर्यंत काम केले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे नेतृत्व आधुनिक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीच्या मार्गाने केले त्यांनी पंतप्रधानपदी असताना भारतातील सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी विविध धोरणे राबवली. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा भारतीय राजकारणावर प्रभाव आणि धर्मनिरपेक्षतेबद्दलची त्यांची बांधणी की यांचा देशावर कायमचा प्रभाव राहिलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हृदय विकाराच्या झटक्याने 27 मे 1964 रोजी दुखद निधन झाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे बालपण (Childhood of Pandit Jawaharlal Nehru):
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म भारतातील अलाहाबाद शहरांमध्ये 14 नोव्हेंबर 1989 रोजी एका श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असून ते एक प्रख्यात वकील होते, तसेच त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी नेहरू असे होते त्या एक धर्मनिष्ठ महिला होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू हे एका विशेष अधिकाराच्या वातावरणात वाढले तसेच त्यांना दर्जेदार शिक्षण देखील मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचा राष्ट्रवादी श्रद्धेचा प्रभाव त्यांच्यावर देखील होता आणि लहानपणापासूनच त्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेचा परिचय झालेला होता. त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीला त्यांचे बालपणाचे अनुभव आणि घरातील राजकीय चर्चांची खूप मदत मिळाली. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण (Education of Pandit Jawaharlal Nehru):
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या घरी असतानाच खाजगी शिक्षकांकडून झाले. पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडमध्ये गेले त्यांनी हेरो स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतरच्या पुढील शिक्षणासाठी केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पंडित जवाहरलाल नेहरू हे एक हुशार विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये प्राविण्य मिळवलेले होते. त्यांच्या इंग्लंड मधील शिक्षणामुळे पाश्चात्त्य कल्पना आणि तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांना झाला. ज्या कारणी त्याचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि राजकीय विचारसरणीवर पडला.
भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांची भूमिका (Role in Indian independence):
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ते महात्मा गांधीजींचे जवळचे सहकारी होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतावर असलेल्या ब्रिटिश वसाहत वादापासून स्वातंत्र्यासाठी अथक परिश्रम घेतले. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सॉल्ट मार्च सह विविध सविनय कायदेभंगाच्या चळवळी आणि निषेधाम मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना अनेक वेळी तुरुंगवास भोगावा लागला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी भारताचे भविष्य घडविण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून आणि आधुनिक लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने त्यांनी काम केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आणि त्यांची बांधिलकी आजही साजरी केली जाते आणि त्यांचे स्मरण देखील केले जाते.
भारताच्या पंतप्रधानपदी निवड (Selection of India’s first Prime minister):
भारताला ब्रिटिश राजवटी पासून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा त्या वेळेचा एक प्रमुख राजकीय पक्ष होता. ज्याने पंतप्रधान पदासाठी निवड प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसमधील प्रमुख नेते आणि महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय असल्याने भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदासाठी लोकप्रिय पर्याय म्हणून ओळखीस आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचा निर्णय लोकशाही प्रक्रियेतून काँग्रेस पक्षांतर्गत घेण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निवडीला त्यांची दूरदृष्टी लोकशाही तत्त्वांपप्रती बांधिलकी आणि नेतृत्व गुण हे घटक कारणीभूत ठरले आणि त्यांची भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी निवड झाली व त्यांनी एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून देशाच्या सुरुवातीच्या काळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतप्रधान म्हणून केलेले काम (Services as Prime minister):
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.
पंचवार्षिक योजना: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी पंचवार्षिक योजनांची मालिका सुरू करण्याचा उपक्रम राबवला. या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश कृषी उद्योग पायाभूत सुविधा आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांना संबोधित करून सर्व नागरिकांचे जीवन सुधारण्याचा होता.
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग: सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या स्थापनेवर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भर दिला. त्यांनी या कामासाठी स्टील प्लांट पावर प्लांट आणि जड यंत्रसामग्री निर्मिती युनिट स्थापित करण्याचे उपक्रम राबवले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा या कामांमध्ये भारताच्या औद्योगिक विकासाचा पाया रचून स्वयंपूर्णता आणि औद्योगीकरण तसेच आर्थिक विकासाला चालना देण्याचा दृष्टिकोन होता.
परराष्ट्र धोरणात नॉन अलाइनमेंट: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेल्या या निर्णयाचे पालन भारत आजही करत आहे. या अलाइनमेंटच्या धोरणाचा नेहरूंनी पुरस्कार केला. या धोरणाचा अर्थ असा होता की शीतयुद्धाच्या काळामध्ये भारत कोणत्याही मोठ्या शक्ती गटाशी सरेखित होणार नाही किंवा एक बाजूने उभा राहणार नाही. या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे भारताला त्याचे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी मदत मिळाली. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध घडामोडींमध्ये देखील स्वतःचे हित जोपासता आले.
भारत चीन युद्ध: भारत चीनचे 1962 मध्ये झालेल्या युद्धा च्या आव्हानाचा सामना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला त्यावेळी संघर्ष आणि त्याचे परिणाम चांगले नसण्याची चिंता असूनही त्यांनी शांतता आणि स्थिरता राखण्याच्या दिशेने प्रयत्न केले. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशासाठी ही खूप प्रशंसनीय होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या बळकटीकरण तसेच संरक्षण क्षमतांचे पुनर्बांधणी करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित केले.
लोकशाही मूल्य आणि राष्ट्र निर्माण: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या पंतप्रधान म्हणून संपूर्ण कार्य काळामध्ये लोकशाही मूल्य तसेच धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समानतेवर भर दिला होता. त्यांच्या कार्यामुळे भारताला आधुनिक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आकार देण्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यात तसेच जमीन सुधारणा आणि सामाजिक न्यायाला चालना देण्यासारख्या राष्ट्र निर्मितीच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करता आले, ज्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
निष्कर्ष (Conclusion):
मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू इन्फॉर्मेशन इन मराठी या विषयावर सविस्तरपणे माहिती बघितली. ज्यामध्ये आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांच्याशी ओळख करता आली, आपण या लेखामध्ये त्यांच्या बालपणाविषयी तसेच त्यांच्या शिक्षणाविषयी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या योगदान बद्दल, तसेच त्यांनी पंतप्रधान म्हणून केलेल्या विविध कार्याविषयी, आपण महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेतला. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि या लेखांमधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनामधून काही शिकायला मिळाले असेल, हा लेख तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि परिवारातील सर्व सदस्यांसोबत नक्की शेअर करा. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद!
FAQs
1. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कुणाची निवड झाली होती?
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती.
2. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून किती वर्ष काम केले?
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947 पासून ते 1964 मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले.
3. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आर्थिक विकासासाठी कोणती योजना लागू केल्या?
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना लागू केल्या.
4. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाचे कारण काय होते?
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाचे कारण हृदय विकार होते.