मराठी महिने समजून घ्या – मराठी महिन्यांनुसार महत्वाचे सण । Marathi Months – Important Festival Accordingly

हिंदू दिनदर्शिका खूप जुनी आहे, या दिनदर्शिकेतून आपणाला आपले मराठी सण तसेच हंगाम लगेच समजून येतात.


तुम्हाला मराठी महिन्यांबद्दल जाणून घेयचे असेल तर हि पोस्ट शेवटपर्यंत वाचा तुम्हाला परत मराठी महिने समजायला कधीच अडचण नाही येणार हे नक्की!

मराठी महिने :

मराठी दिनदर्शिकेला पंचांग देखील म्हणतात.

पंचांग हे हिंदू धर्माचे कॅलेंडर आहे आणि पंचांग हिंदू धर्मात खूप महत्वाचे आहे. पंचांग हे तिथी, योग, करण, वर आणि नक्षत्र  या पाच घटकांनुसार कार्य व गणना करतो, म्हणून त्यास पंचांग असे म्हणतात.

मराठी महिन्यांमध्ये इंग्लिश दिनदर्शिकेप्रमाणेच १२ महिने असतात पण प्रत्येक महिना हा ३० किंवा ३१(अपवाद फेब्रुवारी) दिवसांचा नसून तो ३० दिवसांचा असतो. याचा अर्थ असा होत नाही कि मराठी महिन्यांमध्ये कमी दिवस भरणार, कारण पंचागामध्ये प्रत्येक तिथी(दिवस) हि १९ ते २४ तासांची असते.


शुक्ल व कृष्ण म्हणजे काय?

चंद्राच्या वेगवेगळ्या स्तिथीनवरून प्रत्येक महिना हा शुक्ल व कृष्ण अशा दोन पक्षात विभागला गेला आहे. म्हणजेच एकाद्या महिन्याचे पहिले १५ दिवस शुक्ल. १, शुक्ल २, … असे करत शुक्ल १५ पर्यंत असतात तर नंतरचे राहिलेले १५ दिवस हे कृष्ण. १, कृष्ण २, … असे करत कृष्ण १५ पर्यंत असतात.

 

महिना
क्रमांक
मराठी महिना सण व तिथी हंगाम
1 चैत्र
 • गुढीपाडवा चैत्र शुक्ल. १
 • श्रीरामनवमी चैत्र शुक्ल. ९
 • हनुमान जयंती चैत्र शुक्ल. १५
वसंत
2 वैशाख
 • अक्षय्य तृतीया वैशाख शुक्ल. २
 • बुद्ध पौर्णिमा वैशाख शुक्ल. १५
3 ज्येष्ठ
 • वटपौर्णिमा ज्येष्ठ शुक्ल. १५
ग्रीष्म
4 आषाढ
 • गुरुपौर्णिमा आषाढ शुक्ल. १५
5 श्रावण
 • नागपंचमी श्रावण शुक्ल. ५
 • नारळीपौर्णिमा श्रावण शुक्ल. १५
 • श्रीकृष्ण जयंती श्रावण कृष्ण. ८
 • गोपाळकाला श्रावण कृष्ण. ९
वर्षा
6 भाद्रपद
 • गणेश चतुर्थी भाद्रपद शुक्ल. ४
 • अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल. १४
7 आश्विन
 • दसरा अश्विन शुक्ल. १०
 • कोजागिरी पौर्णिमा अश्विन शुक्ल. १४
 • नरक चतुर्दशी अश्विन कृष्ण. १४/१५
 • लक्ष्मीपूजन आश्विन कृष्ण १४
शरद
8 कार्तिक
 • बलिप्रतिपदा कार्तिक शुक्ल. १
 • दिपावली पाडवा कार्तिक शुक्ल. १
 • भाऊबीज कार्तिक शुक्ल. २
9 मार्गशीर्ष
 • श्रीदत्त जयंती मार्गशीर्ष शुक्ल. १४
हेमंत
10 पौष
 • मकर संक्रांती पौष कृष्ण. ५
11 माघ
 • रामदास नवमी माघ कृष्ण .९
 • महाशिवरात्री माघ कृष्ण. १३
शिशिर
12 फाल्गुन
 • होळी फाल्गुन शुक्ल. १५
 • धूलिवंदन फाल्गुन कृष्ण. १
 • रंगपंचमी फाल्गुन कृष्ण. ५


वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न :

❓ मराठी महिन्यात/ पंचांग मध्ये एक वर्षात एकूण किती दिवस असतात?

➤ ३६० दिवस.


❓ मराठी महिना व इंग्लिश कॅलेंडर चा ताळमेळ का बसत नाही?
❓ मराठी सण प्रत्येक वर्षी  इंग्रजी कॅलेंडर मध्ये वेगळ्या तारखेला का येतो?
➤ एका मराठी महिन्यात एकूण ३० दिवस असतात पण इंग्रजी कॅलेंडरमध्ये एका म्हण्यामध्ये २८/ २९/ ३० किंवा ३१ अशा भिन्न दिवस येत असतात त्यामुळेच दोन्हीं दिनदर्शिकेत ताळमेळ बसत नाही, म्हणूनच मराठी सण प्रत्येक वर्षी इंग्लिश दिनदर्शिकेत वेगळ्या दिवशी येत असतात.


Leave a comment