[2024] द्रौपदी मुर्मू यांची संपूर्ण माहिती | Draupadi Murmu Information in Marathi

Draupadi Murmu Information in Marathi | द्रौपदी मुर्मू यांची संपूर्ण माहिती | Draupadi Murmu Biography in Marathi | द्रौपदी मुर्मू यांचा जीवन परिचय | द्रौपदी मुर्मू यांचे ट्विटर अकाउंट । Draupadi Murmu: Twitter Account | 2022 ची राष्ट्रपती निवडणूक | द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकीर्द | द्रौपदी मुर्मू यांचे कुटुंब । Draupadi Murmu Family | द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण


या आर्टिकल मध्ये आपण भारताच्या नवीन राष्ट्रपतीपदासाठी उभ्या राहिलेल्या द्रौपदी मुर्मू यांची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

२४ जुलै २०२२ रोजी सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती कार्यकाळ संपणार आहे. द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पार्टी कडून राष्ट्रपती पदासाठी उभ्या असलेल्या नवीन उमेदवार आहेत.

द्रौपदी मुर्मू या अनुसूचित जातीमधील आदिवासी समाजातून येतात. त्या मूळच्या ओडिसा राज्याच्या मयूरभंज या जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचा जीवन परिचय – Droupadi Murmu Information in Marathi

पूर्ण नावद्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)
वडिलांचे नावबिरांची नारायण टुडू
भाऊबहीणभागात टुडू
सारणी टुडू
नवऱ्याचे नावश्याम चरण मुर्मू
मुलेमुलगी – इतिश्री मुर्मू
मुलगा – लक्ष्मण मुर्मू (मृत्यू – २००९)
शाळाके.बी. एच एस उपरबेडा स्कुल, मयूरभंज
कॉलेजरमा देवी वुमन्स कॉलेज, भुवनेश्वर, ओडिशा
पक्षभारतीय जनता पार्टी
व्यवसायराजनीतिज्ञ
जन्म तारीख20 जून 1958
वय64 वर्ष
जन्मठिकाणमयूरभंज, उड़ीसा, भारत
वजन74 किलो
उंची5 फिट 4 इंच
जातअनुसूचित जनजाति
धर्महिंदू
संपत्ति10 लाख
भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश1997

द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण व सुरुवातीचे जीवन

द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिसा राज्याच्या मयूरभंज या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण के.बी. एच एस उपरबेडा स्कुल, मयूरभंज या शाळेत झाले. व त्यांनी रमा देवी वुमन्स कॉलेज, भुवनेश्वर, ओडिशा या कॉलेज मधून आपली डिग्री संपादन केली.

द्रौपदी मुर्मू यांच्याकडे शालेय जीवनापासून नेतृत्वगुण होता. त्यांनी कॉलेज पूर्ण केल्यांनतरहि अनुसुचित जाती-जमातीसाठी खूप काही काम केले. नंतर त्या रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. व नंतर भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली.

द्रौपदी मुर्मू यांचे कुटुंब । Draupadi Murmu Family

द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू असे आहे. व त्यांना एक भाऊ व एक बहीण आहे, ज्यांची नावे भागात टुडू व सारणी टुडू अशी आहेत.

त्यांच्या नवऱ्याचे नाव श्याम चरण मुर्मू असे आहे. व त्यांना दोन अपत्ये होती. त्यातील लक्ष्मण मुर्मू या त्यांच्या मुलाचा मृत्यू २००९ साली झाला. व त्यांना आता एकाच मुलगी आहे जिचे नाव इतिश्री मुर्मू असे आहे.

द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकीर्द

द्रौपदी मुर्मू ह्या राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी शिक्षिका होत्या. नंतर 1997 मध्ये त्या रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. व त्यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही निवड झाली.

त्यांनी नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री, व राज्यपाल अशा बऱ्याच राजकीय पदांवर काम केले आहे.

द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री होत्या. त्यांनी 2000 ते 2009 या ९ वर्षाच्या काळामध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून देखील काम केले आहे.

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री होत्या.

तसेच 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे.

2007 मध्ये त्यांना ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून ओडिशा विधानसभेने ‘नीलकंठ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

त्या झारखंड च्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या तसेच आदिवासी नेत्या देखील होत्या. 18 मे 2015 पासून ते 12 जुलै 2021 पर्यंत असा त्यांचा कालखंड होता.

द्रौपदी मुर्मू यांनी भूषवलेली महत्त्वाची पदे

  • झारखंडच्या 9 व्या राज्यपाल : 18 मे 2015 ते 12 जुलै 2021
  • ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2004)
  • ओडिशा सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004)
  • ओडिशा विधानसभेच्या सदस्या – आमदार : (2000 ते 2009)
  • अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा
  • नगरसेविका

2022 ची राष्ट्रपती निवडणूक

जून २०२२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहेत. तसेच २४ जुलै २०२२ रोजी सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नवीन राष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून द्रौपदी मुर्मू यांचे नाव सुचवण्यात आले आहे.

राष्ट्रपती पदासाठी ज्या निवडणूक होतात त्यामध्ये लोकसभा व विधानसभा यामधील आमदार व खासदारांची मते घेतली जातात. व भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षांची देशात आमदार व खासदारांची संख्या जास्त असल्यामुळे द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती बनण्याची शक्यता जास्त आहे.

जर द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकतात तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती बानू शकतात. या अगोदर प्रतिभाताई देवीसिंग पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

द्रौपदी मुर्मू यांचे ट्विटर अकाउंटDraupadi Murmu: Twitter Account

जर तुम्हाला द्राउपदी मुर्मु यांना ट्विटरवर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या हँडल वर जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

 Draupadi Murmu (@DraupdiMurmuBJP) / Twitter

ह्या पोस्ट नक्की वाचा :

तुम्हाला हि Draupadi Murmu information in marathi कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment