झिमझिम झरती श्रावणधारा मराठी लिखित गाणे

आज आम्ही या पोस्ट मध्ये १९५७ मधील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं झिमझिम झरती श्रावणधारा मराठी लिखित गाणे त्याच्या lyrics सोबत खाली दिलेले आहेत. अपेक्षा आहे कि हे तुम्हाला नक्की आवडेल.

गाण्याचा संदर्भ: Youtube

झिमझिम झरती श्रावणधारा

धरतीच्या कलशात

प्रियाविण उदास वाटे रात

प्रियाविण उदास वाटे रात

झिमझिम झरती श्रावणधारा 

बरस बरस तू मेघा रिमझिम

आज यायचे माझे प्रियतम

आतुरलेले लोचन माझे 

आतुरलेले लोचन माझे 

बघते अंधारात

प्रियाविण उदास वाटे रात

झिमझिम झरती श्रावणधारा 

प्रासादी या जिवलग येता

प्रासादी या जिवलग येता

कमळमिठीमधे भृंग भेटता

बरस असा की प्रिया अन जाईल

बरस असा की प्रिया अन जाईल माघारी दारात

प्रियाविण उदास वाटे रात

झिमझिम झरती श्रावणधारा.

मेघा असशी तू आकाशी

वर्षातुन तू कधी वर्षसी

वर्षामागुन वर्षती नयने 

वर्षामागुन वर्षती नयने करती नित्‌ बरसात

प्रियाविना उदास वाटे

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या  

धरतीच्या कलशात

प्रियाविण उदास वाटे रात

Leave a Comment