Information Of Share Market in Marathi: नमस्कार मित्रांनो, पैसा हा आज जगण्या मारण्याच महत्त्वाचं साधन बनलं आहे. पैसा आज जेवढा गरजेचा आहे तेवढेच भविष्यासाठीही पैशाची तजवीज करणे खूपच महत्त्वाचं झालं आहे.
मित्रांनो, भारतात अजूनही बहुतांश लोक असे आहेत जे फक्त दोन वेळच्या जेवणासाठीच धडपडतात. मात्र काही लोक असेही आहेत जे अगदी पुढील सात पिढ्यांसाठी देखील आर्थिक तजवीज करताना दिसून येतात. त्यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे “शेअर मार्केट”. अर्थातच “समभाग बाजार” होय.
मित्रांनो, गेल्या पाच दहा वर्षांपूर्वी शेअर बाजार म्हणजे आपण गुंतविलेल्या पैशांची नुकसान असा एक गैरसमज जनमानसात पसरलेला होता. मात्र मागील काही वर्षात शेअर बाजारात सर्व स्तरातील लोक उतरताना दिसत आहेत. या सर्वांसाठीच आपण आजच्या लेखामध्ये शेअर बाजाराबद्दल सर्व मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहोत.
यामध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय? या शेअर मार्केटमध्ये कोण कोण गुंतवणूक करू शकतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या काय पद्धती आहेत. डिमॅट अकाउंट म्हणजे काय ? शेअरचे प्रकार शेअर्समध्ये पैसे गुंतवताना घ्यावयाची काळजी व उत्तम शेअर्स कसा निवडावा इत्यादी मुद्द्यांवर माहिती बघणार आहोत. तरी हा लेख आपण शेवटपर्यंत वाचावा!!!
Table of Contents
Information Of Share Market in Marathi
शेअर मार्केट म्हणजे काय? हे आपण प्रथम समजून घेणार आहोत. शेअर मार्केटला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार असेही म्हटले जाते. प्रथम आपण शेअर व मार्केट या दोन शब्दांचा शाब्दिक अर्थ नीट समजून घेणार आहोत.शेअर म्हणजे हिस्सा /भाग व मार्केट याला आपण मराठीत बाजार असे म्हणतो.
जेथे वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. जसे की,आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट पाहावयास मिळतात.भाजी मार्केट ,मच्छी मार्केट, शूज मार्केट वगैरे. आता तुम्हाला समजलेच असेल की, मार्केट म्हणजे जिथे आपण वस्तू खरेदी करतो व विकतो.
शाब्दिक अर्थ बघितला तर शेअर बाजार ही एक सूचीबद्ध कंपनीतील भाग भांडवल किंवा हिस्सेदारी खरेदी किंवा विक्रीसाठी ठेवलेली जागा आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर येथे खूप कंपनीचे शेअर विकले जातात व घेतले जातात.
बऱ्याच लोकांना शेअर बाजार हा जुगार वाटत असतो. पण तसे नसून हा एक बुद्धिबळाचा डाव आहे .ज्याला समजलं त्यांनी कमावलं आणि ज्यांना नाही समजलं त्यांनी गमावलं!!!
एका सर्वेनुसार असे समोर आले आहे की, भारतात शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांचे प्रमाण फक्त 4 ते 7% आहे.
आर्थिक बाजारातील एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणून शेअर मार्केट बाजाराकडे पाहिले जाते.
या शेअर बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या हे आपले शेअर्स विकत असतात व गुंतवणूकदार ते शेअर्स खरेदी करत असतात.आपण जर एखाद्या कंपनीचे एक शेअर जरी विकत घेतला तर कंपनीत आपली हीस्सेदारी ही 1% असते.
एक सामान्य माणूस सुद्धा शेअर मार्केटच्या मदतीने मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी मिळवू शकतो.
आपण एखाद्या कंपनीत जेवढे पैसे लावू तेवढी त्या कंपनीत आपल्याला मालकी हक्क प्राप्त होत असतो.
जर भविष्यात त्या कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढतात व जर कंपनी तोट्यात गेली तर शेअरचे भाव कमी होत असतात. जर आपण शेअरचे भाव वाढले व त्यादरम्यान आपण आपले शेअर विकले तर आपल्याला नफा होतो.
शेअर बाजारात पैसे गुंतवणे ही एक खूप मोठी जोखीमच असते.त्यामुळे शेअर बाजारात पैसे गुंतवण्याच्या आधी त्याचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे.
शेअर चे प्रकार
शेअरचे तीन प्रकार आहेत.
1.इक्विटी शेअर.
स्टॉक्स एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध एखादी कंपनी आपले शेअर्स जारी करते तेव्हा त्याला इक्विटी शेअर्स असे म्हणतात. इतर शेअरच्या तुलनेत इक्विटी शेअर्स हे सर्वात जास्त विक्री केले जातात .कारण हे शेअर्स जवळपास सर्व कंपन्यांनी दिलेले असतात.
2. प्रेफेरन्स शेअर
इक्विटी शेअर व प्रेफेरन्स शेअर यामध्ये फारसा फरक नसतो. प्रेफरन्स शेअर होल्डर हा कंपनीच्या बैठकीत कधीही वोटिंग करू शकत नाही. कारण प्रेफेरन्स शेअर होल्डरला तेवढा हक्क नसतो. प्रेफेरन्स शेअर होल्डरला मिळणारा नफा हा आधीच निश्चित केलेला असतो. वर्षा अखेरीस त्याला तो मिळतो.
त्यामुळे प्रेफेरन्स शेअर हा इक्विटी शेअर पेक्षा वेगळा असतो.
3.डीव्हीआर शेअर.
डी व्ही आर शेअर हे इक्विटी आणि प्रेफेरन्स शेअर पेक्षा वेगळा असतो. कारण डी व्ही आर शेअर होल्डरला इक्विटी शेअर सारखेच फायदे मिळतात. परंतु त्यांना मतदानाचा हक्क मिळत नाही. डी व्ही आर धारक हे मतदान करू शकतात परंतु त्यांच्या मतदानाचा हक्क हा निश्चित असतो. ज्याला मतदानाचा हक्क दिला जाईल तिथेच डी व्ही आर शेअर होल्डर मतदान करू शकतात.
शेअर मार्केटमध्ये कोण कोण पैसे गुंतवू शकतो.
शेअर मार्केटमध्ये एखादा सामान्य व्यक्ती सुद्धा शेअर्स खरेदी करू शकतो. परंतु शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणे म्हणजे एक प्रकारची मोठी जोखीमच आहे. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरच आपण येथे पैसे गुंतवावे कारण जेव्हा कधी नुकसान होईल त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा जास्त परिणाम होणार नाही.
त्यामुळे प्रथम शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी
शेअर बाजारात पैसे गुंतवणे ही खूप मोठी जोखीम आहे.कारण
तुम्हाला तर माहीतच आहे की, 1992 मध्ये झालेला 1200 कोटी रुपये एवढा हर्षद मेहता घोटाळा व त्याच पाठोपाठ झालेला केतन पारेख 800 कोटी रुपये एवढा घोटाळा या दोन कारणांमुळे गुंतवणूकदारांचं खूप मोठे नुकसान झाले होते व त्या काळात शेअर बाजार ची विश्वासहर्ताही धोक्यात आली होती.
1992 मध्ये शेअर बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार पारदर्शक होण्यासाठी सेमी म्हणजे “सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया” या संस्थेची निर्मिती शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आली. तसेच शेअरही डिमॅट म्हणजे डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हायला लागले. त्यामुळे या व्यवहारातील धोका कमी झाला व शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार हे पारदर्शक झाले.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक ओळखता आला पाहिजे. ट्रेडिंग म्हणजे अल्पमुदतीसाठी शेअर्स खरेदी करणे म्हणजे बऱ्याचदा आपण एका दिवसासाठी एखाद्या शेअरची केलेली खरेदी/ विक्री. यामध्ये नफा मिळवण्याची शक्यता जरी असली तरी जोखीमही तितकीच असते. कारण का कधी कधीकाहीही होऊ शकते.एकतर नफा किंवा तोटा.
दीर्घ मुदतीत केलेली गुंतवणूक ही जास्त फायद्याची ठरते. त्यामुळे आपण जर प्रथम शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर ते पैसे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणे हे कमी जोखमीचे आहे. शेअर बाजाराचा पूर्ण अभ्यास नसेल तर, आपण तज्ञ लोकांचा किंवा ब्रोकरची मदतही घेऊ शकतो.
परंतु ब्रोकर किंवा संस्था विश्वासू तसेच नोंदणीकृत, जाणकार असणे आवश्यक आहे. असे बरेच ब्रोकर व संस्था आहेत जे आपल्याकडन योग्य ती फी आकारत असतात व त्या बदल्यात तुमच्यासाठी शेअर मधील व्यवहार स्वतः करत असतात किंवा कुठले शेअर घ्यायचे याचा सल्लाही देत असतात. त्यामुळे अशा संस्था किंवा व्यक्ती यांच्यात चांगला संवाद व विश्वास या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
त्यामुळे गुंतवणूक करताना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या दोघांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जर लवकरात लवकर नफा मिळवायचा असेल तर, इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे दीर्घ काळापर्यंत न ठेवता आपल्यात जर जोखीम घेण्याची क्षमता असेल तर,आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटही करू शकता. दुसरीकडे जर गुंतवणूकदार जास्त जोखीम घेण्यास तयार नसेल तर दीर्घ कालीन इन्वेस्टमेंटचा विचार करू शकतो.
शेअर मार्केटची माहिती ,शेअर मार्केट विषयीचे मार्गदर्शन, आजचा शेअर मार्केट ,कोणत्या कंपनीचे शेअर भाव वाढले आहेत किंवा घसरले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इकॉनोमिक टाइम्स, मिंट, फायनान्शियल एक्सप्रेस, बिझनेस स्टॅंडर्ड यांसारखी वर्तमानपत्रे वाचावी लागतात. तसेच आपण झी बिझनेस, सीएनबीसी, एनडीटीव्ही बिझनेस यांसारखे न्यूज चैनल देखील पाहून आपल्याला शेअर मार्केट विषयीच्या निगडित घडामोडींची बेसिक माहिती सुद्धा मिळते.
त्यामुळे आपण जर प्रथम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ती छोट्या रकमेने व लॉन्ग टर्म साठी करावी व जेव्हा आपल्याला शेअर मार्केट विषयी सर्व ज्ञान, माहिती व अनुभव वाढत जाईल तसे तसे आपण आपली गुंतवणूक व रक्कम वाढवू शकता.
डिमॅट अकाउंट म्हणजे काय?
शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी आपल्याला प्रथम एक डिमॅट अकाउंट बनवावे लागते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपले डिमॅट खाते असणे गरजेचे असते. कारण कंपनीला होणारा नफा तुमच्या बँक खात्यात न जाता तो डिमॅट खात्यात जात असतो. डिमॅट अकाउंट हे तुमच्या सेविंग खात्यासोबतच जोडलेले असते. तुम्हाला वाटले तर तुम्ही आपल्या डिमॅट अकाउंट मधून बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता.
हे डिमॅट अकाउंट आपण ब्रोकर म्हणजेच दलालाच्या माध्यमातूनही सुरू करू शकतो. डिमॅट खात्यात आपल्या शेअरचे पैसे ठेवले जातात. जसे तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे ठेवतात त्याचप्रमाणे या डिमॅट खात्यात शेअरचे पैसे ठेवले जातात. डिमॅट अकाउंट खोलण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेत सेविंग खाते असणे गरजेचे असते.
डिमॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
- पुराव्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड व आधार कार्ड द्यावे लागते. जेणेकरून तुमचा ऍड्रेस प्रूफ त्यांच्याकडे हवा असतो.
- बँक स्टेटमेंट
- बँक पासबुक.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
तसेच दुसरी पद्धत म्हणजे आपण कोणत्याही बँकेत जाऊन डिमॅट अकाउंट सुरू करू शकतो.
परंतु दुसऱ्या पद्धतीपेक्षा जर आपण पहिली पद्धत अवलंबली म्हणजे जर तुम्ही एखाद्या ब्रोकर कडून खाते खोलून घेतले तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. कारण त्यातून तुम्हाला एक चांगला सपोर्ट मिळेल व तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या आधारावर एक चांगली कंपनी देखील सुचवून, तुम्हाला तुमचे पैसे कुठे गुंतवायचे याचे मार्गदर्शनही मिळेल.
भारतामध्ये कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करायचे असेल तर, स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून करण्यात येते. भारतामध्ये मुख्य दोन स्टॉक एक्सचेंज आहेत.
1. BSE म्हणजेच याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( Bombay stock exchange) म्हणतात.BSE चा इंडेक्स हा sensex असतो. ज्यामध्ये 30 कंपन्या असतात.
2. NSE म्हणजेच याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National stock exchange) असे म्हटले जाते. NSE चा इंडेक्स Nifty असतो. ज्यात 50 कंपन्या असतात.
Nifty व Sensex यामुळे गुंतवणूकदाराला लक्षात येते की, ज्या टॉप 50 व 30 कंपन्या आहेत. त्या कशा पद्धतीने कार्य करत आहेत. ज्या कंपन्या चांगले काम करतात त्याचा परिणाम सरळ शेअर च्या किमतीवर पडतो.
शेअर बाजारात ब्रोकर हे स्टॉक एक्सचेंजचे सदस्य असतात. त्यामुळे फक्त ब्रोकर्स स्टॉक खरेदी विक्री करू शकतात. शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट ग्राहक ते कंपनी असा व्यवहार होत नाही. तुम्हाला जर शेअर विकत घ्यायचे असतील तर ,सर्वात आधी तुम्हाला एक शेअर ब्रोकरची आवश्यकता आहे।
ट्रेडिंग चे प्रकार
आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे ट्रेडिंग असतात.या ट्रेडिंग नुसार आपण आपले शेअर्स खरेदी करू शकतो.
1. इंट्रा डे ट्रेडिंग
या ट्रेडिंगमध्ये आपण एकाच दिवसात शेअर विकत घेऊन त्याच दिवशी मार्केट बंद होण्याच्या आधी ते विकावे लागतात. हे ट्रेडिंग फक्त एक्सपर्ट लोकांसाठी म्हणजे ज्यांना शेअर मार्केट बद्दल जास्त ज्ञान व माहिती असेल त्यांच्यासाठी आहे. जर तुम्ही प्रथमच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल म्हणजे तुम्ही नवीन असाल तर हा ट्रेड तुमच्यासाठी नाही.
2.स्कॅल्पर ट्रेडिंग
हे ट्रेडिंग खूप जोखमी चे असते. कारण या ट्रेडमध्ये आपण शेअर विकत घेतले तर ते 5 ते 10 मिनिटाच्या आत विकून टाकायचे असतात. जेव्हा एखाद्या देशात एखादा नवीन कायदा आल्यावर किंवा आर्थिक क्षेत्रात मोठी बातमी आल्यावर हा ट्रेड वापरला जातो.
3.स्विंग ट्रेडिंग / शॉर्ट टम ट्रेडिंग
या पद्धतीमध्ये शॉर्ट टर्म साठी आपण शेअर विकत घेत असतो. आपल्या अकाउंट मध्ये हे शेअर ट्रान्सफर केले जातात. काही महिने किंवा आठवडे शेअरची किंमत वाढण्याची प्रतीक्षा करत शेअर्स आपल्याजवळ ठेवले जातात व जेव्हा योग्य किंमत येईल तेव्हा ते विकून नफा मिळवला जातो .या प्रकारामध्ये जोखीम कमी असते.
4.लॉन्ग टर्म ट्रेडिंग
शेअर्स विकत घेऊन दीर्घकाळापर्यंत आपल्याजवळ ठेवण्याच्या पद्धतीला लॉंग टर्म ट्रेडिंग असे म्हणतात. गुंतवणूकदार हे शेअर्स सहा महिन्यापासून ते दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पर्यंत आपल्याजवळ ठेवतो .या कालावधीच्या दरम्यान जर कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली तर त्या गुंतवणूकदाराला चांगला नफा होतो ट्रेडिंगमध्ये जोखीम ही अतिशय कमी असते. नव्या गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म ट्रेनिंग मध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
या लेखाद्वारे आम्ही आपल्यापर्यंत शेअर मार्केट याविषयी सर्व माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे .
आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा.
धन्यवाद!!!