Mahashivratri 2024 : महादेवाची पूजा कशी करावी, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि आरती

Mahashivratri 2022 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री व्रत केले जाते. यंदा महाशिवरात्री मंगळवारी म्हणजेच ०१ मार्च रोजी आहे. भगवान भोलेनाथाची पूजा आणि महाशिवरात्रीचे व्रत याला विशेष महत्त्व आहे. येथे जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि त्याचे महत्त्व

Mahashivratri 2022 पूजा विधि: शिवाची पूजा कशी करावी


महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगात चंदनाची पेस्ट लावून शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे.

दिवा आणि कापूर लावा.

पूजा करताना ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा.

शिवाला बिल्वची पाने आणि फुले अर्पण करा.

शिवाची पूजा केल्यानंतर शेणाच्या पोळीचा अग्नी जाळून तीळ, तांदूळ आणि तूप यांचा मिश्र नैवेद्य दाखवावा.

घरी आल्यानंतर कोणतेही एक संपूर्ण फळ नैवेद्य म्हणून अर्पण करावे.

सामान्यतः लोक सुक्या नारळाचा नैवेद्य देतात.

शिवपुराणातील कथा – Mahashivratri 2022

एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला

‘हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली.

दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.

सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली.

हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’

त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’

ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.

देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला.

सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . . . .

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम

शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी स्नान करूनच भाविकांनी पूजा करावी किंवा मंदिरात जावे.

रात्री भगवान शंकराची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून उपवास सोडावा.

व्रताचे पूर्ण फळ मिळण्यासाठी भक्तांनी सूर्योदय आणि चतुर्दशी तिथीच्या दरम्यानच उपवास संपवावा.

परंतु, दुसर्‍या मान्यतेनुसार उपवास संपण्याची नेमकी वेळ चतुर्दशी तिथीनंतर सांगितली आहे.

दोन्ही संकल्पना परस्परविरोधी आहेत. परंतु, असे मानले जाते की शिवपूजा आणि पारण (उपवासाची समाप्ती) दोन्ही चतुर्दशीच्या तारखेपूर्वी कराव्यात.

रात्रीच्या चारही टप्प्यात शिवपूजा करता येते

शिवरात्रीची पूजा रात्री एक किंवा चार वेळा करता येते. रात्रीचे चार प्रहार असून प्रत्येक प्रहारात शिवपूजा करता येते.

समर्थ रामदास स्वामी रचित शंकराची आरती :


“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥”

Please visit : Isha Foundation To Celebrate Biggest Festival Of India ‘Mahashivratri 2022’

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

3 thoughts on “Mahashivratri 2024 : महादेवाची पूजा कशी करावी, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि आरती”

Leave a Comment