स्कुबा डायव्हिंग मराठी माहिती । Scuba Diving Information In Marathi

सध्या स्कुबा डायव्हिंग खास करून तरुण पिढीमध्ये खूप प्रचलित झाले आहे. खोल पाण्याखालच जग जवळून पाहण्याची संधी स्कुबा डायव्हिंग मुळे सर्वसामान्य लोकांना देखील काही हजार रुपयात आज उपलब्ध आहे.

आज पोस्ट मध्ये स्कुबा डायव्हिंग बद्दल बरेच काही सांगितले आहे, तरी Scuba Diving बद्दल जाणून घेण्यासाठी हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय ?

स्कूबा डायव्हिंग ही पाण्यात जास्त वेळ नियंत्रित पद्धतीने पोहण्याची एक पद्धत आहे, ज्यात एक स्कूबा डायव्हर “स्वयं-अंतर्निहित पाण्याखाली श्वास घेण्याचे उपकरण” (Self-Contained Underwater Breathing Apparatus- SCUBA) वापरून पाण्याखाली श्वास घेतो. ज्याच्या मदतीने पाण्याखाली श्वास घेने सुलभ होते, आणि ते पाण्यात जास्त काळ राहू शकतात.

 

काही सामान्य डायव्हिंग उपकरणे :

डायव्हिंग उपकरणे (Diving equipment) किंवा डाइव्ह गियर(Dive gear) दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात.

गोताखोर पाण्यात जास्त वेळ, आरामदायक पोहण्यासाठी काही साधने वापरतात त्यांनाच डायव्हिंग उपकरणे म्हणतात.

 

 डायव्हिंगचे कपडे (Diving clothes):

डायव्हिंगचे कपडे

डायव्हिंगच्या कपड्यांना इंग्रजी मध्ये वेटसूट देखील म्हणतात, जे कि निओप्रीन या रबराच्या पदार्थापासून बनलेले असते. 

हे कपडे शरीराची उष्णता नियंत्रित ठेवायला मदत करतात.

 

 हवायुक्त सिलेंडर (Air cylinder):

 

अल्युमिनियम हवायुक्त सिलेंडर

हवयुक्त सिलिंडर हा सर्व स्कूबा उपकरणांमध्ये सर्वात महत्वाचा तुकडा आहे कारण त्यात दाबयुक्त हवा असते, ज्यामुळे गोताखोरांना पाण्याखाली श्वास घेता येने शक्य होते. 

स्कूबा डायव्हर्स या दबावयुक्त हवेचा वापर करतात कारण फुफ्सांमध्ये श्वासाद्वारे घेतलेल्या हवेचा आणि आसपासच्या किंवा सभोवतालच्या दाबाचा समतोल राखला जावा, आणि एकाद्या व्यक्तीच्या फुफुसांना पाण्याखाली देखील संकुचनासाठी आणि विस्तारासाठी सुलभ व्हावे.

 

टू-स्टेज डायव्हिंग रेग्युलेटर (Two-stage diving regulator):

टू-स्टेज डायव्हिंग रेग्युलेटर
संदर्भ: विकिपीडिया

डायव्हिंगमध्ये रेग्युलेटर हे दुसरे सर्वात महत्वाचे उपकरण आहे, ज्याच्या साहाय्याने गोताखोर पाण्यात स्कुबा डायव्हिंग करताना श्वास घेण्यासाठी वापरतात.

पाण्याच्या खोलीनुसार आणि पाण्यातल्या दबावानुसार हा रेग्युलेटर दबाव कमी किंवा जास्त करून गोताखोर ला श्वास नैसर्गिक वायू प्रमाणे पुरवण्याचे काम करतो.

 

 वजनाचा पट्टा (Weight belt):

 

वजनाचा पट्टा
 

स्कुबा डाइव्हिंगदरम्यान आपल्या शरीरामध्ये थोड्या प्रमाणात असलेला वायू, सिलेंडर मधील हवा आणि डाइव्हिंगच्या कपड्यांमुळेदेखील माणसाचे शरीर पाण्यावर तरंगायचा प्रयत्न करते त्यामुळेच अतिरिक्त वजनासाठी वजनाचा पट्टा वापरावा लागतो ज्याणेकरून शरीर पाण्यात खोलवर प्रयत्नांविना जाऊ शकेल.

 

मुखवटा (Mask):

मुखवटा

हे मुखवटे  सिलिकॉन आणि टेम्पर्ड ग्लास ने बनलेले असतात जे कि स्कुबा डाइव्हिंग करताना गोताखोराला पाण्यात स्पष्टपने  दिसावे म्हणून बनवलेले असतात. मुखवटे घातल्यावर नाक बंद होईल अशी त्याची बनावट असते.

 

कृत्रिम कल्ला (scuba diving fins):

 

कृत्रिम कल्ला

कृत्रिम कल्ला हे पायामध्ये घातले जातात ज्याने गोताखोर स्कुबा डायव्हिंग करताना कमी जोर लावून जास्त लांब जाऊ शकतो. कृत्रिम कल्ला सहसा रबरनेच बनलेला असतो.

 

ब्युएन्सी कंट्रोल डिव्हाइस (BCD):

ब्युएन्सी कंट्रोल डिव्हाइस
संदर्भ: Adrenalin snerkel dive

ब्युएन्सी कंट्रोल डिव्हाइस हे गोताखोरची तरंगण्याची शक्ती कमी किंवा जास्त करण्यास मदत करते.

थोडक्यात या उपकरणाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रयत्नांविना एकाद्या विशिष्ठ खोलीवर जाऊ शकता व त्या विशिष्ट खोलीवर तुम्ही जास्त वेळ डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.

 

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न:

❓ स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीला मराठीत काय म्हणतात?

➤ गोताखोर.

 

❓ SCUBA स्कुबा चा मराठी मध्ये संक्षिप्त (full form)?

➤ स्वयं-अंतर्निहित पाण्याखाली श्वास घेण्याचे उपकरण” (Self-Contained Underwater Breathing Apparatus.

 

❓ डाइव्ह गियर(Dive gear) म्हणजे काय?

➤ डायव्हिंग उपकरणे म्हणजेच डाइव्ह गियर.

 

❓ हवायुक्त सिलेंडर मध्ये फक्त ऑक्सिजन का वापरत नाही?

➤ फक्त ऑक्सिजन असलेले सिलेंडर वापरल्यास पाण्याखाली श्वास घेण्यास संघर्ष करावा लागतो, कारण फक्त ऑक्सिजन असलेल्या हवेचा दाब खूप कमी असतो.

 

❓ रेग्युलेटर ला मराठी मध्ये काय म्हणतात?

➤ नियामक.

Leave a Comment