[30+]आई वर सुंदर कविता | चारोळी | Aai Kavita In Marathi

Aai Kavita In Marathi । आई वर चारोळी । Aai var charoli | आई वर सुंदर कविता | आई वर दुःखद कविता | आई शायरी मराठी | आई स्टेटस मराठी | aai quotes in marathi | Aai Status In Marathi | Quotes on mother in marathi | marathi kavita aai | आईवरील मराठी कविता


जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई. आपण हे जग पाहिले ते केवळ आपल्या आईमुळेच. तुम्ही कसेही असाल तरी या जगात तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आईच असते.

आज आपण अशाच खूप सुंदर आणि प्रेमळ अशा आई वर कविता/चारोळी बघणार आहोत.

आई वर प्रेमळ कविता । Aai Kavita In Marathi

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.

डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.

आणि…

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.

करावे किती आई तुझे कौतुक
अपुरे पडती शब्द हे माझे ❣
नाही फेडू शकत
उपकार आई तुझे ।। 🙏
अमृतासमान मला तू
पाजला ग पान्हा
जसे मांडीवर यशोदा आईच्या ❣
श्री कृष्ण बाळ तान्हा ।।
सर्व अवगुणांचा माझ्या
केलास आई तू विलय
होतात माझे सर्व गुन्हे माफ 🙏
असे आई तुझे न्यायालय ।।
आई तुझ्या कुशीतली गाढ झोप ❣
संपूर्ण संसारात नाही
पुढचे सातही जन्म तुझ्या गर्भात मिळो
मी एवढीच वाट पाही ।। 👪
असे वाटते मजला
जगावे पुन्हा येऊनी तुझ्या मी पोटी ❣
तुझ्याविना सर्वच दुनिया
मला वाटे खोटी ।।
आई तूच माझ्या आयुष्याची 🙏
बदललीस ग काया
साष्टांग नमन करुनी ❣
पडतो आई मी तुझ्या पाया ।।
प्रेम तुझे आहे आई
या सर्वांहून भारी
म्हणूनच म्हणतात ❣
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी ।।🙏

अधिक : 200+ Poems On Mother in Marathi | आई वर सुंदर चारोळी/कविता  &  शायरी 2022

 माय असते मंदिराचा उंच कळस
माय असते अंगणातली पवित्र तुळस ❣
माय असते भजनात पवित्र अशी संतवाणी
माय असते वाळवंटात प्यावे थंडगार पाणी 🙏

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी…

आई
असते हास्य नेहमी तीच्या मूखी,
राबते ती दिवसरात्र ठेवित सगळ्यांना सूखी;
आहे ती प्रत्येकाची पहिली गुरु आणि सखी,
तिच्या शिवाय जगात नाही कोणी सुखी !!
दुसऱ्याचे हितगुज हेच तिच्या ध्यानी,
प्रेमाचा मोठा साठा असतो तिच्या मनी;
चांगल्या संस्कारांची आहे ती ज्ञानी,
तिच आहे खरी जगत जननी !
चूका झाल्यास लावते ती चापटी,
कारण यशस्वी बनवण्यासाठी असते ती खटापटी;
तिच्या या निस्वार्थ मायेला नसते कधीच सुट्टी,
म्हणून किमान दररोज द्यावी तीला एक प्रेमाची मिठ्ठी !!

आई म्हणजे आई असते
तिला सर्वां गोष्टींची घाई असते
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते
न केलेले प्रश्न सोडवण्यातही सक्षम असते
वेड्यासारखं वागल्यावर, ऐवढी अक्कल कशी नाही म्हटते
वळण लावण्यासाठी दोन-चार धपाटेही देते
आपण रागाने झोपी गेलो की नकळतच डोक्यावरुन हात फिरवते
स्वत:च्या वागणुकीची मनातल्या मनातच माफी मागते
गुपचुपच मित्र-मैत्रीणींसोबत सिनेमाला जायची परवानगी देते
सांगून बाहेर पडलो तरी वाट बघत असते
पोट भरलं असलं तरी घास भरत असते
आपल्याला काळजीत बघून तळमळ असते
आजारी झाल्यावर स्वत: डॉक्टर होऊन बसते
वेदनामुळे नुसत आईईई शब्द काढला की लगेच हजर असते
आपण जागे असलो तर तिची पापणी लागत नसते
फोनवर असलो तर ती आपल्याकडे लगेच कान करते
आपण खूश असलो तर कारण न जाणून घेता स्वत: ही हसते
यश मिळाल्यावर अश्रु भरलेल्या डोळ्याने भरभरुन बघते
जवळ असो वा दूर जीव आपल्यात अडकून ठेवते
मर्जीविरुद्ध किती तरी निर्णयांना प्रेमापोटी होकार देते
काही विस्टकले की वडिलांच्या तापटपणाच्या आचेपासून वाचवते
पुढल्या वेळी असे करु नको म्हणत पांघरुण घालते
आपली आवड-नाआवड तिला तोंडी पाठ असते
किती जरी मोठे झालो तरी आपल्यातच गुंतलेली असते
नि:स्वार्थ प्रेम आणि नातं काय हे तिच्याकडून शिकायला मिळते
खरंच आई ही देवाहून मुळीच कमी नसते
आई म्हणजे खरंच आई असते

आई वर कविता

आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

आईच्या शब्दातच माया आहे
ती मृदु मुलायम, जणु देवची काया आहे
ती पावसाची पहिली धार आहे
ती देवाच्या गळ्यातला फुलांचा हार आहे
आईच्या रुपात देव जणु वरुन येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

माझ्या डोळ्यातले अश्रु, तिच्या डोळ्यात जमा होतात
माझे सारे अपराध, तिच्या मिठीत क्षमा होतात
तिच्या पदराला नेहमी माझा गंध येतो
अन माझ्या भवती तिला आनंद येतो
एवढा मायेचा पाझर कुठून येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

तिच्या प्रेमला तोड नाही
तिच्या माये एवढी कुठलीच गोष्ट गोड नाही
माला न समजनार, ती एक कोड आहे
माझ्या प्रेमात तिच मन वेड आहे
प्रेमाच्या लढाईत देव ही हारून येतो
आई म्हणताच गळा भरून येतो
अश्रुंचा पुर जणु खुप दुरुन येतो

आई असेल सोबतीला

तर विष सुद्धा अमृत होईल,

आई नसेल सोबतीला

तर सावलीत सुद्धा चटके देईल

मुंबईत घाई
शिर्डीत साई, फुलात जाई
गल्लीगल्लीत भाई
पण जगात भारी
केवळ आपली आई!

आई, 

तू कवितेचं अधीर पदार्पण, 

अन् माझ्या शब्दांची निवृत्ती, 

तू गवसलेलं प्रगल्भ अवधान, 

मी तुझी अवखळ आवृत्ती!

हे नक्की वाचा : माझी आई मराठी निबंध | Marathi Essay On My Mother

आई” एक नाव ..,
जगावेगळा भाव …
“आई” एक जीवन..,
प्रेमळ मायेच लक्षण…
“आई” एक श्वास..,
जिव्हाळ्याची रास…
“आई” एक आठवण..,
प्रेमाची साठवण…
“आई” एक वाट..,
आयुष्यातील सर्वात पहिली गाठ…
“आई” एक गोड नांत..,
बहरणारया जीवनाची हिरवी पात…
“आई” एक.. न संपणारी ठेव..,
जीवापाड जपणारी एकमेव…
“आई” एक घर..,
वात्सल्याची सर…
“आई”…नेहमी तुझ नाव घेताना
नेहमी येतो मला हुंदका..,,
तू दिलेल्या जिवनाच ऋण
फेडू शकेल मी का…

Aai Kavita In Marathi

आई वर दुःखद कविता । Aai Kavita In Marathi

 आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣
आई आकांत श्वासांत शांतता कुजबुज जीवन माझे
आई विन शुन्य आसपास मावळे काळोख जीवन माझे 🙏
आई असता जवळ भासे आकाश जवळ माझे
आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣
आई आहे असेल असणार कुणी शब्द तोडिले माझे
आई का अपराध असा ईश्वराचा का तेज लपवती माझे 🙏
आई अश्रुंची अभेद्य चौकट चित्रपुराण माझे
आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣

किती वर्ष झाली
गेली जरी माय
परी तिची सय
जात नाही

घरासाठी तिने
काया झिजवली
तक्रार न केली
कधी काही

अवघे सहज
नच ठरवून
प्रेमाने भरून
दिले आम्हां

नच घडविले
संस्कार सांगून
अवघे जीवन
हेची गुरु

असे वागायचे
हे न करायचे
नव्हते शब्दांचे
काही काम

वाट्या आले जैसे
तिने ते जीवन
आनंदे जगून
दाखविले

दुःखाचे चटके
सोसले हसत
नच सुस्थितित
गर्व केला

आणि मृत्यू रोगी
लढली खंबीर
मानली न हार
कदापीही

भोगियले दु:ख
वेदना अनेक
अश्रू परी एक
न दाविला

तिची ती दुर्दम्य
जिगीषा पाहून
मृत्यूही लपुनी
हळू आला

सोबत अजून
तिच्या आठवणी
जणू ती होवुनी
वावरती

मज संभाळती
हळू निजवती
चुकता दावती
मार्ग कधी

हवी ती शिक्षा
देवा कुणा देई
कधी पण आई
नेवू नको

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

एका आईची अंतयात्रा..😣

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..

कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..

तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..

मान खाली घालशील
शरमेने..

खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..

किणार्‍यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..

हे करतांना क्षणभर का होईनात
पण..

आठवेल का रे तुला
माझा खांदा..?

घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..

तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?

सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..

जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..

माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही

आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले
तुझ्या स्पर्शासाठी ते खूप आज रडले !!
तुझ्या मायेच्या सागराने मला
कधी वादळ तर कधी किनारे दाखवले !!
तुझ्याच छायेत माझे घर असू दे
असे नेहमीच वाटायचे
तू जवळ नसताना मनात काहूर माजायचे !!
आज तुला सोडून मी जगायला शिकतोय
एकटे पडलो इथे सगळेच मला डिवचतात !!
सांगायची तू कथा मी अर्थ आज जाणतोय
नसतो कुणी आपले हे मी खरचं पहातोय !!
जवळ करतात इथे आणि दरीमध्ये सोडतात
जीव कधी जाईल ह्याची ते वाटच पाहतात !!
आई मला घे जवळ मला सोबतच राहू दे
तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे !!
धन्य झालो मी जी तू मला भेटलीस
असे वाटतं देवांशीच मैत्री मी गाठली …. !!
आई !! तू आहेस माझी आई !!


तुम्हाला ह्या आई वर कविता (Aai Kavita In Marathi) कशा वाटल्या ते कमेंट करून कळवा.

1 thought on “[30+]आई वर सुंदर कविता | चारोळी | Aai Kavita In Marathi”

Leave a Comment