भगत सिंग यांची मराठी माहिती | Bhagat Singh information in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये तुमचे स्वागत आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे शहीद भगतसिंह यांच्या बद्दल ची माहिती, जसं की त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे गेले, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचे योगदान दिले, ब्रिटीश सरकारने त्यांना दहशतवादी म्हणून घोषित करून फाशी ची शिक्षा का दिली याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत. मित्रांनो भगत सिंग हे भारतातील अनेक क्रांतिकारी संघटनेमध्ये सहभागी झालेले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे व्यक्तीमत्व होते. त्यांनी दिलेले आपल्या देशासाठी दिलेले बलिदान भारतातील एकही नागरिक विसरू शकत नाही. भगत सिंग हे भारतातील प्रत्येक जवानाचे प्रेरणा स्थान आहे. चला तर मग बघुया भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे क्रांतिकारक भगत सिंग याच्याबद्दल संपूर्ण माहिती.

भगत सिंग यांचा इतिहास(Bhagat Singh history):

भगत सिंग यांचं पूर्ण नाव भगत किशन सिंग असून त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाब मधील गाव बंगा, तहसील जरनवाला, जिल्हा लायलपूर येथे झाला. पंजाब चे हे ठिकाण आता पाकिस्तान मध्ये येते.त्यांच्या आईचे नाव विद्यावती सिंग तर वडिलांचे नाव किशन सिंग होते. भगत सिंग यांच्या कुटंबामध्ये त्यांचे वडील आणि काका अजित सिंग हे मोठे देश भक्त होते. घरामध्ये देशप्रेम असल्याने त्यांच्या मनावर देशप्रेमाची भावना उमटलेली होती. भगत सिंग यांना प्रामाणिकपणा, सौजन्य आणि नैतिकतेचे धडे लहानपणापासूनच मिळायला चालू झालेले होते. भगत सिंग यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना गावातीलच प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन दिला. भगत सिंग यांच पुढील शिक्षण लाहोर मधील नॅशनल कॉलेज मध्ये झाले. त्यांचे शिक्षण चालू असतानाच नवजवान भारत सभेची स्थापना करण्यासाठी त्यांनी शिक्षण सोडले. जेव्हा हा हत्यकांड घडला तेव्हा भगत सिंग घे केलव १२ वर्ष वयाचे होते.

जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala bagh Massacre):

मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाबद्दल विचारलं तर प्रत्येक भारतीयाला त्याबद्दल माहित असेल. जालियनवाला बाग येथे गुरू गोविंद सिंग यांनी मोठ्या सभेचे आयोजन केलेले होते, जिथे तेथील लोक जमायचे आणि गुरू गोविंद सिंग त्यांना प्रोत्साहन द्यायचे, इंग्रजांविरुद्ध लढा घेण्यासाठी लोकांना मरण्या आणि मारण्यासाठी तयार करायचे. अशीच सभा घेत असताना एके दिवशी जनरल डायर

त्यांच्या सैन्य तुकडी सोबत जालियनवाला बाग मध्ये पोहचले. अस अनुमान आहे की त्या दिवशी सभेमध्ये ७००० हून अधिक पुरुष, स्त्रिया आणि तरुण मुले पण होती. गुरू गोविंद सिंग यांची ती सभा सुरू असतानाच जनरल डायर ने त्यांच्या सैन्य तुकडीला फायरींग चा आदेश दिला, जनरल डायर चा आदेश मिळताच त्याच्या सैन्य तुकडीने तेथील सभेला उपस्थीत असलेल्या लोकांवर दागलेली प्रत्येक बंदूक फक्त गोळ्या झाडत होती. त्या आदेशा नंतरच्या काही क्षणातच त्या ठिकाणी रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. अधिकृतपणे तर तेथील मृत्यू ची संख्या ही ४०० पेक्षा कमी होती, पण ही संख्या कमी असून अनधिकृतपणे मृतांची संख्या ही १८०० हून अधिक आहे अस म्हंटले जाते. या हत्याकांड प्रकरणानंतर जनरल डायर ला खूप सुनावण्यात आले, पण या प्रकरणाने भारतीयांच्या मनात एक छाप उमटवली.

भगत सिंग यांचा स्वातंत्र्य लढा (Freedom fighter Bhagat Singh):

भगत सिंग हे बालवयातच जालियनवाला बाग या प्रकरणाने प्रभावित झाले. या हत्याकांड प्रकरणानंतर भगत सिंग यांनी रक्ताची शपथ घेतली, इंगरजां विरुध्द लढा घेण्याची. त्यासाठी भगत सिंग १९२४ मध्ये HRS म्हणजेच हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन चे सदस्यपद स्वीकारले, ज्याचे चंद्रशेखर आझाद हे मुख्य आयोजक होते. पुढे भगत सिंग यांनी १९२६ मध्ये नौजवान भारत सभा ही संघटना स्थापित केली. या संघटनेचा मुख्य उद्देश शेतकरी आणि तरुणांना सोबत घेऊन ब्रिटीश राजवटी विरूध्द जाऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्या बद्दल प्रेरित करणे होते. त्यांनी स्थापित केलेल्या ब्रिटीश राजवटी विरोधी संघटनांना प्रेरित करण्या साठी आणि क्रांतिकारी कार्यात सहभागी होण्यासाठी भगत सिंग यांनी १९२९ मध्ये दिल्ली मधील मध्यवर्ती विधान सभेवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये भाग घेतला. तसेच इंग्रजां विरूध्द झालेल्या अश्या अनेक घडामोडी मध्ये भगत सिंग यांनी त्यांचा भाग नोंदवला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाचे प्रतीक म्हणून त्यांना शहीद भगत सिंग म्हणूनही ओळखले जाते.

भगत सिंग यांची फाशी (Bhagat Singh got hanged):

भगतसिंग यांची फाशी ही भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस घडलेली इतिहासातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. भगतसिंग त्यांचे सोबती सुखदेव आणि राजगुरू ब्रिटिश वसाहतवादी राजवटी विरुद्ध क्रांतिकारी कारवाईत सहभागी झाल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

भगतसिंग आणि बुटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी केंद्रीय विधानसभेच्या अधिवेशनात बॉम्ब फेकले. त्या बॉम्ब स्फोटामध्ये कुणाचेही नुकसान झाले नाही परंतु त्यांनी घटनास्थळापासून पळ न काढता स्वतःला इंग्रजांच्या ताब्यात देउन टाकले .सुनावणी दरम्यान भगतसिंग यांनी बचावासाठी काही बोलण्यास नकार दिला भगतसिंग हे २ वर्षे तुरुंगात राहिले त्या काळात त्यांनी अनेक लेख लिहून त्यांची मते मांडली. त्यांचा तुरुंगात असताना देखील अभ्यास चालूच होता. आणि त्यांच्या लेखांमध्ये त्यांनी भांडवलदार आपले शत्रू आहेत असे वर्णन केले तसेच कामगारांचा शोषण करणारा एखादा भारतीय माणूस जरी असला तरी तो त्यांचा शत्रू आहे असे त्यांनी त्यांच्या लेखाद्वारे मांडले. तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांवरील अमानुष वागणुकीचा निषेध म्हणून ६४ दिवस उपोषण केले. ७ ऑक्टोबर १९३० रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. आणि २३ मार्च १९२३ रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

भगत सिंग यांचे शिकवण देणारे मूल्य(Bhagat Singh Values):

भारतीय युवांना भगत सिंग यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे मूल्य मिळण्यासारखे आहे त्यातील काही मूल्य म्हणजे,

• त्यांनी देशभक्तीचा आणि स्वतंत्रतेचा अट लावला आहे. त्यांच्या या निर्भय स्वभावाने त्यांनी आपल्याला साहस आणि अभिमान दिले.

• त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि समाजसेवेच्या कार्यांचे महत्त्व आपल्याला समजते.

• त्यांनी न्याय आणि समानतेच्या ठरावातील मजबूत विश्वासानुसार आपल्याला अन्यायाविरूद्ध लढण्याची आवड निर्माण करून देते.

• त्यांच्या त्यागाचा आणि देश प्रेमाच प्रमाण आपल्याला त्यांच्या आदर्शांना अनुसरण करण्याची प्रेरणा देते.

• त्याच्या देशभक्तीचा आणि देश प्रेमाच महत्व आपल्याला आपल्या देशावर प्रेम आणि समर्पण करावे अशी शिक्षा देतो.

भगतसिंह यांच्याबद्दल काही प्रश्न(FAQs):

१) भगतसिंग यांच्या आईचे नाव काय होते?

भगतसिंग यांचा जन्म 1907 साली पंजाब प्रांतातील लयालपुर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती होते व वडिलांचे नाव किशन सिंग होते.

२) भगतसिंग यांचा पाकिस्तानात आदर आहे का?

भगतसिंग यांचा हिंदू नव्हे तर मुस्लिम देखील आदर करतात. पाकिस्तानची संस्थापक कायद-ए-आझम मोहम्मद अली जिना यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात भगतसिंग यांना दोनदा श्रद्धांजली वाहिली होती.

३) भगतसिंग यांचे कुटुंब अजूनही जिवंत आहे का?

भगतसिंग यांना नऊ भाऊ आणि बहिणी होत्या. त्यापैकी शेवटच्या बीबी प्रकाश कौर यांचे २०१४ मध्ये कॅनडा मध्ये निधन झाले.

४) यांना किती भाषा येत होत्या?

भगतसिंग हे खूप बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. त्यांनी खूप लहान वयामध्ये विविध भाषा शिकून घेतल्या होत्या जसे की इंग्रजी, अरबी,पोलिश ,फ्रेंच आणि स्वीडन अशा भाषा त्यांना येत होत्या.

निष्कर्ष (Conclusion):

मित्रांनो आम्ही अशी अपेक्षा करतो की आजच्या आर्टिकल तुम्हाला आवडले असेल. आम्ही Bhagat Singh information in Marathi हा टॉपिक तुमच्यासमोर मांडला. आजच्या लेखामध्ये आपण भगतसिंग यांच्या विषयी त्यांच्या बालपणा विषयी, त्यांचा इतिहास, त्यांची फाशीची शिक्षा याबद्दल माहिती बघितली. आणि भारतीय युवांना त्यांच्याकडून कोणते मूल्य घेता येतील याबद्दलही माहिती बघितली. तुम्हालाही Information आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबातील नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Comment