[संपूर्ण] मराठी लग्न मंगलाष्टके । Tulsi Vivah Marathi Mangalashtak | पूजा विधी

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये मराठी लग्न मंगलाष्टके बघणार आहोत. या मंगलाष्टका तुळशी विवाहात तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या धार्मिक विवाहात वापरल्या जातात. या लेखात आपण मराठी लग्न मंगलाष्टके । Tulsi Vivah Marathi Mangalashtak । तुळशी विवाह पूजा विधी इत्यादी माहिती बघणार आहोत.

मराठी लग्न मंगलाष्टके

महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीमध्ये माता-पिताच्या संमतीने होणाऱ्या धार्मिक पद्धतीच्या विवाहात वापरल्या जाणाऱ्या पद्यरचनांना मराठी लग्न मंगलाष्टके म्हणतात.

मंगलाष्टचि प्रथा प्रामुख्याने महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव केला जातो व त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके म्हटली जातात.

मंगलाष्टके म्हणजे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या संसारासाठी द्यावयाच्या आशीर्वाद पंक्ती आहेत.

मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना आहे. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते.

मात्र विसाव्या शतकापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याची परंपरा वधू-वराचे नातेवाईकांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे.

मंगलाष्टके

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।

गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।
शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।
पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।

लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।
गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।
अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।

रामो राजमणी सदा विजयते रामम्।
रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।
रामाय तस्मै नमः।
रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।
रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।

राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।
आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।
रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।

लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।
सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।
गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।

विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।
सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।
तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।

आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।
दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुछ मंगल सावधान।।८।।

तुळशी विवाह मंगलाष्टके

हि मंगलाष्टके तुम्ही तुळशी विवाहला (Tulsi Vivah Marathi Mangalashtak) सुद्धा वापरू शकता. तुळशी विवाह मंगलाष्टके ह्या मध्ये आपल्या नेहमीच्याच मंगलाष्टका वापरल्या जातात.

हि तुळशी विवाह मंगलाष्टके आम्ही इमेज फॉरमॅट मध्ये दिली आहेत.

तुळशी विवाहासाठी साहित्याची यादी

मुळा, आवळा, मनुका, रताळे, शिंगाडे, चिंचा, कोथिंबीर, पेरू आणि इतर हंगामातील फळं, मंडप तयार करण्यासाठी ऊस, भगवान विष्णूची मूर्ती, तुळशीचे रोप, धूप, दिवा, कपडे, हार, झेंडूचे फुले, श्रृंगार साहित्य, हळद, ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र, ओटी भरण्यासाठी साडी, चोळी, नथ, दागिने घालावे. मंगळसूत्र, जोडवी, खणा-नाराळ, मध, तीळ, एक कप दूध,

तुळसी विवाह विधि

 • घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवावे.
 • तुळशी वृंदावन तसेच कुंडीला रंगवून त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढावे.
 • फ्लॅट संस्कृतीत अनेकांनी तुळशीला आपल्या बाल्कनीत जागा दिली असून त्या ठिकाणीच लग्नाची तयारी केली तरी चालेल.
 • तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवावे.
 • तुळशी समोर छान रांगोळी काढावी.
 • तुळशीला नवरीसारखे सजवावे.
 • तुळशीच्या रोपट्याला तुम्ही साडी देखील नेसावी शकता. तसेच तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने देखील घालू शकता.
 • सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरा. दुधात तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार करावे.
 • मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावावा.
 • चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करावी.
 • तुळशीला आणि शाळीग्रामला हळद लावावी. बनवलेल्या मंडपावरही हळदीची पेस्ट लावावी. लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुलसीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवावी.
 • यजमानाने म्हणून श्रीकृष्णाची पत्नीसोबतची मुर्ती उत्तराभिमुख आसनावर ठेवावी. गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे.
 • मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.
 • दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते.

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा तुळशी विवाह मंगलाष्टके लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

1 thought on “[संपूर्ण] मराठी लग्न मंगलाष्टके । Tulsi Vivah Marathi Mangalashtak | पूजा विधी”

 1. चांगली माहीती आहे आपल्या मराठी भाषा मध्ये तुळशी विवाह वरती

  Reply

Leave a Comment