संगणकाची संपूर्ण माहिती | Computer Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण संगणकाविषयी माहिती बघणार आहोत. संगणकाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झालेच तर सुरुवातीच्या विकासाचे श्रेय हे पूर्णपणे इतिहासात मधे अनेक व्यक्तींना दिले जाते ज्यामुळे आधुनिक संगणकाचा विकास झाला. आजच्या या आधुनिक युगात संगणक हे खूप महत्त्वाचे साधन बनलेले आहे. रुग्णालय, ऑफिस ,कॉलेज, शाळा ,प्रयोगशाळा इत्यादी प्रत्येक ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो. आजच्या या युगात संगणकाबद्दल प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या युगात संगणकाची गरज खूप वाढलेली आहे. संगणकाशिवाय एखादे काम करणे अशक्य आहे. संगणक आल्यापासून मनुष्यबळाची आवश्यकता खूप कमी झालेली आहे. संगणकाला इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर (Computer)असे म्हणतात. कॉम्प्युटर या शब्दाचा अर्थ Calculation म्हणजेच हिशोब करणे असा आहे.

संगणकाची महत्त्वाची माहिती:

कॉम्प्युटर आहे तीन महत्त्वाचे काम करते पहिले म्हणजे माहितीला स्वीकार करणे. ज्याला input म्हटले जाते. दुसरे काम म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणे. आणि तिसरे काम म्हणजे प्रक्रिया केलेल्या माहितीला output दाखवणे ज्याला म्हटले जाते.

चार्ल्स बॅबेज यांना आधुनिक संगणकाचे जनक म्हटले जाते कारण त्यांनी पहिल्या संगणकाचा शोध लावला. सुरुवातीच्या काळात संगणक हे फक्त माहिती साठवण्यासाठी आणि त्या माहितीवर प्रक्रिया करणे यापुरते मर्यादित होते. जगातील पहिला हार्ड डिस्क 1979 मध्ये बनवला होता. त्यामध्ये फक्त 5 MB डाटा स्टोअर केला जात होता. 1968 मध्ये जगातील पहिल्या कम्प्युटर कीबोर्ड चा शोध लागला . संगणक हे इलेक्ट्रॉनिक साधन असून ते डेटा किंवा माहिती हाताळते. संगणकावर टाईप करू शकतो ,गेम खेळू शकतो, ई-मेल पाठवू शकतो आणि संगणक वापरून करू शकतो.

संगणकाचे सामान्य घटक:

संगणकाचे मुख्यतः दोन घटक आहेत. ते म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर . हार्डवेअर म्हणजे संगणकाचे ते सर्व भाग जे मूर्त भौतिक वस्तू आहेत ते हार्डवेअर मध्ये समाविष्ट आहेत. हार्डवेअर मध्ये कॉम्प्युटर चिप्स ,ग्राफिक्स कार्ड ,साऊंड कार्ड ,मेमरी (RAM),मदरबोर्ड ,केबल्स ,डिस्प्ले ,पावर सप्लाय प्रिंटर, कीबोर्ड आणि माईक अशा इनपुट डिव्हाइसेस चा समावेश आहे.

इनपुट उपकरणे: इनपुट उपकरणे ही सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये डेटा प्रविष्ट करण्यासाठी वापरली जातात. जसे की स्कॅनर, माउस, कीबोर्ड ,बारकोड रीडर ,डॉक्युमेंट रीडर ,कॅरेक्टर रीडर इ.

आउटपुट उपकरणे: आउटपुट उपकरणे म्हणजे प्रक्रिया केलेला डाटा मानवी वाचनीय स्वरूपात प्रदान करणे. जसे की प्रोजेक्टर, स्पीकर ,मॉनिटर ,प्रिंटर इ.

संगणकाचे प्रकार :

संगणक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आकार देखील वेगवेगळे असतात. संगणकाचे एकूण पाच प्रकार आहेत:

१) मिनी कम्प्युटर: छोट्या संगणकांना मिडरेंज संगणक असेही संबोधले जाते. या प्रकारचे संगणक एकाच वेळी खूप सारे काम करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ते लहान कंपन्यांमध्ये वापरले जातात.

२) मेनफ्रेम संगणक: या संगणकाचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या कंपन्या आणि सरकारी संस्था व व्यवसाय चालवण्यासाठी केला जातो. मोठ्या प्रमाणात डेटा संग्रहित करण्याचे काम मेन फ्रेम संगणक करते आणि त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते.

३) सुपर कम्प्युटर: सुपर कम्प्युटर हा खूप वेगवान कम्प्युटर आहे. आणि हा खूप महाग देखील आहे. सुपर कम्प्युटर कडे स्टोरेज आणि गतीचे प्रचंड क्षमता आहे त्यामुळे सुपर कम्प्युटर प्रति सेकंद लाखो सूचना संग्रहित करू शकतात.

४) वर्कस्टेशन: हा संगणक बाकीच्या संगणकांच्या तुलनेमध्ये अधिक शक्तिशाली मायक्रोप्रोसेसर आणि मिनी कम्प्युटरच्या तुलनेत उच्च गुणवत्तेचा मॉनिटर आहे.

५) सूक्ष्म संगणक: सूक्ष्म संगणकाची गती इतर संगनाकापेक्षा कमी आहे.CPU साठी सूक्ष्म संगणक मायक्रोप्रोसेसर वापरते.

संगणकाचा इतिहास History Of Computer :

संगणकाचा शोध कोणी लावला?

संगणकाच्या या कार्यात बऱ्याचशा लोकांनी आपले योगदान दिलेले आहेत परंतु त्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेले व्यक्ती म्हणजे चार्ल्स बॅबेज .

चार्ल्स बॅबेज यांनी 19 व्या शतकात सण 1822 मध्ये पहिले मशीन बनवले या मशीनचे नाव त्यांनी डिफरन्स इंजिन असे दिले. हे मशीन वाफेने चालत होते कारण या मशीनमध्ये गिअर आणि शाफ्ट लावलेले होते.चार्ल्स बॅबेज यांनी 1833 मध्ये डिफरन्स इंजिन चे विकसित रूप तयार केले व त्या मशीनला त्यांनी अनालिटिकल इंजिन असे नाव दिले. डिफरन्स इंजिन ज्या मशीन पेक्षा एनालिटिकल इंजिन हे अधिक शक्तिशाली होते व प्रगतशील देखील होते. यालाच प्रथम संगणक म्हटले जाते.

डॉ. हॉवर्ड एकेंस यांनी IBM कंपनीच्या चार शास्त्रज्ञांसोबत मिळून सन 1944 मध्ये एक विकसित संगणक तयार केला.

हा संगणक सर्वात पहिले विजेवर चालणारा संगणक होता आणि याचे नाव ऑटोमॅटिक सिक्वेन्स कंट्रोल कॅल्क्युलेटर असे ठेवण्यात आले. हे संगणक सहा सेकंदात एक गुणाकार व बारा सेकंदात एक भागाकार करत होते.

संगणकाच्या विविध प्रकारांची माहिती types of computer in Marathi :

कंप्यूटर मध्ये आपल्या वापरानुसार वेगवेगळे आकार व वेगवेगळ्या पद्धती येतात. आपण संगणकाचे नाव ऐकले की आपल्या मनात पर्सनल कम्प्युटर म्हणजेच डेस्कटॉप किंवा लॅपटॉप येतो.

1) डेस्कटॉप(desktop):

डेस्कटॉप कम्प्युटरचा उपयोग कॉलेज, ऑफिस ,घर, शाळा, इत्यादी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. डेस्कटॉप कम्प्युटर म्हणजे टेबलावर ठेवलेला कम्प्युटर होय .याचे कीबोर्ड, माऊस ,प्रिंटर ,मॉनिटर इत्यादी वेगवेगळे भाग असतात. या डेस्कटॉप ला पूर्णपणे विद्युत पुरवठा लागत असतो व त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे कठीण असते.

2) लॅपटॉप(laptop):

कंप्यूटर चा दुसरा प्रकार म्हणजे लॅपटॉप आहे. ज्याला सर्वजण लॅपटॉप असे म्हणतात. लॅपटॉप मध्ये माऊस, सीपीयू ,कीबोर्ड आधीपासूनच असतात. लॅपटॉपचे वजन कमी असल्याने त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे खूप सोपे असते. टॉप बॅटरीवर काम करते व त्याला चार्जिंग ची गरज पडते.

3) टॅबलेट(tablet):

टॅबलेटचा आकार लॅपटॉप पेक्षा लहान असतो लहान असतो व त्याला आपण अगदी खिशामध्ये घेऊन सुद्धा फिरू शकतो. टॅबलेटला हँड हेल्ड कम्प्युटर असे म्हणतात. कारण तो वापरण्यासाठी खूप कन्व्हिनियंट आहे. टॅबलेट मध्ये माऊस व कीबोर्ड ऐवजी टच स्क्रीन चा वापर करतात.

4)पामटॉप (palmtop):

पामटॉप एक पोर्टेबल कम्प्युटर आहे. पामटॉप कम्प्युटरला मोबाईल देखील म्हटले जाते. पामटॉप ची कार्यक्षमता लॅपटॉप व कम्प्युटरच्या तुलनेत कमी आहे. या कम्प्युटरला आपण हातात धरू शकतो.

संगणकाचे विविध भाग (parts of computer):

संगणकामध्ये विविध प्रकारचे खूप सारे भाग असतात. त्यातील काही महत्त्वाच्या भागांची माहिती आपण आता बघूया.

१. मदरबोर्ड: आपल्या देहा सारखे हे देखील संगणकाच्या सर्व घटकांना एकत्र जोडण्याचे काम करते.

२. CPU (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट): याला संगणकाचा मेंदू म्हणून ओळखले जाते, जो संगणकामधील सर्व सूचना कार्यान्वित करण्यासाठी आणि गणना करण्यासाठी जबाबदार असतो.

३. RAM (रँडम एक्सेस मेमरी): संगणकामधील ही मेमरी अल्पमुदतीची असते जिच्यामध्ये सीपीयूला त्वरित पाहिजे असलेली माहिती संग्रहित करून ठेवते.

४. हार्ड ड्राईव्ह: संगणकावर साठवलेल्या सर्व फाइल्स आणि प्रोग्रॅम दीर्घकालीन वापरासाठी हार्ड ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात.

५. PSU (पॉवर सप्लाय युनिट): हा भाग संगणकाच्या सर्व घटकांना पाहिजे असलेल्या विद्युत ऊर्जेचा पुरवठा करतो त्यांना योग्यरीत्या कार्य करण्यासाठी योग्य प्रमाणात ऊर्जा मिळेल याची खात्री करून देतो.

६. GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट): हा भाग संगणकाच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या सर्व प्रतिमा व्हिडिओ आणि थ्रीडी ग्राफिक्स प्रस्तुत करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी जबाबदार आहे.

७. SSD (सॉलिड स्टेट ड्राईव्ह): हा भाग देखील हार्ड ड्राईव्ह प्रमाणेच फाइल्स आणि प्रोग्रॅम साठवते परंतु हार्ड ड्राईव्ह मध्ये स्पेलिंग डिस्क असते त्या ऐवजी सॉलिड स्टेट ड्राईव्ह मध्ये वापरली जाते, ज्याच्या परिणामी डेटा एक्सेस आणि ट्रान्सफर खूप जलद गतीने होतो.

८. मॉनिटर: संगणकाचा हा भाग एक डिस्प्ले स्क्रीन असते जिथे संगणकावरील सर्व व्हीज्युअल आउटपुट आपण बघू शकतो.

९. कीबोर्ड आणि माऊस: संगणकामधील हे भाग इनपुट उपकरणे आहेत, जे आपल्याला टाईप करून किंवा नेविगेट करून संगणकाशी संवाद साधण्यासाठी मदत करतात.

१०. USB (युनिवर्सल सिरीयल बस): हा संगणकातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे, जो एक पोर्ट चे काम करतो ज्यामुळे आपल्याला संगणकावर कीबोर्ड, माऊस, प्रिंटर आणि फ्लॅश ड्राईव्ह सारखे विविध बाह्य उपकरणे जोडण्यासाठी परवानगी देतो.

संगणकाचे फायदे:

 1) कामकाज सोप्या पद्धतीने होते.

 2) संगणक जास्त प्रमाणात डेटा संग्रहित करण्यास मदत करतात.

 3) संगणकाला दिलेल्या डेटा आणि माहिती त्यावर संगणक काम करते.

 4) संगणकामुळे नवीन टेक्नॉलॉजी ची माहिती होते.

निष्कर्ष (Conclusion):

मित्रांनो आपण आजच्या या लेखांमध्ये संगणकाविषयी माहिती बघितली. आज जर संगणक नसते तर मानवी जीवन एवढे सोपे झाले नसते. आज संगणकाची गरज मोठ्या कंपन्यांना, कॉलेजेसला ,शाळांना खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा दैनंदिन जीवनातील एक घटक बनलेला आहे. आज काल संगणक (Mobile)प्रत्येकजण खिशात घेऊन फिरतात. संगणकाने खूप लोकांचे जीवन सोपे केले आहे आणि बरेच लोकांचे जीवन खराबही केले आहे. आजच्या लेखामध्ये आपण संगणकाचे फायदे, संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार ,संगणकाचे घटक असे बरेचसे पॉईंट्स आपण बघितले. आजच्या युगात आपल्याला संगणकाबद्दल माहिती असते खूप आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही इंटरनेट द्वारे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

संगणकाबद्दल काही प्रश्न (FAQs):

1) संगणकाचा शोध कोणी लावला?

चार्ल्स बॅबेज यांनी आधुनिक संगणकाचा शोध लावला.

2) संगणकाची व्याख्या काय आहे?

संगणक हे इलेक्ट्रॉनिक डिवाइस असून डेटा डेटावर वर माहिती प्रक्रिया करणारे एक उपकरण आहे.

3) संगणकाला काय म्हणतात?

संगणकाला कॉम्प्युटर असे म्हणतात. ट्यूटर हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे माहिती साठवण्यासाठी वापर करतात. व दिलेल्या माहितीचा निष्कर्ष काढतो.

Leave a Comment