12 Must-Have Baby Care Products | लहान बाळाचे संगोपन कसे करावे?

लहान बाळाचे संगोपन करणे हे नवीन आई-बाबांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते. बाळाचे संगोपन कसे करायचे, त्याची स्वच्छता कशी ठेवायची हे माहित असणे खूप गरजेचे आहे. पहिल्यांदा आई होणाऱ्या आईचा देखील बाळासोबत नवीन जन्म होत असतो कारण तिला पहिल्यांदा बाळाला जन्म देईपर्यंत बाळाच्या संगोपनाचा कोणताही अनुभव नसतो.

पण काळजी करण्याचे कारण नाही, कारण आज आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत लहान बाळाची काळजी कशी घ्यायची व कोणत्या अश्या वस्तू आहेत ज्या वापरून बाळाला सांभाळणे सोपे जाईल.

बाळाला हाताळताना घ्यायची काळजी

बाळाला घेण्याअगोदर नेहमी तुमचे हात साबणाने स्वछ धुवा. कारण लहान बाळाची रोगप्रतिकारक शक्ती नाजूक असते त्यामुळे तुमच्या हातावरील जंतूमुळे लहान बाळ आजारी पडू शकते.

बाळाला घेताना नेहमी बाळाच्या मानेला एक हात लावा, म्हणजे मानेवर तान येत नाही.

बाळाला रोज सकाळी ७-९ च्या कोवळ्या उन्हामध्ये खेळायला न्यावे. ज्यामुळे बाळाला ‘ड’ जीवनसत्व मिळते.

बाळाचे अन्न :

बाळ ६ महिन्याचे असेपर्यंत त्याला फक्त आईचे दूध पुरेसे असते. सहा महिन्यानंतर बाळाला फळे, खीर व इतर कडधान्य देऊ शकता.

तुमचे बाळ ६ ते ७ महिन्यांच्या दरम्यान असेल तर तुम्ही हा टेबल फॉलो करू शकता.


सकाळी झोपेतून उठल्यानंतर 

ज्यावेळी तुमचे बाळ झोपेतून उठेल त्यावेळी त्याला स्तनपान करावे.

सकाळचा नाश्ता 
सकाळी 7.30 ते 8 (फळांचा जूस)

खालीलपैकी एक: (दूध पाजल्याच्या 1½ ते 2 तासानंतर).फळांचा रस पातळ करण्यासाठी तुम्ही उकळलेले थंड केलेले पाणी वापरू शकता.

 1. केळी- चाकूने बारीक करा किंवा ब्लेंडरमध्ये घाला.
 2. सफरचंद- सोलून,गाभा काढा, सुमारे 5 ते 6 मिनिटे वाफवून घ्या. मिक्सर मध्ये बारीक करा.
 3. चिकू – कापा आणि चमच्याने बारीक करा.
 4. पेरू – सोलून बिया बाजूला काढा, गाभा 5 ते 6 मिनिटे वाफवून घ्या.
 5. पपई – कापा आणि मिक्सर मध्ये बारीक करा.
 6. पिकलेला एवोकॅडो – बारीक करून मिक्सर मध्ये घाला.

ह्या सर्व फळांचा रस तुम्ही चमच्याने बाळाला भरवू शकता किंवा खाली एक बाळाची विशिष्ट चोखणी दिली आहे, तिच्यामध्ये तुम्ही फळांचा गाभा किंवा डायरेक्ट फळांचे तुकडे टाकून बाळाला ती चोखायला देऊ शकता.

फळांची चोखणी :

लहान बाळांना अन्न भरवणे पालकांसाठी मोठे जिकिरीचे काम असते. त्यात चमच्याने अन्न भरवणे म्हणजे ‘ना ओठाला, ना पोटाला’ अशी गत होते.

त्यामुळे हि चोखणी लहान बाळांना फळे तसेच जुस चारण्यासाठी अत्यंत उपयोगी वस्तू म्हणावी लागेल.

तुम्ही ह्या चोखणीचे रबर चे झाकण उघडून त्यामध्ये बारीक केलेले फळाचे तुकडे टाकू शकता व लहान बाळ ते आवडीने चोखून खाते.

दुपारचे जेवण
11.30 ते 12.30 वा

फळांची ओळख करून दिल्यानंतर तुम्ही हे करून पाहू शकता. सकाळी न्याहारीसाठी फळे चारणे सुरू ठेवा.

 • पहिला 1 आठवडा – तांदुळाची खीर
 • दुसऱ्या आठवड्यात सफरचंद भात किंवा उकडलेले गाजर सह तांदुळाची खीर
 • तिसऱ्या आठवड्यात नाचणी दलिया किंवा सफरचंद नाचणी किंवा ओट्स दलिया किंवा सफरचंद ओट्स किंवा मूग डाळ सूप
 • चौथा आठवडा – वर दिलेले पदार्थ आलटून-पालटून द्या.
उर्वरित दिवस

स्तनपान (दुपारच्या जेवणाच्या 1.5 ते 2 तासांनंतरच)


बाळाचे कपडे :

बाळाचे कपडे ऋतू नुसार बदलावेत. उन्हाळ्यात बाळाला नेहमी मऊ आणि सुती कापडाचे कपडे घालावेत, जेणेकरून बाळाला गरम होणार नाही.

पावसाळा व थंडीच्या दिवसात बाळाला पूर्ण अंग झाकले जाईल अशे लोकरीचे किंवा उष्ण कपडे घालावे.

खाली दोन प्रकारचे कपडे दाखवले आहेत जे तुम्ही थंडीत व उन्हाळ्यात वापरू शकता.

कधी कधी बाळ आपल्या नखांनी स्वतःच्या चेहऱ्याला ओरखडत असते त्यामुळे बाळाला हातमोजे नक्की घालावेत. तसेच रात्री थंडी लागू नये म्हणून टोपी व सॉक्स देखील आपल्याकडे असावेत.

१. थंडीत वापरायचे कपडे : ३ इन १ लोकरीचे ब्लॅंकेट
किंमत : ₹285.00
2. टोपी , हातमोजे , सॉक्स
किंमत ₹251.00
३. उन्हाळ्यात वापरायचे कपडे : मऊ , सुती कापडाचे कपडे
 किंमत : ₹499.00

बाळाची अंघोळ :

बाळाला स्वछ अंघोळ घालणे हे बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते.

लहान बाळाची आंघोळ कशी करायची

 • तुमच्या बाळाला नेहमी उबदार, ड्राफ्ट-फ्री खोलीत आंघोळ घाला.
 • बाळाच्या आंघोळीनंतर लगेच बाळाला गुंडाळण्यासाठी एक कोरडा टॉवेल ठेवा.
 • आपल्या बाळाच्या आंघोळीच्या वेळी तिच्या पोटावर उबदार, ओले वॉशक्लोथ ठेवल्याने तिला थंड होण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते.
 • बाळाला स्वच्छ करण्यासाठी मऊ वॉशक्लोथ किंवा स्पंज वापरा.
 • तुमच्या बाळाचा प्रत्येक भाग आलटून पालटून स्वच्छ धुवा, त्वचेवर दिसणारे कोणतेही फ्लेक्स हळूवारपणे काढून टाका.
 • बाळाच्या कानांच्या मागे, बोटांच्या मध्ये, हाताखाली, मानेच्या आणि जांघांच्या दुमड्यांमध्ये, जिथे अनेकदा मळ जमा होतो ते पुसण्याची खात्री करा.
 • बाळाला गरजेपेक्षा जास्त वेळ आंघोळ घालू नका.
 • तुमच्या बाळाला आंघोळीमध्ये एकटे सोडू नका, अगदी क्षणभरही. जर तुम्हाला खोली सोडायची असेल तर बाळाला तुमच्यासोबत घ्या.
 • बाळाच्या आंघोळीनंतर, बाळाला हळूवारपणे कोरडे करा. बाळाची त्वचा मॉइश्चराइझ व्हावी म्हणून तुम्ही मॉइश्चराइझर हि वापरू शकता.
 • बाळाचे अंग पुसण्यासाठी नेहमी मऊ आणि इतर कुटुंबियांपेक्षा वेगळा टॉवेल वापरा.

बाळाला अंघोळ घालण्यासाठी लागणारे साहित्य:

१.बाळासाठी सॉफ्ट टॉवेल
किंमत : ₹292.00
२.बाळासाठी छोटासा बाथ टब
किंमत : ₹457.00
३.बाळाला अंघोळ घालण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्याचा सेट
किंमत : ₹501.00

बाळाची स्वच्छता

बाळाची टॉयलेट साफ करताना :

पहिल्यांदा बाळाचे डायपर बदला, त्यासाठी तुमच्याकडे एक्सट्रा डायपर चा सेट ठेवा.

नंतर बेबी वाईप्स किंवा कापसाच्या बोळ्याने बाळाच्या लेंगिक अवयवाचा तसेच मांड्यांचा भाग पुसून घ्यावा.

तसेच लहान मुले सारखी इतरत्र लघवी करत असतात, त्यामुळे जमिनीवर जंतू संसर्ग होऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे पाणी शोषून घेणारे व लगेच वळणारे कापड असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला खालील लिंक वर मिळतील :

‘मदर स्पर्श’ चे कोणतेही केमिकल नसलेले बेबी वाईप्स (३ पॅक)
किंमत : ₹599.00 
लवकर पाणी शोषून घेणारे ड्राय शीट
किंमत : ₹135.00
बाळासाठी सुती कापडाचे डायपर्स (१२ piece)
किंमत : ₹299.00

बाळाची झोप :

 • बाळाची झोप सुद्धा बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे.
 • बाळाच्या झोपेची वेळ ठरवा व नेहमी त्या वेळेत बाळाला झोपवा
 • बाळाचे रात्रीच्या वेळचे कपडे वेगळे असुद्या. बाळाला झोपताना नेहमी नवीन आणि कोरडी कापडाची नॅपी घाला.
 • तुमच्या घरात जर मच्छर जास्त असतील तर तुमच्या बेडला किंवा बाळाच्या पाळण्याला मच्छरदाणी नक्की लावा. कारण मच्छर चावल्यामुळे बाळाला डेंगू, मलेरिया सारखे भयानक आजार देखील होऊ शकतात.
रिमोट कंट्रोल वर हलणारा व बाळाला झोपण्यासाठी संगीत असणारा पाळणा
अमेझॉन किंमत तपासा
डबल बेड साईज ची मच्छरदाणी
अमेझॉन वर किंमत तपासा

मुलांच्या वाढीबद्दल :

जस-जशी मुले मोठी होतात तस-तशी पालकांची जबाबदारी आणखी वाढू लागते.

बाळ कधी रांगते?

बाळ सहा ते नऊ महिने वयाच्या दरम्यान रांगायला शिकू शकते.

मुले रांगायला लागली कि त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवायला लागते कारण ते घरात कधी कोणत्या वस्तूला हात लावतील व कोठे जाऊन बसतील ते सांगता येत नाही.

एक वर्षाच्या पुढे मुलांना थोड्या थोड्या गोष्टी कळू लागतात. या वयात मुले अनेक नव्या गोष्टी शिकतात. त्यामुळे हे वय त्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यन्त महत्वाचे असते.

आम्ही खाली वाढत्या वयातील लहान मुलांसाठी काही वस्तू दिल्या आहेत त्या तुम्ही नक्की पाहू शकता.

अमेझॉन वर किंमत तपासा

१. Knee Pads :

लहान मुले रांगायला लागली कि त्यांच्यावर लक्ष ठेवणे अवघड होते.

ते कोठेही जाऊ लागतात व त्यामुळे त्यांना इजाही होऊ शकते. सारखे गुडघ्यावर रांगल्यामुळे त्यांच्या गुडघ्यावर काळे डाग उठू शकतात.

त्यामुळे जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरात ओबडधोबड किंवा कडक पृष्ठभाग असेल तर तुमच्या बाळाला ह्या Knee Pads ची नक्की गरज पडेल.


अमेझॉन वर किंमत तपासा

२. रिंग पझल :

हे पझल लहान मुलांच्या डोळ्यांचा व हातांचा ताळमेळ बसण्यात मदत करते.

रिंगा कोणत्या क्रमाने लावायच्या हे लहान मुलांना शिकवले तर ते तासंतास याबरोबर खेळत बसतात.

तुम्ही ह्या रिंगांसोबत मुलांना रंगाची देखील ओळख करून देऊ शकता.


अमेझॉन वर किंमत तपासा

4. प्राण्यांच्या आकाराचे मॅग्नेटस व त्यांचे लेटर्स :

ह्या बॉक्स मध्ये एकूण ७२ मुळाक्षरांचे मॅग्नेटस आहेत व ३२ प्राण्यांचे मॅग्नेटस आहेत. आणि एक बोर्ड आहे ज्यावर तुम्ही प्राण्यांची चित्रे चिकटवून त्यापुढे त्याचे स्पेल्लिंग तयार करू शकता.

ह्यामुळे मुलांना खेळासोबत इंग्रजी मुळाक्षरांचे तसेच प्राण्यांचे ज्ञान होत. व यासोबत मुले तासन्तास खेळात बसतात.


अमेझॉन वर किंमत तपासा

५. लहान मुलांसाठी रंगीत माती :

लहान मुलांना मातीत खेळायला खूप आवडते. पण आपल्या माहित आहे कि ते सेफ आणि हायजेनिक नसते.

हि रंगीत माती लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय सुरक्षित आहे. ह्यापासून तुम्ही अनेक गोष्टी, प्राणी मुलांना बनवून दाखवू शकता. व नंतर ते स्वतः हि बनवू लागतील. ह्यात १२ कलर चे रंगीत मातीचे डबे असतात. ज्यात तुम्ही प्रत्येक रंग वेगवेगळा ठेऊ शकता. मुलांना ह्या खेळात गुंतवणे अतिशय सोपे असते.


अमेझॉन वर किंमत तपासा

6. 2 in 1 Writing board :

लहान मुलांना पेन हातात घेऊन लिहण्याची तसेच चित्र काढण्याचीही खूप आवड असते. मुले वहीवर किंवा कागदावर रंगरंगोटी करून ते खराब करतात व सर्व घरात पसारा करून ठेवतात.

त्यांमुळे त्यांना एक लिहण्यासाठी बोर्ड नक्की द्यावा. हा बोर्ड तुम्ही दोन्ही साइड ने वापरू शकता. एका बाजूला खडूने लिहण्यासाठी काळा बोर्ड आहे तर एका बाजूने पेन ने लिहण्यासाठी पांढरा बोर्ड आहे.


तर मित्रांनो तुम्हाला आम्ही निवडलेले Baby Care Products कसे वाटले ते नक्की कळवा व तुम्ही तुमच्या मुलांना खेळवण्यासाठी काय काय करता ते कमेंट करून नक्की सांगा.

हे पण वाचा : ड वरून लहान मुलांची नावे

Leave a Comment