किसान क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती | kisan credit card scheme Information in Marathi

kisan credit card scheme Information in Marathi: नमस्कार मित्रांनो ,ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या ज्ञानाच्या अखंड प्रवासात तुमचे स्वागत आहे. आपला भारत देश हा प्रामुख्याने कृषी प्रधान देश मानला जातो. आजही देशातील सर्वात मोठी लोकसंख्या ही शेतीतून उदरनिर्वाह करत असते. आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये सुद्धा शेतीचा वाटा हा 17 ते 18 टक्क्यांपर्यंत आहे .वादळ, पूर, अतिवृष्टी या अनेक नैसर्गिक संकटामुळे आपला शेतकरी हा हवालदिर झालेला आहे.अशा गोष्टींमुळे पिकांचे खूप नुकसान होते. कारण आपले कृषी उत्पादन हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते .

कोणतेही उत्पन्न झाले तरी त्याला बाजार भाव पाहिजे तसा मिळत नाही. साधे गुंतवलेले भांडवल सुद्धा कधी कधी शेतकऱ्याला मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण होत असते. अशा वेळेस मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते.

शेती व्यवसायामध्ये जसे उत्पादन वाढले आहे तसेच शेतकऱ्यांचा खर्चही वाढलेला आहे. कधीकधी निसर्गाचा कोप तर कधीकधी बाजारपेठेतील दरात होत चाललेला चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भोगावे लागत आहे.

अशाच अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना आणत असते. जसे की, पिक विमा योजना, पीएम किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना. परंतु अशा प्रकारच्या केंद्र सरकार व राज्य सरकारने काढलेल्या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. या योजनांची योग्य माहिती शेतकरी वर्गापर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या लेखाद्वारे या योजना आपल्या शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

आजच्या या लेखामध्ये आपण “किसान क्रेडिट कार्ड योजना” याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड कसे मिळते ?त्यासाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागतात? या संदर्भात संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज या लेखांमध्ये आम्ही करणार आहोत.त्यासाठी तुम्ही हा लेख जाणून घेण्यासाठी संपूर्ण वाचावा. की जेणेकरून आम्ही दिलेली माहितीचा उपयोग तुम्हाला होईल व तुम्ही या किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

किसान क्रेडिट(kisan credit card) कार्ड म्हणजे काय?

ही एक केंद्रीय योजना आहे. सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून या योजनेची सुरुवात केली. शेतकऱ्यांना बियाणे ,खते ,कीटकनाशके इत्यादींसारखा कच्चामाल खरेदी करता यावा व त्यांच्या उत्पादन संबंधीच्या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी त्यांना रोख रक्कम काढता यावी.तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना ऑगस्ट 1998 मध्ये सुरू करण्यात आली.

नाबार्ड बँकेद्वारे आर. व्ही. गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार या योजनेची सुरुवात करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या शेती आणि बिगर शेती विषयक कामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते व ती पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही योजना 2004 मध्ये विस्तारीत करण्यात आली.

2007 साली रिझर्व बँकेने खाजगी बँकांनाही किसान क्रेडिट कार्ड देण्याचा अध्यादेश काढला.

टी. एम. भसीन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने 2012 साली या योजनेत बदल सांगितले.

ही योजना शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर होण्यासाठी 2014 मध्ये बँकेने ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यास सुरुवात केली.

2018 व 19 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मत्स्यपालन व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले.

18 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या द्वारे या किसान कार्ड क्रेडिट योजनेमध्ये सुधारित असे बदल करण्यात आले.

किसान कार्ड योजनेचे फायदे वैशिष्ट्ये 

या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना बँकेकडून फक्त 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते .जर शेतकऱ्यांनी पहिल्या कर्जाची 5 वर्षाच्या कालावधीत वेळेवर परतफेड केली तर त्याला 2% सवलत दिली जाते. किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात तीन लाखांपर्यंतचे कर्ज देऊ करतो व हे कर्ज फक्त 4% व्याज दराने दिले जाते.

बँका व संस्थांमध्ये कर्ज काढणे ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ व अवघड बनलेली आहे. बी बियाणे पेरण्यापासून ते नांगरण्यापर्यंत तसेच पिक आल्यानंतर ते बाजारात विक्री करण्यापर्यंत शेतकऱ्यांना खूप भांडवलाची गरज पडत असते.अशा वेळेस जर भांडवलाची कमतरता भासली तर शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते.

परंतु कर्ज काढण्यासाठी सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे कोणतेही कर्ज काढण्यासाठी प्रथम काहीतरी तारण ठेवावे लागते व त्या कर्जाचे व्याजदरही अवाढव्य म्हणजे शेतकऱ्याच्या मानाने खूप जास्त असते. अशा वेळेस किसान कार्ड योजना ही प्रत्येक शेतकरी मित्रांसाठी खूपच फायदेशीर आहे.

हे कर्ज घेण्यासाठी दीर्घकाळ लागत नाही तसेच शेतकऱ्याला काहीही तारण ठेवावे लागत नाही. तसेच किसान क्रेडिट कार्ड कर्जाचे व्याज हे बाकी कर्जांच्या व्याजदरापेक्षा खूप कमी असते.

किसान क्रेडिट कार्ड हे शेतीविषयक गरजेपुरतेच मर्यादित नसून त्याचा उपयोग शेतकरी त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी, वैयक्तिक गरजा, मुलांचे लग्न व  मुलांचा शैक्षणिक खर्च अशा बऱ्याच गरजा भागावण्यासाठी शेतकरी करू शकतो.

शेतकरी वर्ग हा आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्जबाजारी होत असतो. या योजनेद्वारे कोणताही लाभार्थी शेतकरी हा आता कर्जबाजारी होणार नाही.

किसान क्रेडिट कार्ड या योजनेद्वारे शेती सोबतच शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालन तसेच मत्स्यपालन असे जोडधंदे करू शकतो. त्यामुळे त्याला यामधून अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतो. या योजने मधून शेतकऱ्यांना खाद्य ,पशु आहार व चिकित्सा यावरील खर्चा करिता सुद्धा कर्ज पुरवठा केला जातो.

या योजनेमध्ये शेतकऱ्याला कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास केसीसी योजना धारकांसाठी 50000 पर्यंतचे विमा संरक्षण असते. तसेच इतर जोखमीच्या बाबतीतही 25000 चे कव्हर दिले जाते.

जे शेतकरी किसान कार्ड योजनेला पात्र होतात त्यांना किसान क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्ड सह आकर्षक व्याजदरा बरोबरच बचत खाते दिले जाते.

एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एका वर्षात कर्जाची परतफेड केली नाही तर व्याजदर हा 7% भरावा लागतो.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी लागणारी पात्रता

किसान क्रेडिट कार्ड या योजना घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

लाभार्थी शेतकरी याचे वय 18 पेक्षा कमी व 70 पेक्षा जास्त नसावे. जर 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्याच्यासोबत 60 वर्षापेक्षा कमी वयाचा सहकर्जदार असणे आवश्यक आहे. स्वतःच्या मालकीची जमीन असणारे मौखिक भाडे पट्टेवार व इतरांची जमीन भाडेतत्त्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश या योजनेमध्ये होतो.

शेतकरी हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असेल तर या योजनेचा लाभ घेण्यास तो पात्र असतो.

किसान क्रेडिट कार्ड हे कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

  • ओळखीच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र ,ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी.
  • पत्ता पुरावा यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र ,डायव्हिंग लायसन ,वीज बिल या पुराव्यांमध्ये अर्जदाराचा सध्याचा पत्ता असणे आवश्यक आहे.
  • जमिनीची कागदपत्रे उदा. आठ अ किंवा सातबारा उतारा.
  • दुसऱ्या इतरत्र बँकेतून कर्ज घेतले नाही म्हणून शपथपत्र.
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराची फोटो.
  • बँकेचे पासबुक प्रत
  • मोबाईल क्रमांक जो आधार क्रमांकाशी जोडलेला / लिंक केलेला असावा. जर आपला मोबाईल आधार क्रमांकाची लिंक नसेल तर तुमच्या जवळच्या आधार केंद्रामधून तो लिंक करावा लागेल.

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आपण ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.

  •  ऑनलाइन अर्ज कसा करावा
  • पहिल्यांदा आपल्याला सरकार सेवा केंद्रामध्ये जावे लागते.
  • वर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे.
  • तेथे आपला ऑनलाईन अर्ज भरला जातो.
  • किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी ज्या बँकेचा अर्ज करायचा आहे त्या बँकेच्या वेबसाईटला वर जायचे अशे.
  • पर्यायी सूची मधून किसान क्रेडिट कार्ड निवडावे.
  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज फॉर्म भरायचा आहे आवश्यक तपशिलासह सर्व माहिती भरून फॉर्म भरायचा आहे व सबमिट वर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संदर्भ क्रमांक मेल किंवा मेसेज केला जातो.
  • फॉर्म भरल्यानंतर मिळालेली पावती कागदपत्रांच्या सोबत तुम्हाला बँकेमध्ये जमा करावी लागते.
  • जर आपण या किसान कार्ड योजनेला पात्र असाल तर 15 दिवसाच्या आत तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळते.
  • ऑफलाइन अर्ज कसा करावा
  • यामध्ये आपल्याला प्रथम किसान क्रेडिट योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते. डाऊनलोड केसीसी फॉर्म बटन क्लिक केल्यानंतर केसीसी फॉर्म डाऊनलोड होतो.
  • तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढून त्यातील माहिती भरायची आहे. त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून आपल्याला पाहिजे त्या बँक शाखेत ते जमा करावे .
  • तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला थोड्याच दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

भारता मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना राबवणाऱ्या बँका:

  • अलाहाबाद बँक : किसान क्रेडिट कार्ड.
  • आंध्र बँक : ए बी किसान ग्रीन कार्ड.
  • बँक ऑफ बडोदा : बिकेसीसी. बँक ऑफ इंडिया : किसान समाधान कार्ड.
  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स :  ओरिएंटल ग्रीन कार्ड.
  • पंजाब नॅशनल बँक : पीएनबी कृषी कार्ड.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया : केसीसी. एचडीएफसी बँक : केसीसी.       ॲक्सिस बँक : केसीसी.
  • कॉर्पोरेशन बँक :केसीसी.
  • कॅनरा बँक : केसीसी.
  • सिंधिकेट बँक : एसकेसीसी. विजया बँक : विजया किसान कार्ड.

जिल्हा स्तरीय सहकारी बँकेत सुद्धा ही योजना राबवली जाते.परंतु बाकीच्या बँकेपेक्षा सहकारी बँकेत किसन क्रेडिट कार्ड कर्जाची प्रक्रिया वेगळी आहे.

या प्रक्रियेमध्ये बँक व शेतकरी यांच्यातील मधला दुवा ही सोसायटी असते.

ज्या शेतकऱ्याला किसन कार्ड कर्ज घ्यायचे आहे त्याला प्रथम सोसायटीचा सभासद व्हावे लागते  त्या नंतर सर्व कागदपत्रे सोसायटीत जमा करून सोसायटी मार्फत ते कर्ज प्रकरण बँकेत मंजुरीसाठी पाठवले जाते.

बँकेत कर्ज मंजूर झाले की, शेतकऱ्याला एक किसान कार्ड चे पुस्तक दिले जाते.

त्या पुस्तकावर क्षेत्र,त्या क्षेत्रानुसार मंजूर  रक्कम,कर्ज परत फेड दिनांक. तसेच हे वाटप खरीप पिकासाठी आहे की रब्बी पिकासाठी आहे याची नोंद असते. तसेच पुस्तकावर ज्या बँकेच्या अधिकार्याने कर्ज मंजूर केले आहे त्यांची सही असणे आवश्यक आहे.

या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर सभासद ते पुस्तक बँकेत जमा करतो व त्या नंतर कर्जाची रक्कम त्याच्या सेविंग च्या खात्याला वर्ग केली जाते.

सहकारी बँकेत किसन कार्डचे वाटप हे दोन टप्प्यात होत असते ते म्हणजे खरीप व रब्बी.

खरीप पिकाचे कर्ज वितरण दिनांक १ एप्रिल ते 30 सप्टेंबर. रब्बी पिकांचे कर्ज वितरण दिनांक एक ऑक्टोबर ते 31 मार्च या कालावधीत असते

जिल्हा सहकारी बँकेत सबल सभासद व दुर्बल सभासद असे कर्ज वाटप केले जाते. सबल सभासद म्हणजे ज्यांचे क्षेत्र पाच एकर पेक्षा जास्त असते व दुर्बल सभासद म्हणजे यांचे क्षेत्र पाच एकरच्या आत असते.

सबल व दुर्बल सभासदांचा व्याजदर हा संस्थेस 4% तर सभासदात 6% असतो.

जर सभासदाने मुदती नंतर कर्ज भरले तर ते व्याज संस्थेसाठी 9% व सभासदास 12 % असते.हे व्याज दंड व्याजासह भरावा लागतो. जर तीन लाखावर कर्ज असेल तर दंडव्याजाचा दर हा संस्थेसाठी 8% व सभासदास 11 % भरावे लागते.

खरिप कर्ज उचलले असेल तर,ते 31 मार्च च्या आत भरणे गरजेचे आहे.रब्बी कर्ज उचलले असेल तर ते कर्ज 30 नोव्हेंबर पर्यंत भरणे गरजेचे आहे.

शेतकरी जे व्याज भरतो ते नंतर त्याच्या सेविंग खात्याला थोड्या दिवसाने परत जमा होते. हे व्याज 2 % केंद्र सरकार 2% राज्य सरकार व 2% बँक भरत असते.

2019 साली महाविकास आघाडी सरकारने ज्या लोकांनी कर्जाची वेळेवर परत फेड केली आहे .त्यांना प्रोत्साहन रक्कम म्हणून 50000 हजार देण्यात येईल अशी घोषणा केली. त्या घोषणेची अंमलबजावणी 2022 साली झाली.आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 50000 रुपये जमा झाले असून अजून ती प्रोसेस कार्यपथावर आहे.

मी या लेखाद्वारे आपल्यापर्यंत किसान क्रेडिट कार्ड (kisan credit card) या कर्ज विषयी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल याची मला खात्री आहे.आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र परिवाराला नक्कीच शेअर करा.

धन्यवाद!!!

Leave a Comment