नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.
निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे
१) हस्ताक्षर सुंदर असावे
२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट
३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.
४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.
सूर्य
सूर्य हा पृथ्वी जवळ असणारा तप्त वायूचा गोळा आहे. लहान हनुमानाला तरी तो चेंडूच वाटला म्हणून त्याला पकडण्यासाठी बालहनुमानाने आकाशात झेप घेतली अशी कथा सांगितली जाते. सूर्यापासून आपणास उष्णता आणि प्रकाश मिळतो. तो आपल्यापासून खूप दूर असूनही आपणास त्याचा फायदा होतो. सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे आपणास धोकादायक असतात. त्यापासून त्वचेचे रोग होऊ शकतात.
सूर्याच्या उष्णतेचा व प्रकाशाचा आपणास खूपच फायदा होतो. परंतु आपण मात्र त्यांचा कपडे, पापड, धान्य वाळविणे एवढ्यापुरताच मर्यादित फायदा घेतो. हल्ली संशोधकांनी सूर्याच्या उष्णतेवर चालणाऱ्या सूर्यचूली, सौरतापके यांचा शोध लावला आहे. पण तो वापर त्याच्याकडून मिळणाऱ्या उर्जेच्या मानाने नगण्य आहे. वनस्पती मात्र सूर्याच्या प्रकाशात उष्णतेचा वापर करुन स्वतःचे अन्न बनवितात.
पृथ्वी आणि इतर ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असतात. त्यांचा फिरण्याचा मार्ग लंबगोलाकार असुन ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. परंतु आपणास सूर्योदय आणि सूर्यास्त झाल्याप्रमाणे वाटते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस व रात्र निर्माण होतात. सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू निर्माण होतात.
सर्व सजीवसृष्टिला सूर्यापासून उर्जा मिळते. आपण सूर्याशिवाय जगू शकत नाही. ऋतु प्रमाणे सूर्याचा प्रकाश व उष्णता कमी अधिक भासत असते. पण ती आपल्या जगण्यासाठी उपयोगी असते. सूर्यप्रकाशा अभावी मुडदूस, बेरीबेरी यासारखे रोग होतात. सूर्यप्रकाशात “ड” जीवनसत्व असते. सूर्याची नावे घेऊन विशिष्ट प्रकाराने सूर्यनमस्कार घालणे हा एक पारंपरिक व्यायाम प्रकार आहे. पुर्वीपासून सूर्याला देवता मानून पुजले जाते. सुर्याय नमः
तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!