{2024} योगाचे महत्व, प्रकार, फायदे । Yoga information in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये योग म्हणजे काय(Yoga information in marathi), आंतरराष्ट्रीय योग दिवस(International Yoga Day), योगाचा इतिहास(History of yoga), योगाचे महत्व(Importance of yoga), योगासनाचे प्रकार(Types of yoga) इत्यादी माहिती बघणार आहोत.

योग म्हणजे काय – Yoga information in marathi

योग हे एक मानवाच्या मनोविज्ञान क्षेत्रातील एक महत्वाचा शोध आहे. योगा म्हणजे शरीर, मन, व आत्म्याला एक करून वर्तमान काळात जगणे.

बरेच जण योगाला हातापायाला ताण देऊन शरीर लवचिक बनवणारा शारीरिक व्यायाम समजतात. पण खरेतर योगा हा एक मानसिक व्यायाम आहे. जो मन शांत ठेवण्यास व माणसाची अंतर्भूत शक्ती वाढवण्यास मदत करतो.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस

२०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. UNGA म्हणजेच (United Nations General Assembly) या संयुक्त राष्ट्र महासभेने मान्य केले कि योग हा मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे.

योगाचा इतिहास

योग हा संस्कृत भाषेतील ‘युज’ या शब्दापासून बनला आहे. ज्याचा अर्थ आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे असा होतो.

योगा हा भारतात फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतीय ऋषी पतंजली यांनी लिहलेला ‘योग सूत्र’ नावाचा ग्रंथ जवळपास २००० वर्ष जुना आहे. हि आतापर्यंतची योगाबद्दल सर्वात जुनी लिखित नोंद आहे.

या ग्रंथामध्ये योग तत्वज्ञानावर भर दिला आहे. भावना व मनावर नियंत्रण कसे ठेवावे व त्यामधून आपला अध्यात्मिक विकास कसा साधावा हा या ग्रंथामध्ये दिलेला मुख्य हेतू आहे.

भारतातील सिंधू संस्कृतीतही योगाचा उल्लेख आहे. योगासनाचे प्रकार व त्याच्या आकृत्या यांची चित्रे सिंधू खोऱ्यातील गुफा, दगडांवर कोरलेली आढळतात.

योगाचे महत्व मराठीमध्ये

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे.

योगातून आपल्याला खालील गोष्टी सध्य करता येतात.

१. शारीरिक स्वास्थ्य

२. मानसिक आरोग्य

३. सामाजिक आरोग्य

४. आध्यात्मिक आरोग्य

५. आत्मज्ञान

योगासनाचे प्रकार मराठी माहिती

योगासनाचे प्रकार

योगासनांचे मुख्य खाली प्रकार पडतात :

  • राजयोग
  • हठयोग
  • लययोग
  • ज्ञानयोग
  • कर्मयोग
  • भक्तियोग

खाली आपण योगासनाचे काही प्रकार बघणार आहोत.

१. अर्धमत्स्येंद्रासन

अर्धमत्स्येंद्रासन योगा

हे आसन करताना प्रथम मंडी घालून बसावे नन्तर दावा पाय आत दुमडून डावे पाऊल बुडाखाली आणावे.

उजवा पाय डाव्या मांडीवरून डावीकडे टेकवावा. व उजवे पाऊल जमिनीवर टेकलेले आणि उजवा गुडघा सरळ वर उचललेला असावा.

डावा खांदा उजव्या गुडघ्याच्या बाहेर आणायचा आणि पाठ आणि कमरेतून उजवीकडे मागे फिरायचे. पाठ सरळ ठेवून डोळ्यांच्या रेषेत मागे बघायचे. असेच दुसर्‍या बाजूने करायचे.

२. नौकासन

नौकासन योगा

पाठ सरळ ठेवून, पाय सरळ पसरून आणि गुडघे जुळवून बसायचे आणि दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता एकमेकांना जुळवून पोटातून ४०° ते ४५° वर उचलायचे. हाताची बोटे पावलांच्या दिशेने धरायची.

३. आकर्ण धनुरासन

आकर्ण धनुरासन

४. हलासन

हलासन

हलासन ही सर्वांगासनाची पुढची पायरी आहे.

सर्वांगासन पूर्ण स्थितीत पोहोचल्यावर कंबर उचललेली ठेवून आणि पाय गुडघ्यात सरळ ठेवून पायांचे चवडे डोक्याच्या मागच्या बाजूला टेकवायचे.

हलासन स्थिती सोडताना पाय गुडघ्यात वाकवून कंबरेच्या वर आणायचे आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवत सावकाश संपूर्ण पाय टेकवायचे. (मानेचे दुखणे / सर्व्हायकल स्पाँडिलायटिस असणाऱ्यांनी हे आसन करू नये.)

५. भुजंगासन

भुजंगासन

पोटावर पालथे झोपून हात खांद्यांच्या खाली घ्यायचे आणि हात सरळ करत खांदे वर उचलायचे.

कंबर जमिनीकडे ढकलायची आणि ओटीपोट शक्यतो जमिनीपासून सुटू द्यायचे नाही. मान वर उचलून समोर किंवा जास्तीत जास्त वर बघायचे.

योगासनाचे फायदे

  1. स्नायूची लवचिकता सुधारते
  2. उत्तम पाचक प्रणाली प्रदान करते
  3. अंतर्गत अवयव मजबूत करते
  4. दम्याचा उपचार करते
  5. मधुमेह बरे करते
  6. हृदयाच्या समस्या दूर करण्यात मदत करते
  7. सामर्थ्य आणि सहनशक्तीला प्रोत्साहन देते
  8. एकाग्रता सुधारते
  9. मन आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते
  10. चिंता, तणाव आणि नैराश्यावर मात करण्यासाठी मन शांत ठेवते
  11. ताण कमी करण्यास मदत करते
  12. रक्त परिसंचरण आणि स्नायू विश्रांतीत मदत करते
  13. वजन कमी करण्यास मदत होते
  14. दुखापतीपासून संरक्षण होते
हे नक्की वाचा :
संदर्भ : 

Leave a Comment