WhatsApp मधील chatting मागील background wallpaper कसा बदलायचा.

WhatsApp आज जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या एप्प्स पैकी एक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये देखील बरेच लोक व्हाट्सएप वापरतात म्हणून त्यांच्या मदतीसाठी आम्ही मराठी मधून बरेच मदतीसाठी पोस्ट लिहीत असतो.

आज आम्ही WhatsApp मध्ये चॅटिंग मागील वॉलपेपर कसा बदलायचा हे समजावले आहे तरी पोस्ट शेवटपर्यंत हि पोस्ट नक्की वाचा.


WhatsApp मधील सगळ्या chatting मागील background wallpaper कसा बदलायचा?

पहिल्यांदा तुमच्याकडे असलेला मोबाईल तो अँड्रॉइड असो एप्पल असो किंवा जिओ फोन असो सगळ्यांसाठी खाली दिलेली कार्यपध्दती काम करेल.

अजून वाचा : Jio phone मध्ये WhatsApp कसे चालवायचे?

  1. तुमचा मोबाईल फोन घ्या आणि WhatsApp ओपन करा.
  2. WhatsApp मध्ये गेल्यावर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात तीन छोटे ठिपके दिसतील त्यावर टॅप करा.
  3. टॅप केल्यावर तुमच्या समोर खूप पर्याय येतील तिथे ‘सेटिंग्ज (settings)’ पर्याय येईल त्यावर टॅप करा.
  4. टॅप केल्यावर ‘चॅट (Chats)’ नावाचा पर्याय येईल त्यावर टॅप करा.
  5. टॅप केल्यावर वरून दोन नंबरला ‘वॉलपेपर (Wallpaper)’ नावाचा पर्याय येईल त्यावर टॅप करा मग तुम्हाला मधोमध ‘बदला (Change)’ नावाचा पर्याय येईल त्यावर जावा.
  6. तिथे गेल्यावर तुम्हाला खूप Wallpaper दिसतील त्यातील जो तुम्हाला आवडेल त्यावर टॅप करा.
  7. मग तुम्हाला सगळ्यात खाली ‘वॉलपेपर सेट करा (set wallpaper)’ नावाचा पर्याय येईल त्यावर टॅप करा मग तुमचा wallpaper प्रत्येक चॅट मागे दिसेल.

WhatsApp मधील एकाच chatting मागील background wallpaper कसा बदलायचा?

अजून वाचा : WhatsApp अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये कसे डाउनलोड करायचे?

  1. पहिल्यांदा तुमच्या कडे जोपण फोन असेल त्या Phone मध्ये WhatsApp ओपन करा.
  2. ओपन केल्यावर ज्या कॉन्टॅक्टचा चॅटिंग wallpaper बदलायचा आहे त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा.
  3. क्लिक केल्यावर तुम्हाला चॅटिंग दिसेल तिथे गेल्यावर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात तीन टिपके दिसतील त्यावर टॅप करा.
  4. टॅप केल्यावर तुम्हाला सहा पर्याय दिसतील त्या पर्यायात तुम्हाला ‘वॉलपेपर (Wallpaper)’ नावाचे पर्याय दिसेल त्यावर टॅप करा.
  5. टॅप केल्यावर तुम्हाला अनेक wallpaper दिसतील तुम्हाला जो wallpaper आवडेल त्यावर टॅप करा.
  6. किंवा तुम्ही ‘माझे फोटो‘ पर्याय  वापरून तुमच्या मोबाइल मधील फोटो देखील वॉलपेपर सेट करु शकता.
  7. टॅप केल्यावर तो wallpaper येईल मग सगळ्यात खाली मधोमध set wallpaper नावाचे पर्याय येईल त्यावर टॅप करा मग wallpaper set होइल.

निष्कर्ष – आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगितले chatting background wallpaper कसा बदलायचा.

जर तुम्हाला समजले असेल तर मित्रांनाही सांगा व आमची पोस्ट शेअर करा. 

वरती आम्ही तुम्हाला सांगितले Android phone किंवा Jio Phone घ्या तुम्हाला प्रश्न पडला असेल Jio Phone मध्ये पण WhatsApp चालते.

तर तुम्ही बरोबर ऐकले Jio Phone मध्ये पण WhatsApp downloade करता येते आम्ही एक पोस्ट टाकली आहे Jio Phone मध्ये WhatsApp downloade कसे करायचे.

तुमचा कोणताही प्रश्न असो खाली कमेन्ट बॉक्स मध्ये तुम्ही बिन लाजता विचार आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू.

आमच्या website वर आल्या बद्दल धन्यवाद! 

Leave a Comment