Janjira fort information in marathi

जंजिरा किल्ल्याची माहिती | Janjira Fort information in Marathi

नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती. भारत हा एकमेव असा देश आहे जिथे सम्राट आणि राज्य केले आहे त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले स्थापन केले आहे केले. ज्यामध्ये अनेक रहस्य लपलेले आहेत .भारतामध्ये महाराष्ट्रातील कोकणामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ जंजिरा किल्ला आहे. जंजिरा हा पंधराव्या शतकातील पौराणिक किल्ला आहे. जंजिरा किल्ला खोल समुद्राने पूर्णपणे वेढलेला असून खूप प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला कोकणातील खूप मोठे पर्यटन
म्हणून स्थळ ओळखला जातो. जंजिरा किल्ला हा अरबी समुद्रात वसलेला किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी मुघलांपासून जिंकला होता.

जंजिरा किल्ल्याचा इतिहास | Janjira fort history in Marathi

जंजिरा किल्ला हा एक अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो.जंजिरा हा शब्द जंजिरा या अरबी शब्दावरून तयार झालेला आहे. ज्याचा अर्थ बेट असा होतो. जंजिरा किल्ला जिंकणे कुणालाही शक्य झाले नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी प्रयत्न करूनही त्यांना हा किल्ला जिंकणे शक्य झाले नाही ते या प्रयत्नात अपयशी ठरले .परवानगी घेऊन बांधलेला समुद्रातील किल्ल्याची जहागीरदारी १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळवली. जंजिरा जलदुर्ग अहमदनगरच्या सुलतानाच्या सेवेतील मलिक अंबर निजामशाही घराण्यातील एक अबिसिनिय मंत्री याने बांधला होता. सतराव्या शतकात अखेरीस बांधलेला हा किल्ला अजून देखील शाबूत आहे. अभिसिनियाचे शूर खूप काटक होते त्यांनी जीव प्राणाला लावून जंजिरा राखला. अनेकांचे जंजिरा जिंकण्याचे खूप मोठे स्वप्न होते पण ते स्वप्न अयशस्वी राहिले .छत्रपती शिवाजी महाराजांनीही जंजिरा मिळवण्याचा प्रयत्न केला पण ते देखील अयशस्वी ठरले . संभाजी राजांनी १६७६ मध्ये जंजिरा किल्ल्याला आव्हान देण्यासाठी पद्मदुर्ग म्हणून ओळखला जाणारा दुसरा सागरी किल्ला तयार केला. शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बारा मीटर उंच ग्रॅनाईटच्या भिंतीवर मापन मापन करण्याचा प्रयत्न करून देखील हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही संभाजी राजे यांनी सुद्धा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी एक बोगदा तयार करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न देखील अयशस्वी साध्य झाला.१६१७ ते १९४७ अशी 330 वर्षे जंजिरा अजिंक्य राहिला. देश स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात अपूर्ण राहिले.

जंजिरा किल्ल्याची रचना:-

जंजिरा हा किल्ला १५व्या शतकात बांधण्यात आला. जंजिरा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर स्थित आहे. काही अवशेष वगळता खूप महत्त्वाची तटबंदी अजूनही किल्ल्यामध्ये तशीच या मोठ्या भव्य किल्ल्याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे लांडा कासम, कलाल बांगडी आणि चावरी या तीन प्रचंड मोठ्या तोफा. या तोफा 12 किलोमीटर पर्यंत समुद्रात मारा करू शकतात. जंजिरा किल्ल्याचे दोन महत्त्वाचे दरवाजे आहेत एक म्हणजे मुख्य प्रवेशद्वार जेट्टीच्या समोर आहे जिथून बोटीने येण्या जाण्याचा मार्ग आहे . दुसरा पश्चिमेला असलेला दरवाजा दर्या दरवाजा नावाचा जो समुद्रामध्ये उघडतो आणि तो दरवाजा पूर्वीच्या काळात आपत्कालीन दरवाजा म्हणून वापरला जात असत.जंजिरा किल्ला हा अजिंक्य किल्ला म्हणून ओळखण्यात येतो. या किल्ल्यावर काबीज करण्यासाठी अनेक वेळा हल्ले झालेत पण या किल्ल्यात अजून पर्यंत कोणीच प्रवेश करू शकलो नाही त्यामुळेच हा ३६५ वर्ष जुना किल्ला आहे. म्हणूनच त्याला अजिंक्य किल्ला या नावाने ओळखले जाते. ४० फूट उंच भिंतींचा किल्ला बांधलेला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ९० फूट उंच असून त्याच्या पायी २० फूट खोल आहे. त्यामध्ये २२ सुरक्षा चौक्याही आहेत. जंजिरा किल्ला पर्यटनासाठी खूप नामांकित किल्ला आहे.

जंजिऱ्यामधील प्रेक्षणीय गोष्टी:

जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यामधील मुरुड या जवळ आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला अथांग महासागर आहे. दोन दरवाजे आहेत. एक दरवाजा पूर्व दिशेला आहे. आणि दुसरा दरवाजा आपत्कालीन दरवाजा आहे. दरवाजाच्या कमानीवर पांढरा दगड आहे त्यावर अरबी भाषेत शिलालेख कोरलेले आहेत. लेखांमध्ये असलेल्या योहोर या शब्दावरून ते बांधकाम इ.स १६९४ मध्ये झाल्याचा अंदाज काढतात. किल्ल्याच्या कमानीतून आत मध्ये आल्यावर उजव्या हाताला वाघाचे चित्र दिसते त्या वाघाने एकूण सहा हत्ती पकडलेली आहेत असं दाखवण्यात आले आहे. किल्ल्याच्या दक्षिण भागात एक तलाव आहे त्यावर हिरवा गार थर आहे. किल्ल्यामध्ये असलेली महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सुरूल खानाचा वाडा. हा वाडा बालेकिल्ल्यांमध्ये आहे. किल्ल्यावर काही जुन्या हिंदू शिल्पाचे अवशेष दिसतात. जंजिरा किल्ला हा पर्यटनासाठी खूप आकर्षक आहे.

जंजिरा किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :

• जंजिरा किल्ला हा प्रमुख शहर, पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर आहे आणि अलिबाग पासून बघितल तर 54 किलोमीटर अंतरावर आहे.
• शेजारील शहरांमधून जंजिरा किल्ल्याकडे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहेत म्हणून बस हा एक उत्तम पर्याय आहे.
• जंजिरा किल्ल्याजवळ दोन गाव आहेत, एक राजापुरी आणि दुसर म्हणजे एकादरा.
• जंजिरा किल्ला हा समुद्र किनारा पट्टी लगत असून समुद्राच्या थोडा मध्ये आहे.
• म्हणून किल्ल्यावर जाण्यासाठी एक मात्र आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे बोट फेरी.
• ही बोट फेरी ची सोय किल्ल्याजवळ असलेल्या दोन्ही गावामध्ये उपलब्ध आहे. राजापुरी मधून जंजिरा किल्ला बोट फेरी आणि एकादरा मधून मुरुड किल्ला फेरी.
• या बोट फेरी तुम्हाला किल्ल्याच्या पर्यंत पोहोचवतील, आणि जर त्यांच्याकडून गाईडच्या सोयीसाठी पैसे दिले तर ते गाईड ची सेवा पण उपलब्ध करून देता, जे तुम्हाला किल्ल्याची पूर्ण माहिती जाणून घेण्यात तुमची मदत करतील.

मुरुड जंजिरा किल्ल्यावर बघण्यासारखे :

• जंजिरा किल्ला हा अरबी समुद्राच्या किनारपट्टी पासून ४-५ किलोमीटर मध्ये आहे.
• जंजिरा किल्ला हा खडकाळ जमिनीवर बांधलेला असून चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे, म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी बोट एकमात्र पर्याय आहे, ज्याने बोट फेरी चा आनंद घेता येतो.
• जंजिरा किल्ल्यामधे भरपूर प्रवेश द्वार आहेत, त्यातील सर्वात मोठे मुख्य प्रवेश द्वार आहे.
• जंजिरा किल्ल्याच्या प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची संरक्षणात्मक रचना व यंत्रणा, ज्यामध्ये आपल्याला शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी भव्य भिंती बघायला मिळतील, तटबंदी साठी किल्ल्याच्या बाजूने अनेक तोफा आहेत.
• जंजिरा किल्ल्याचे ठिकाण, बांधणी आणि रचना संरक्षणासाठी अनुकूल आहेत, जे एक उत्तम करागिरीचे उदाहरण देते.
• जंजिरा किल्ल्यामध्ये टंचाई ची वेळ आल्यास मधील रहिवाश्यांना पाण्याची सोय करण्यासाठी दोन गोड्या पाण्याचे जलसाठे आहेत.
• जंजिरा किल्ल्यामधे त्या काळातील विविध कलाकृतींचे अवशेशही बघायला मिळतात.
• जंजिरा किल्ल्याच्या तटबंदी वरून आपण अरबी समुद्राचे एक सुंदर दृश्य बघू शकतो, आणि किनाऱ्याकडे असलेले दोन गड म्हणजेच पद्मदुर्ग आणि सामराज गड देखील बघू शकतो.

निष्कर्ष (Conclusion):

तर मित्रांनो, आज आपण वरील लेखात Janjira fort information in Marathi मराठी पाहिली. यामध्ये आज आपण पाहिले की जंजिरा किल्ला कुठे आहे? जंजिरा किल्ल्याचा इतिहास जंजिरा किल्ल्याची रचना व जंजिरा किल्ल्यास जाण्याचा मार्ग अशा सर्व काही गोष्टी आपण वरील लेखात बघितल्या आहेत.
आमचा एकच हेतू आहे की तुम्हा सर्वांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणं आणि आपल्या संस्कृतीची आपल्या पूर्वजांनी जपलेल्या ऐतिहासिक गोष्टींची माहिती तुम्हाला इंटरनेट द्वारे पोहोचवावी.
तुम्हाला आजचा लेख आवडला असेल तर मी तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि तसेच तुमच्या परिवारासोबत Share करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.
तुम्हाला जर या लेखांमधून काही शिकायला मिळाले असेल तर WhatsApp,Facebook वर नक्की शेअर करा.

जंजिरा किल्ल्याबद्दल काही प्रश्न (FAQs):

१) जंजिरा किल्ला कोणी बनवला होता?
भारतातला जंजिरा किल्ला एक समुद्रातील किल्ला आहे. तो किल्ला मलिक अंबरने बनवला होता.

२) समुद्रामध्ये कोणता किल्ला आहे?
महाराष्ट्र मध्ये समुद्रामध्ये जंजिरा किल्ला स्थित आहे. जंजिरा किल्ला अजिंक्य किल्ला या नावाने देखील ओळखला जातो.

३) जंजिरा किल्ल्यावर किती तोफा होत्या?
जंजिरा किल्ला हा एक अजिंक्य किल्ला आहे हा किल्ला समुद्रामध्ये एका बेटावर वसलेला आहे. जंजिराच्या तटावर एकूण 572 तोफा होत्या.

४) जंजिरा किल्ल्याचे खरे नाव काय आहे?
जंजिरा हा शब्द जझिरा या शब्दाचा खालचा शब्द आहे. ज्याचा .अर्थ अरबी भाषेत बेट होतो. जंजिरा किल्ल्याचे नाव “मुरूड”आणि “जंजिरी”या मराठी आणि कोकणी शब्दाचे एकत्रीकरण आहे.

५) मुरुड जंजिरा किल्ल्यावर कसे जायचे?
समुद्रकिनाऱ्यावरील राजापुरी जीटी वर बोटी सोडल्या जातात तेथून प्रवाशांना जंजिरा किल्ल्यावर नेण्यात येते. तेथे फिरण्यासाठी तुम्हाला एक दोन तासांचा वेळ देतील. बोटीने जाण्यासाठी सुमारे 50 ते 100 रुपये लागतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *