ganpati stotra in marathi । गणपती स्तोत्र मराठी । गणपती स्तोत्र संस्कृत | Ganpati Stotra lyrics | गणपती स्तोत्र डाऊनलोड | गणपती संकटनाशन स्तोत्र | ganpati stotra marathi pdf | Vakratunda Mahakaya stotra
गणपती स्तोत्र हि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची स्तुती करणारी संस्कृत काव्यपंक्ती आहे. खाली आम्ही संपूर्ण गणपती स्तोत्र मराठीमध्ये (ganpati stotra in marathi) दिले आहे, ते तुम्ही वाचू शकता किंवा कॉपी करू शकता.
Table of Contents
गणपती स्तोत्र मराठी । ganpati stotra in marathi
जय जयाजी गणपती। मज द्यावी विपुल मती।
करावया तुमची स्तुती। स्पुर्ती द्यावी मज अपार।।०१।।
तुझे नाम मंगलमूर्ती। तुज इंद्र-चंद्र ध्याती।विष्णू शंकर तुज पूजिती। अव्यया ध्याती नित्य काळी।।०२।।
तुझे नाव विनायक। गजवदना तू मंगल दायक।सकल नाम कलिमलदाहक। नाम-स्मरणे भस्म होती।।०३।।
मी तव चरणांचा अंकित। तव चरणा माझे प्रणिपात।देवधीदेवा तू एकदंत। परिसे विज्ञापना माझी।।०४।।
माझा लडिवाळ तुज करणे। सर्वापरी तू मज सांभाळणे।संकटामाझारी रक्षिणे। सर्व करणे तुज स्वामी।।०५।।
गौरी पुत्र तू गणपती। परिसावी सेवकाची विनंती।मी तुमचा अनन्यार्थी। रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया।।०६।।
तूच माझा बाप माय। तूच माझा देवराय।तूच माझी करिशी सोय। अनाथ नाथा गणपती।।०७।।
गजवदना श्री लम्बोदरा। सिद्धीविनायका भालचंद्रा।हेरंभा शिव पुत्रा। विघ्नेश्वरा अनाथ बंधू।।०८।।
भक्त पालका करि करुणा। वरद मूर्ती गजानना।परशुहस्ता सिंदुरवर्णा। विघ्ननाशना मंगलमूर्ती।।०९।।
विश्ववदना विघ्नेश्वरा। मंगलाधीषा परशुधरा।पाप मोचन सर्वेश्वरा। दिन बंधो नाम तुझे।।१०।।
नमन माझे श्री गणनाथा। नमन माझे विघ्नहर्ता।नमन माझे एकदंता। दीनबंधू नमन माझे।।११।।
नमन माझे शंभूतनया। नमन माझे करुणांलया।नमन माझे गणराया। तुज स्वामिया नमन माझे।।१२।।
नमन माझे देवराया। नमन माझे गौरीतनया।भालचंद्रा मोरया। तुझे चरणी नमन माझे।।१३।।
नाही आशा स्तुतीची। नाही आशा तव भक्तीची।सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची। आशा मनी उपजली।।१४।।
मी मूढ केवल अज्ञान। ध्यानी सदा तुझे चरण।लंबोदरा मज देई दर्शन। कृपा करि जगदीशा।।१५।।
मती मंद मी बालक। तूच सर्वांचा चालक।भक्तजनांचा पालक। गजमुखा तू होशी।। १६।।
मी दरिद्री अभागी स्वामी। चित्त जडावे तुझिया नामी।अनन्य शरण तुजला मी। दर्शन देई कृपाळुवा।।१७।।
हे गणपती स्तोत्र जो करी पठण। त्यासी स्वामी देईल अपार धन।विद्या सिद्धी चे अगाध ज्ञान। सिंदूरवदन देईल पै।।१८।।
त्यासी पिशाच भूत प्रेत। न बाधिती कळी काळात।स्वामीची पूजा करोनी यथास्थित। स्तुती स्तोत्र हे जपावे।।१९।।
होईल सिद्धी षड्मास हे जपता। नव्हे कदा असत्य वार्ता।गणपती चरणी माथा। दिवाकरे ठेविला।।२०।।
।। इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण।।
Ganapati Stotra PDF Marathi
Download Ganapati Stotra PDF Marathi – खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून तुम्ही गणपती स्तोत्र डाऊनलोड करू शकता.
या बटन वर क्लिक केल्यावर तुम्ही ड्राईव्ह वर जाल जिथे आम्ही Ganapati Stotra PDF Marathi दिली आहे, उजव्या कोपऱ्यातल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.
खाली आम्ही नारदमुनींनी रचलेले गणपती स्तोत्र दिले आहे. या स्तोत्रांमधे गणपतीची बारा नावे दिली आहेत.
नारद मुनींनी रचलेले गणपती स्तोत्र
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||
नारदमुनींनी रचलेले श्री गणपती स्तोत्र संस्कृतमध्ये
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।१।।प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥
गणपती स्तोत्र चा अर्थ । Meaning of Ganpati Stotra
पार्वती पुत्र श्री गणेश जी यांना नमन करा. आणि मग आपले वय, इच्छा आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी भक्तिने त्यांना नियमित स्मरण करा.
पहिला वक्रतुंड (वाकलेला चेहरा असलेला), दुसरा एकदंत (एक दात असलेला), तिसरा कृष्ण पिंगाक्ष (काळा आणि तपकिरी डोळे असलेला), चौथा गजावक्र (हत्तीचा चेहरा).
पाचवा लंबोदरा (मोठा पोट), सहावा विकास (दुर्बल), सातवा विघ्नराजेंद्र (अडथळ्यांचा राजा) आणि आठवा धुम्रवर्ण (राखाडी रंगाचा).
नववा भालचंद्र (ज्याच्या कपाळावर चंद्र सुशोभित झाला आहे), दहावा विनायक, अकरावा गणपती आणि बारावा गजानन.
या बारा नावांपैकी तीन संध्यामध्ये जन्मलेला व्यक्ती (सकाळ, मध्यरात्री आणि संध्याकाळ) मी परमेश्वराची स्तुती करतो. त्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणीची भीती नाही, या प्रकारचे स्मरण सर्व कर्तृत्ववान आहे.
यामुळे शिक्षणाची इच्छा, संपत्तीची इच्छा, एका मुलाचा मुलगा आणि मुमुक्षु मोक्ष प्राप्त करतो.
जर तुम्ही या गणपती स्तोत्राचा जप केला तर तुम्हाला सहा महिन्यांत इच्छित परिणाम मिळेल. आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी मिळते याबद्दल शंका नाही .
जो माणूस हे लिहितो आणि आठ ब्राह्मणांना शरण जातो गणेश जीच्या कृपेने त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होते.
तुमचे काही प्रश्न व त्यांची उत्तरे :
गणपती स्तोत्र कोणत्या ऋषींनी लिहिले?
श्री गणपती स्तोत्र हे नारद मुनि यांनी तयार केला आहे. व त्याचा अनुवाद हा श्रीधर स्वामी यांनी केला आहे.
गणपती स्तोत्र का जपले जाते?
गणपती स्तोत्राला संकटनाशक स्तोत्र म्हटले जाते. गणपती देखील भक्तांची विघ्ने दूर करणारा विघ्णहर्ता आहे. त्यामुळे या स्तोत्रमचे पठण करून, एखादी व्यक्ती शेवटच्या काळापर्यंत त्यांच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकते असे म्हटले जाते.
गणपती स्तोत्र जप करण्यासाठी उत्तम वेळ कोणता?
गणपती स्तोत्र हे अंघोळ केल्यांनतर पहाटेच्या वेळी म्हटले जाते.
गणपती स्तोत्र जप केल्याचे फायदे?
गणपती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने तुमचे मन शांत होते.
तसेच आयुष्यातील वाईट गोष्टी दूर होतात.
गणपती स्तोत्राचे पहाटेच्या वेळी पठण केल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होते.
हे पण वाचा : 108 Ganpati names in marathi | गणपतीची नावे व अर्थ मराठीमध्ये
1 thought on “संपूर्ण गणपती स्तोत्र मराठी [PDF] । ganpati stotra in marathi”