Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

[UPDATED]लालबहादूर शास्त्री मराठी निबंध

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखनातील महत्वाचे मुद्दे
१) हस्ताक्षर सुंदर असावे
२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट
३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.
४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

लालबहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री मराठी निबंध

आपल्या देशात अनेक देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक आणि थोर नेते होऊन गेले. अनेक पुढारीही होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप हालअपेष्टा सोसल्या. अनेकदा तुरुंगवासही भोगला. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

लालबहादूर शास्त्रीजी हे असेच एक थोर देशभक्त नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत झाला. वडील शारदाप्रसाद श्रीवास्तव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. परंतु शास्त्रीजी दीड वर्षाचे असतानाच त्यांना पितृप्रेमाला मुकावे लागले.

वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीजी शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे राहू लागले. शाळेत देखील ते हुषार आणि शांत विद्यार्थी होते. पुढे काशी विद्यापीठातून त्यांनी तत्वज्ञान विषयांत शास्त्री ही पदवी मिळवली. मनातील सरळपणा, अंत:करणातील शुचिता हे गुण त्यांनी गांधीजींच्या सहवासातच आत्मसात केले. पंडित नेहरु तर त्यांचे स्फूर्तिस्थानच होते.

तुरुंगवासाची शिक्षा होऊन शास्त्रीजी कारावासात होते. एकदा त्यांच्या आई व पत्नी ललितागौरी यांना भेटण्याची परवानगी मिळाली. परंतु दोघींना जाण्याएवढे पुरेसे पैसे त्यांच्याजवळ नव्हते हे जाणून शास्त्रीजींच्या आईने ललिता गौरींना जायला सांगितले. लालबहादूर शास्त्रींना आंबे खूप आवडत असत. हे जाणून ललितागौरींनी तुरुंग अधिकाऱ्याला चोरुन दोन-तीन आंबे तुरुंगात नेले. लालबहादूरांना हे समजताच, तुरुंगाचे नियम मोडून आंबे आणल्याबद्दल त्यांनी पत्नी ललितागौरींना चांगलेच खडसावले. शिक्षा म्हणून आंबे न खाता घरी परत नेण्यास सांगितले. शास्त्रीजींच्या निर्मळ आणि प्रामाणिक स्वभावाचा त्यांच्या पत्नीला खूप अभिमान वाटला. आपल्या देशातील शेतकऱ्यांविषयी त्यांना विशेष प्रेम व कणव होती. म्हणूनच "जय जवान जय किसान" हा त्यांचा नारा होता. आपल्या देशाचे पंतप्रधानपद भूषविण्याचे महान कार्य त्यांनी केले.

असे हे लालबहादूर लहान शरीरयष्टी असून सुद्धा महान अशा कार्यामुळे 'मूर्ती लहान पण किर्ती महान' या लौकिकास पात्र ठरले.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा