शब्दाची शक्ती : सोलोमन बेटांची कथा

शब्द हे खूप ताकतीचे असतात एकाद्या माणसाला जो ते करू शकत नाही त्याला प्रेरणा देऊ शकतात, एकाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतात, एखाद्याला दुःख देऊ शकतात, तर एकाद्या झाडाला मारू देखील शकतात.

होय तुम्ही बरोबर ऐकलं सोलोमन बेटावरचे लोक काही याच शब्दांचा वापर करून एकाद्या वृक्षाला मारण्यास सक्षम आहेत. आज पोस्ट द्वारे आम्ही सोलोमन लोकांची प्रसिद्ध कथा घेऊन आलोय तरी शेवटपर्यंत नक्की वाचा.

सोलोमन बेटांची कथा :

सोलोमन बेटे ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) भागात जवळजवळ ९०० छोट्या बेटांनी बनलेला असून हा एक स्वतंत्र देश आहे ज्याची ६.५ लाख लोकसंख्या आहे.

तर आपण मुख्य मुदयावर येऊया – गोष्ट अशी आहे की या बेटांवरचे लोक एखाद खूप जाड खोड असलेले झाड जर तोडायचे असेल तर अशा वेळेस सर्व गावकरी एकत्र येऊन त्या झाडाला मोठ्या आवाजात शाप देतात, असे जवळजवळ ३० दिवस म्हणजेच महिनाभर चालते, बघताबघता काहीच दिवसात ते झाड वाळून जाते व मरते.या युक्तीतिचा वापर करून आम्ही कोणतेही वृक्ष निर्जीव करू शकतो असा इथल्या लोकांचा विश्वास आहे.

जर तुम्ही अमीर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट पहिला असेल तर तुम्ही हि कथा अमीर खान बोलताना नक्कीच पहिले असणार.

या मागील सत्य?

या क्रियेला होताना बऱ्याच स्थानिक रहिवास्यांनी पहिले आहे आणि त्यांनाही यावर विश्वास बसत नव्हता. 

या कथेला कोणतीही वैज्ञानिक मान्यता नाही तरीही बऱ्याच तज्ञांनी यावर आपले विचार मांडले आहेत पण ब्रुस लिप्टन यांचे मत सर्वात जास्त प्रसिद्ध झाले. ब्रुस लिप्टन यांच्या म्हणण्यानुसार, हा चमत्कार नव्हे तर आपल्या अवचेतन(सुप्त) मनाची अनंत शक्ती आहे.

२५०० वर्षांपूर्वी महात्मा बुद्ध म्हणलेले 

(we are what we think) आपण जो विचार करतो ते आपण असतो

जर एखाद्या माणसाला आपण सारखी टीका करत राहिलो/ त्याच्या मनाला लागेल अस बोलत राहिलो तर ती व्यक्ती याबद्दल सतत विचार करत राहणार त्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येणारच.

जे कि आपण बऱ्याच ठिकाणी अनुभवले देखील असे पण कधी यावर लक्ष देऊन विचार नसेल केला.

कशी वाटली तुम्हाला आमची हि पोस्ट आवडली ना? जर आवडली असेल तर नक्की खाली दिलेल्या कंमेन्ट बॉक्स मध्ये कळवा.

धन्यवाद!

Leave a Comment